15 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs

15 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 मे 2022)

संयुक्त अरब अमिरात अध्यक्षपदी शेख मोहम्मद बिन झायेद :

  • संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षपदी शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • शुक्रवारी अमिरातीचे अध्यक्ष खलीफा बिन जायेद अल नाह्यान यांच्या निधन झाले.
  • त्यानंतर सात अमिरातींच्या अबुधाबीतील अल मुश्रीफ महालात झालेल्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
  • शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्या घराण्याकडे संयुक्त अरब अमिरातीची वंशपरंपरेने सत्ता आहे.
  • 1971 मध्ये या सात अमिराती एकत्र येऊन स्वतंत्र देशनिर्मितीनंतर अवघ्या तिसऱ्यांदा सत्तेचा खांदेपालट झाली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (14 मे 2022)

पंजाबमध्ये कारागृहातील व्हीआयपी कल्चर संपुष्टात :

  • पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी कारागृहातील व्हीआयपी संस्कृतीबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
  • तर त्यांनी कारागृहातील सर्व व्हीआयपी खोल्या कारागृह व्यवस्थापन ब्लॉकमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • तसेच कारागृहात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरत कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे.
  • यापूर्वी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंजाबी गायकांना कडक इशारा दिला होता.
  • कोणत्याही गाण्यात बंदूक संस्कृती आणि गुंड संस्कृती स्वीकारली जात नाही, असे ते म्हणाले होते.

मुंबईत नौदलाच्या दोन युद्धनौका ‘सूरत’ आणि ‘उदयगिरी’चे जलावतरण :

  • भारतीय नौदलात ठारविक कालावधीनंतर विविध प्रकारच्या युद्धनौका या निवृत्त होत असतांना, त्यांची जागा नवीन युद्धनौका ( warships) घेत असते.
  • काळानुसार, बदलत्या तंत्रज्ञानानुसार, बदलत्या युद्धरणनितीनुसार अनेक बदल करत नव्या युद्धनौकांची उभारणी केली जाते.
  • तर याचाच एक भाग म्हणून देशातील विविध गोदींमध्ये विविध क्षमतेच्या युद्धनौकांची बांधणी युद्धपातळीवर सुरु आहे.
  • मुंबईतील माझागाव गोदीमध्ये ( Mazgaon Docks Limited) सध्या दोन महत्त्वाच्या युद्धनौकांची बांधणी सुरु आहे.
  • तर यापैकी विनाशिका ( Destroyer) आणि फ्रिगेट प्रकारातील प्रत्येकी एक अशा एकुण दोन युद्धनौकांचे जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह ( Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत 17 मे ला होणार आहे.
  • विनाशिकेचं नाव सूरत ( INS Surat -D69) आहे तर उदगिरी ( Udaygiri ) असं फ्रिगेटचे नाव आहे.
  • अर्थात या युद्धनौका प्रत्यक्ष नौदलाच्या सेवेत दाखल होतील तेव्हा त्यांना ही संबंधित नावे देण्यात येतील.
  • सध्या सूरतला Yard No – 12707 या नावाने ओळखले जाते. तर उदगिरीला Yard No – 12653 या नावाने ओळखले जाते आहे.

विराट कोहलीने रचला नवा विक्रम :

  • विराट कोहलीने पंजाबविरोधात खेळताना एक मोठा विक्रम केला आहे.
  • आयपीएलमध्ये 6500 धावांपर्यंत मजल मारणारा तो पहिला खेळाडू ठरलाय.
  • विशेष म्हणजे आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला.
  • हरप्रीत ब्रारने टाकलेल्या चेंडूवर फटका मारताच त्याने 6500 धावांचा टप्पा ओलांडला.
  • विराटनंतर 6000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्यांमध्ये सध्या पंजाब किंग्जकडून खेळणारा शिखर धवन हा एकमेव खेळाडू आहे.
  • त्यानंतर या रांगेत दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा डेविड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दिनविशेष :

  • 15 मे : भारतीय वृक्ष दिन.
  • 15 मे : जागतिक कुटुंब दिन.
  • जगातल्या पहिल्या मशीन गन बंदूकेचे पेटंट जेम्स पक्कल यांनी 15 मे 1718 मध्ये घेतले.
  • रॉबर्ट वॉल्पोल 15 मे 1730 मध्ये युनायटेड किंग्डमचे पहिले पंतप्रधान झाले.
  • 15 मे 1811 मध्ये पॅराग्वेला स्पेनकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • सूर्यग्रहणातील खग्रास स्थितीपुर्वी दिसणार्‍या बेलीज बीड्‌सचे शास्त्रज्ञ फ्रॅन्सिस बेली यांनी 15 मे 1836 मध्ये सर्वप्रथम निरीक्षण केले.
  • मॉस्को शहरात भुयारी रेल्वेची सुरूवात 15 मे 1935 मध्ये झाली.
  • 15 मे 1940 मध्ये दुसरे महायुद्ध – हॉलंडने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 मे 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

8 months ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

8 months ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

1 year ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

1 year ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

1 year ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

1 year ago