28 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
‘एवॅक्स’ सिस्टम चीन-पाकिस्तानवर ठेवणार नजर:
28 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 ऑगस्ट 2020)
भारतीय कंपनी बनवतेय प्लाझ्मा थेरीपीची लस:
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर लस तयार करण्याचा अनेक देशांकडून प्रयत्न सुरू आहे. यात भारतही आघाडीवर आहे.
पुढील महिन्याभरात इंटास फार्मा देशातील पहिली प्लाझ्मा थेरेपी लसीच्या माानवी चाचणीला सुरूवात करणार आहे.
देशातील फार्मा कंपनी इंटास फार्मानं प्लाझ्मा थेरेपीप्रमाणेच असलेली लस विकसित करण्यावर काम सुरू केलं आहे.
रुग्णाला ही लस दिल्यानंतर त्यांना प्लाझ्मा थेरेपी देण्याची आवश्यकता नसल्याचा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे.
हायपरिम्युन ग्लोब्युलिन (Hyperimmune Globullin) ला ड्रग्झ कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून कोविड १९ वरील उपचाराच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
गुजरात आणि देशातील अन्य रुग्णालयांसोबत याची वैद्यकीय चाचणी केली जाईल,” अशी माहिती इंटास मेडिकल अँड रेग्युलेटरी अफेअर्सचे प्रमुख डॉ. अलोक चतुर्वेदी यांनी दिली.
चीन आणि पाकिस्तानपासून वाढता धोका लक्षात घेऊन भारताने अखेर इस्रायलकडून आणखी दोन ‘फाल्कन’ एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम (एवॅक्स) विकत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एवॅक्स सिस्टिमला आकाशातील भारताचे नेत्र म्हटले जाते.
ही इस्रायली एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टिम रशियन बनावटीच्या इल्यूसीन-76 विमानावर बसवण्यात येणार आहे.
आंतरमंत्रालयीन समितीत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर इस्रायलबरोबर एवॅक्स सिस्टिमचा करार करण्यासाठी सुरक्षासंबंधातील मंत्रिमंडळ समितीची मंजुरी मिळणार आहे.
मी भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी होती – अजिंक्य रहाणे:
इंग्लंडमध्ये 2019 साली आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक स्पर्धेतभारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं.
साखळी फेरीत धडाकेबाज कामगिरी करणारे भारतीय फलंदाज उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर पुरते ढेपाळले.
तत्कालीन निवड समिती प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांनी या जागेसाठी अनेकांना संधी दिली.
भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेही या शर्यतीत होता, पण त्याला संघात संधीच दिली नाही.
अजिंक्यच्या मते विश्वचषकात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी तो योग्य उमेदवार होता.
दिनविशेष :
सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद विलायत खाँ यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाला.
भारतीय पदार्थवैज्ञानिक एम.जी.के. मेनन यांचा जन्म 28 ऑगस्ट 1928 मध्ये झाला.
टोयोटा मोटर्स ही सन 1937 मध्ये स्वतंत्र कंपनी बनली.
‘पोकेमोन’चे निर्माते सातोशी ताजीरी यांचा जन्म 28 ऑगस्ट 1965 मध्ये झाला.
28 ऑगस्ट 1969 हा दिवस भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचा स्मृतीदिन आहे.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.