30 डिसेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs

पेले

30 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 डिसेंबर 2022)

राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखरनच विक्रम लिमये:

  • राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलपर्यंत विकासित करण्यासाठी विविध क्षेत्रांच्या वाढीचे धोरण ठरविण्याकरिता राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्याची महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानभेत केली.
  • या परिषदेच्या अध्यक्षपदी ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • परिषदेच्या सदस्यपदी विक्रम लिमये, डॉ. अजित रानडे, मिलिंद कांबळे, एस. एन. सुब्रमण्यम, अंबानी आणि अदानी यांच्या पुत्रांचा समावेश करण्यात आला आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन 2027 पर्यंत देशाची अर्थव्यवस्था 5 लाख कोटी डॉलपर्यंत विकसित करण्याचे उद्दिष्ट निर्धारित केले आहे.
  • त्यासाठी राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरची (एक ट्रिलियन डॉलर) करण्याचे उद्दिष्ट आहे.
  • उद्योग, ऊर्जा, बँकिंग, सामाजिक क्षेत्र, नियोजन, अभियांत्रिकी, शिक्षण, कृषी, वस्त्रोद्योग अशा विविध क्षेत्रांतील मान्यवर या समितीत राहतील.
  • निती आयोगाच्या धर्तीवर ‘महाराष्ट्र इन्स्टिय़टय़ूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’(-मित्र) या संस्थेची स्थापन आधीच करण्यात आली असून, त्यांचे काम 1 जानेवारीपासून सुरू होईल.

देशात कुठूनही मतदानाची सुविधा:

  • देशांतर्गत स्थलांतरित नागरिकांना आपापल्या मतदारसंघात न जाता कुठूनही मतदान करता यावे, यासाठी खास सुविधा पुरवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे.
  • दूरस्थ मतदानाच्या सुविधेसाठी मतदानयंत्राचे प्रारूप तयार करण्यात आले असून, 16 जानेवारी रोजी राजकीय पक्षांसमोर सादरीकरण होणार आहे.
  • देशातील विधानसभा व लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी बहुमतदारसंघीय दूरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांचा वापर केला जाऊ शकतो.
  • दूरस्थ मतदारकेंद्रातील एका मतदारयंत्राला एकाचवेळी 72 मतदारसंघ जोडलेले असतील.
  • या मतदारसंघांतील नोंदणीकृत मतदाराचे मत हे मतदानयंत्र स्वीकारेल.
  • केंद्रीय निवडणूक आयोगाला या सुविधेची अंमलबजावणी करण्यापूर्वी कायदेशीर तसेच, तांत्रिक पूर्तता करावी लागेल.

धान उत्पादकांना हेक्टरी 15 हजार रुपये बोनस:

  • अतिवृष्टीमुळे हवालदिल झालेला आणि गेल्या दोन वर्षांपासून बोनसच्या प्रतीक्षेत असलेल्या धान उत्पादकांना प्रतिहेक्टरी 15 हजार रुपये बोनस देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विधानसभेत केली.
  • समग्र विकासाचा आराखडा तयार असल्याचे सांगून कृषी, जलसंपदा, उद्योग, वस्त्रोद्योग, पर्यटन अशा विविध क्षेत्रात विदर्भासाठी भरीव तरतूद करण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
  • सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या विदर्भ आणि मराठवाडय़ातील प्रश्नावरील चर्चेला विधानसभेत उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विदर्भासाठी पर्यटन सर्किट, नवीन खनिज धोरण, समतोल प्रादेशिक विकासासाठी नवीन समिती, अशा विविध घोषणा केल्या.

सूर्यकुमारला वर्षांतील सर्वोत्तम ट्वेन्टी-20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन:

  • भारताचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादवला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) 2022 वर्षांतील सर्वोत्तम पुरुष ट्वेन्टी-20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
  • त्याला या पुरस्कारासाठी इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन, पाकिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान आणि झिम्बाब्वेचा अष्टपैलू सिकंदर रझाचे आव्हान असेल.
  • मुंबईकर सूर्यकुमारने 2022 वर्षांत ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.
  • या वर्षांत सर्वाधिक धावा सूर्यकुमारच्या नावेच आहेत.
  • ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये एका वर्षांत 1000 धावांचा टप्पा ओलांडणारा तो केवळ दुसराच फलंदाज ठरला.
  • तसेच त्याने वर्षभरात 68 षटकार मारले आणि हासुद्धा विक्रम ठरला.
  • महिला विभागात भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाची वर्षांतील सर्वोत्तम ट्वेन्टी-20 क्रिकेटपटूच्या पुरस्कारासाठी दावेदारी आहे.

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे निधन:

  • फुटबॉल विश्वात महान समजले जाणारे ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी दुःखद निधन.
  • पेले हे तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू होते.
  • 1958 मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
  • तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.

अर्शदीप सिंग ‘इमर्जिंग क्रिकेटर’ पुरस्काराच्या शर्यतीत:

  • बुधवारी आयसीसीने पुरूषांच्या इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर 2022 पुरस्कारासाठी नामांकन जाहीर करण्यात आले आहे.
  • या नामांकनाच्या यादीत एकाच भारतीय गोलंदाजाला स्थान मिळाले आहे.
  • त्या गोलंदाजाचे नाव अर्शदीप सिंग आहे.
  • त्याच्याशिवाय दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेन, अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झद्रान आणि न्यूझीलंडचा सलामीवीर फिन अॅलन यांनाही नामांकन मिळाले आहे.
  • या वेगवान गोलंदाजाने 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18,.12च्या सरासरीने 33 विकेट घेतल्या आहेत.

दिनविशेष :

  • ऑल इंडिया मुस्लिम लीगची ढाका येथे 30 डिसेंबर 1906 स्थापना.
  • 30 डिसेंबर 1943 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे भारतीय स्वातंत्र्याचा झेंडा फडकविला.
  • गांधीवादी कार्यकर्ता आचार्य शंकरराव देव यांचे 30 डिसेंबर रोजी निधन.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

9 months ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

9 months ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

1 year ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

1 year ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

1 year ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

1 year ago