20 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
पॅरिस सेंट जर्मेन प्रथमच अंतिम फेरीत:
20 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (20 ऑगस्ट 2020)
करोना रुग्णांची वाढ पुन्हा 60 हजारांपेक्षा जास्त झाली:
करोना रुग्णांची दैनंदिन वाढ पुन्हा 60 हजारांपेक्षा जास्त झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये 64 हजार 500 नव्या रुग्णांची नोंद झाली तर, 1,094 रुग्णांचा मृत्यू झाला.
देशभरातील करोना रुग्णांचा आकडा 27 लाख 67 हजार 273 वर तर, मृत्यू 52 हजार 889 वर पोहोचल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली.
गेल्या चोवीस तासांमध्ये विक्रमी 60 हजार 91 रुग्ण करोनामुक्त झाले असून एकूण 20 लाख 37 हजार 870 रुग्ण बरे झाले आहेत.
रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाणही सर्वाधिक 73.64 टक्क्यांवर गेले आहे. संसर्ग दर 8.05 टक्के असून मृत्यू दर 1.91 टक्के आहे. करोनाबाधितांपैकी 24.45 टक्के म्हणजेच चारमध्ये एक रुग्ण उपचाराधीन आहे.
एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या 6 लाख 76 हजार 514 आहे.
National Recruitment Agency स्थापन करण्यात येईल- मोदी सरकार:
सरकारी नोकरीबाबत मोदी सरकारने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय भरती संस्था अर्थात National Recruitment Agency स्थापन करण्यात येईल.
त्याद्वारे एकच सामायिक परीक्षा देऊन तरुणांना आपली गुणवत्ता सिद्ध करता येईल. शिक्षण झाल्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी युवा पिढी अनेक मार्गाचा अवलंब करते.
प्रत्येक संस्था आणि कंपन्या आपल्या परीक्षा ठेवतात. नोकरीच्या महत्त्वाकांक्षेच्या दृष्टीने या सगळ्या परीक्षा देतात.
मात्र मोदी सरकारच्या निर्णयामुळे हे चित्र बदलण्याची चिन्हं आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीत झालेल्या निर्णयासंबंधी झालेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती दिली.
पॅरिस सेंट जर्मेन प्रथमच अंतिम फेरीत:
पॅरिस सेंट जर्मेनने सुरुवातीपासूनच दर्जेदार कामगिरीचे प्रदर्शन करत आरबी लेपझिग संघाचा 3-0 असा पाडाव करत चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच धडक मारली.
चॅम्पियन्स लीगमधील तब्बल 110 सामन्यांमध्ये खेळल्यानंतर फ्रान्समधील अव्वल क्लब असलेल्या पॅरिस सेंट जर्मेनचे अंतिम फे रीत मजल मारण्याचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरले.
मार्किन्होज, अँजेल डी मारिया तसेच हुआन बेर्नाट वेलास्को यांनी केलेल्या गोलमुळे पॅरिस सेंट जर्मेनने उपांत्य फे रीच्या लढतीवर वर्चस्व गाजवले.
पहिल्यांदाच चॅम्पियन्स लीगची उपांत्य फेरी गाठणाऱ्या लेपझिगविरुद्ध पॅरिस सेंट जर्मेनने सुरुवातीपासूनच सामन्यावर नियंत्रण मिळवले.
अप्रतिम पासेस, मोकळ्या जागेतून धावत चेंडूला पुढे सरकावणे आणि लेपझिगच्या बचावफळीवर सातत्याने दडपण आणत पॅरिस सेंट जर्मेनने हा सामना सहज जिंकला.
दिनविशेष:
20 ऑगस्ट हा जागतिक मच्छर दिन तसेच भारतीय अक्षय ऊर्जा दिन आहे.
राजाराममोहन रॉय, व्दारकानाथ टागोर, कालिनाथ रॉय यांनी 20 ऑगस्ट सन 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली.
सर रोनाल्ड रॉस यांनी सन 1897 मध्ये भारतात हिवतापाच्या जिवाणूचा शोध लावला.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा 20 ऑगस्ट 1944 मध्ये मुंबई येथे जन्म झाला होता.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.