11 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 ऑक्टोबर 2021)
स्पुटनिक लाइट लशीच्या निर्यातीस भारताची मान्यता :
भारत सरकारने एका मात्रेच्या स्पुटनिक लाइट या कोविड 19 प्रतिबंधक लशीच्या निर्यातीस मान्यता दिली आहे.
तर ही लस रशियाच्या सहकार्याने भारतात तयार करण्यात आली असून आपल्या देशात या लशीला अजून मान्यता देण्यात आलेली नाही .
भारताच्या हेटरो बायोफार्मा लि. या कंपनीने या लशीचे उत्पादन केले असून स्पुटनिक लाइट लशीच्या 40 लाख मात्रांची निर्यात रशियाला करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
स्पुटनिक लाइट ही रशियाच्या स्पुटनिक व्ही लशीसारखीच असून भारतातील लसीकरण कार्यक्रमात वापर करण्यासाठी अजून या लशीला मंजुरी देण्यात आलेली नाही.
भारताच्या औषध महानियंत्रकांनी स्पुटनिक व्ही लशीला एप्रिलमध्ये मंजुरी दिली होती पण स्पुटनिक लाइट लशीला अजून मंजुरी मिळालेली नाही.
नेमबाजांनी अखेरच्या दिवशीही अचूक वेध साधल्याने भारताने ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ जागतिक नेमबाजी स्पर्धेची सर्वाधिक पदकांसह सांगता केली.
‘आयएसएसएफ’ने जाहीर केलेल्या पदकतालिकेनुसार, स्पर्धेअंती भारताच्या खात्यात एकूण 40 पदके होती.
तर ज्यात 16 सुवर्ण, 15 रौप्य आणि 9 कांस्यपदकांचा समावेश होता.
अखेरच्या दिवशी 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल आणि 50 मीटर पिस्तूल या ऑलिम्पिकमध्ये न खेळल्या जाणाऱ्या नेमबाजी प्रकारांत भारतीयांनी उत्कृष्ट कामगिरी करताना सर्व 12 पदके आपल्या नावे केली.
तसेच 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात पुरुषांमध्ये विजयवीर सिद्धूने सुवर्ण, तर उधयवीर सिद्धूने रौप्यपदकाची कमाई केली.
आयसीसीने जाहीर केले विश्वचषक विजेत्यां संघाचे पारितोषिक :
ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला 16 लाख डॉलरचा धनादेश देऊन गौरवण्यात येणार आहे, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केले.
तर यंदा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे ही स्पर्धा रंगणार आहे. 23 ऑक्टोबरपासून स्पर्धेच्या मुख्य फेरीला प्रारंभ होईल.
तसेच या स्पर्धेच्या उपविजेत्या संघाला आठ लाख डॉलर, तर उपांत्य फेरी गाठणाऱ्या अन्य दोन संघांना प्रत्येकी चार लाख डॉलर देण्यात येतील.
2016मध्ये भारतात झालेल्या अखेरच्या ट्वेन्टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडिजने इंग्लंडला नमवून जेतेपद मिळवले होते.
हरभजन सिंगला मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित :
कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू हरभजन सिंगला मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.
फ्रान्सची युनिव्हर्सिटी इकोल सुपीरियर रॉबर्ट डी सॉर्बोनेने दीक्षांत समारंभात हरभजनला क्रीडा क्षेत्रातील मानद पीएचडी प्रदान केली.
विद्यापीठ क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मानद डॉक्टरेट प्रदान करते.
हरभजनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत भारतीय संघासाठी 103 सामने खेळले आणि त्यात 417 विकेट्स मिळवल्या आहेत.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 236 सामन्यात 269 विकेट्स घेतल्या आहे.
तसेच 28 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 25 विकेट्स घेतल्या आहेत.
टी 20 वर्ल्डमध्ये पहिल्यांदाच होणार DRS चा वापर :
17 ऑक्टोबरपासून युएई आणि ओमानमध्ये टी 20 वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
तर या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने डीआरएसचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे.
टी 20 वर्ल्डकप इतिहासात पहिल्यांदाच डीआरएसचा उपयोग केला जाणार आहे.
मागचा वर्ल्डकप 2016 मध्ये झाला होता. तेव्हा टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात डीआरएस प्रणाली उपलब्ध नव्हती.
मैदानात पंचांकडून निर्णय घेताना झालेली चूक दुरुस्त करण्यासाठी डीआरएसची सुरुवात करण्यात आली होती. डीआरएस घेत फलंदाज किंवा क्षेत्ररक्षण करणारी टीम पंचांच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात.
दिनविशेष:
11 ऑक्टोबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बालिका दिन‘ आहे.
सन 1852 मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ सिडनी या ऑस्ट्रेलियातील विद्यापीठची स्थापना झाली.
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते व निर्माते अमिताभ बच्चन यांचा जन्म 11 ऑक्टोबर 1942 मध्ये झाला.
व्ही.एस. नायपॉल यांना सन 2001 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.