13 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
निओवाइज हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ:
13 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 जुलै 2020)
करोना लस संशोधनात रशियाने मारली बाजी:
या व्हायरसला रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात मोठया प्रमाणावर संशोधन सुरु आहे.
पण सध्याच्या घडीला यामध्ये रशियाने बाजी मारल्याचे दिसत आहे. रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर बनवलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरली आहे.
सेचेनोव्ह विद्यापीठाने स्वयंसेवकांवरील या लसीच्या क्लिनिकल चाचण्या पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.
चाचणी परीक्षणात ही लस यशस्वी ठरल्याचा विद्यापीठाचा दावा आहे. स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला बुधवारी डिस्चार्ज देण्यात येईल.
एएनआयने हे वृत्त दिले आहे. रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या या लसीच्या क्लिनिकल चाचण्या सेचेनोव्ह विद्यापीठाने 18 जून रोजीच सुरु केल्या होत्या.
फॉक्सकॉनची भारतात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकीची योजना:
आयफोनची निर्मिती करणारी प्रसिद्ध अॅपल कंपनी हळूहळू चीनमधून आपले उत्पादन प्रकल्प दुसऱ्या देशांमध्ये शिफ्ट करत आहे.
अॅपलशी संबंधित असलेली फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी भारतात व्यवसाय विस्तार करण्याचा विचार करत आहे.
चेन्नईजवळ श्री पेरुंबुदूर येथे कारखान्याचा विस्तार करण्याचा फॉक्सकॉनचा प्लान आहे.
भारतात 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. फॉक्सकॉन अॅपल कंपनीसाठी आयफोनची जोडणी करण्याचे काम करते.
निओवाइज हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ:
निओवाइज हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळ येतअसून तो रात्रीच्या वेळी विलोभनीय दर्शन देत आहे.
त्याची शेपटी पिसाऱ्यासारखी आहे.जुलैत महिनाभर तो भारतातून सूर्यास्तानंतर दिसणार आहे.
धूमेकतूला दोन शेपटय़ा आहेत. उत्तर अर्धगोलार्धात हा धूमकेतू दिसत असून तो गेल्या आठवडय़ात बुध ग्रहाच्या कक्षेत होता.
धूमकेतूची जाडी 5 किलोमीटर आहे. त्याचे केंद्रक काजळीसदृश पदार्थाचे असून हा धूमकेतू सौरमालेच्या 4.6 अब्ज वर्षांपूर्वीच्या जन्माशी नाते सांगणारा आहे.
मुंबई हॉकीचे मोठे नुकसान होणार- एक राज्य, एक मत:
एक राज्य, एक मत’ या नव्या संकल्पनेमुळे मुंबई हॉकीचे मोठे नुकसान होणार आहे.
मुंबई या देशातील सर्वात जुन्या हॉकी संघटनेला आता संलग्न सदस्यत्वाचा दर्जा देण्यात आल्यामुळे राष्ट्रीय स्पर्धामध्ये मुंबईचा संघ पाठवता येणार नाही.
‘‘गेल्या 10 वर्षांत मुंबईतील हॉकीला घरघर लागली असून राष्ट्रीय शिबिरातील मुंबईकर हॉकीपटूंची संख्या रोडावत चालली आहे.
क्रीडा मंत्रालयाच्या नव्या नियमांविषयी आणि मुंबईतील हॉकीच्या सद्य:स्थितीविषयी 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेते हॉकीपटू सोमया यांच्याशी केलेली ही बातचीत.
दिनविशेष :
13 जुलै 1660 मध्ये पावनखिंड लढवून ‘बाजीप्रभू देशपांडे‘ यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.
सन 1908 या वर्षी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी मिळाली.
जतिंद्रनाथ दास यांनी सन 1929 मध्ये लाहोर तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. या उपोषणातच त्यांचा मृत्यू झाला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.