21 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (21 सप्टेंबर 2022)
सनदी अधिकाऱ्याची अनुच्छेद 370 रद्द करण्याविरोधातील याचिका मागे :
काही महिन्यांपूर्वी भारतीय प्रशासकीय सेवेत (आय.ए.एस.) पुनर्नियुक्ती झालेल्या शाह फैजल यांनी अनुच्छेद 370 रद्द करण्यात आल्याविरोधातील आपली सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतली आहे.
सनदी सेवेबाहेर पडलेल्या शाह यांना या वर्षी एप्रिलमध्ये पुन्हा या सेवेत घेण्यात आले आहे.
त्यांची नियुक्ती सांस्कृतिक खात्यात उपसचिवपदी करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा राज्यघटनेतील अनुच्छेद 370 रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर त्याविरोधात 23 याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते.
ऑस्करसाठी भारताकडून गुजराती चित्रपट ‘छेल्लो शो’ची निवड :
चित्रपटांसाठीचा सर्वोच्च सन्मान मानल्या जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे यंदा ‘छेल्लो शो’ या गुजराती चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
भारतीय चित्रपट महामंडळाने (एफएफआय) मंगळवारी याबाबत घोषणा केली.
सौराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एका मुलाचे चित्रपटांवरील प्रेम ‘छेल्लो शो’ या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
‘छेल्लो शो’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन पॅन नलिन यांचे असून 14 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित झाला होता.
ऑस्कर पुरस्कार सोहळा 12 मार्च 2023 रोजी लॉस एंजेलिस येथे होणार आहे.
एक ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमात होणार मोठे बदल :
ऑक्टोबर- नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या आगामी टी20 विश्वचषकापूर्वी आंतराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या नियमात काही मोठे बदल केले जाणार अशी घोषणा केली आहे.
यामध्ये स्ट्राईक घेण्यापासून ते डेड बॉल, नो बॉल, पेनल्टी धावांपर्यंत अनेक मुद्यांवर नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
यासोबतच कोविड-19 च्या काळापासून सुरू झालेली लाळ बंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व नवीन नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. या बदलांसाठीच्या सूचना मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) मांडल्या आहेत.
साधारणपणे, आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सुचविलेले प्रत्येक नियम जसेच्या तसे लागू करते.
सर्वोच्च न्यायालयाची ‘बीसीसीआय’च्या घटनादुरुस्तीला मान्यता :
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय)2019मध्ये घटनादुरुस्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात परवानगी मागितली होती.
2018मध्ये न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारताना तीन-तीन वर्षांच्या कालावधीनंतर विरामकाळ (कूलिंग-ऑफ पिरेड) ही अट मान्य केली होती.
मात्र, त्यानंतर एका वर्षातच ‘बीसीसीआय’ने घटनादुरुस्तीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
अखेर तीन वर्षांनी ही याचिका निकालात निघाली.
14 सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती चंद्रचूड आणि न्या. हिमा कोहली यांच्या खंडपीठाने ‘बीसीसीआय’मधील पदाधिकाऱ्यांच्या अनिवार्य विरामकाळाच्या घटनादुरुस्तीला परवानगी दिली.
तसेच काही अन्य मुद्द्यांवरही सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला.
दिनविशेष:
भारतीय महानगर ग्वेर्घगीस इवानीयो यांचा जन्म 21 सप्टेंबर 1882 मध्ये झाला.
21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन तसेच आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून पाळला जातो.
सन 1965 मध्ये गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.
रिसर्च अँड अॅनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना सन 1968 मध्ये झाली.
सन 1971 मध्ये बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.