25 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

25 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (25 ऑगस्ट 2022)

वन्यप्राणी हल्ल्यात मृत, जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ :

  • वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास अथवा जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याची रक्कम वाढवण्यात आली आहे.
  • वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती व रानकुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी व पशुधन हानी झाल्यास पूर्वी असलेल्या अर्थसहाय्याच्या तुलनेत वाढवण्याचा निर्णय राज्याच्या महसूल व वनखात्याने घेतला आहे.
  • वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या वारसांना देय अर्थसहाय्याच्या रकमेपैकी दहा लाख रुपये तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित दहा लाख रुपयांपैकी पाच लाख रुपये पाच वर्षांसाठी मुदत ठेव व उर्वरित पाच लाख रुपये दहा वर्षांसाठी मुदत ठेव स्वरजपात राहील.
  • कायम अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये, गंभीररित्या जखमी झाल्यास एक लाख 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
  • व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास औषधोपचारासाठी खर्च देण्यात येईल. मात्र, खासगी रुग्णालयात औषधोपचार करणे आवश्यक असल्यास त्याची मर्यादा 20 हजार रुपये प्रती व्यक्ती राहील.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 ऑगस्ट 2022)

एसटीच्या ‘स्मार्ट कार्ड’योजनेला दोन महिने मुदतवाढ :

  • राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासात विविध घटकांतील सवलतधारकांना स्मार्टकार्ड बंधनकारक केले आहे.
  • त्यामुळे गणेशोत्सव आणि दिवाळीच्या कालावधीत ज्येष्ठ नागरिकांसह इतर सवलतधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी स्मार्ट कार्ड योजनेला नोंदणी व वितरणासाठी 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली.
  • एसटी महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासन सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना प्रवासी भाडय़ामध्ये 25 टक्क्यांपासून 100 टक्क्यांपर्यंत सवलत देते.
  • या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीना आधार क्रमांकाशी निगडित असलेली स्मार्ट कार्ड काढण्याची योजना एसटीने सुरू केली.
  • त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलतधारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राज्यात लवकरच सात हजार पोलिसांची भरती :

  • राज्यातील गृह विभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.
  • विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना फडणवीसांनी ही माहिती दिली.
  • देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्यातील विविध शहरांमध्ये पोलीस विभागात मनुष्य बळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
  • तसेच आणखी सात हजार पोलिसांची भरती केली जाणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

टोलवसूलीसाठी नितीन गडकरींनी सांगितली ‘ही’ नवी योजना :

  • राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके बंद करून त्याऐवजी स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा (ANPR)बसवण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.
  • यासाठीचा चाचणी प्रकल्प ( Pilot Project) सुरू करण्यात आला असून यासंदर्भातील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
  • चारचाकी गाड्यांमध्ये कंपनीने फीट केलेल्या नंबरप्लेट बसवण्याचा निर्णय 2019 मध्ये केला होता.
  • आता टोलनाके काढून स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा बसवण्यात येणार आहे.
  • हे कॅमेरे गाडीच्या नंबरप्लेटवरील नंबर वाचून त्याला जोडण्यात आलेल्या बॅंक खात्यातून पैसे वजा होतील, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली.

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत शुभमन गिलची उडी :

  • बुधवारी ‘आयसीसी’ने एकदिवसीय फलंदाजांची क्रमवारी जाहीर केली.
  • या क्रमवारीत भारताच समामीवीर फलंदाज शुभमन गिल 45 स्थानांनी झेप घेत 38व्या स्थानावर पोहोचला आहे.
  • दरम्यान, या क्रमवारीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर कायम आहे. तर कर्णधार रोहित शर्मा सहाव्या स्थानावर आहे.
  • शिखर धवनला एका स्थानाचा फटका बसला असून तो 12व्या स्थानावर आहे.
  • या क्रमावारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा रुसी व्हॅन डर डुसेन दुसऱ्या स्थानावर आहे.
  • गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिल्या स्थानावर आहे. तर भारताचा जसप्रीत बुमराह चौथ्या स्थानावर आहे.
  • तसेच बांगलादेशचा शाकिब अल हसन अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. या यादीत पहिल्या दहामध्ये एकही भारतीय खेळाडू नाही.

दिनविशेष :

  • जगातील पहिली प्रवासी विमानसेवा सन 1919 मध्ये लंडन ते पॅरिस सुरू झाली.
  • साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म 25 ऑगस्ट 1923 मध्ये झाला.
  • झिम्बाब्वेचा सन 1980 मध्ये संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
  • सन 1998 मध्ये एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका या जगप्रसिद्ध विश्वकोशाच्या आयातीवर भारत सरकारने बंदी घातली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (26 ऑगस्ट 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

8 months ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

8 months ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

1 year ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

1 year ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

1 year ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

1 year ago