शब्दयोगी अव्यय व त्याचे प्रकार

शब्दयोगी अव्यय :

वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांना वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणार्‍या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.

शब्दयोगी अव्यव नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणार्‍या शब्दाला जोडूनच येतात.

शब्दयोगी अव्ययवाचे पंधरा  प्रकार पडतात.

1. कालवाचक :

कालवाचक अव्ययवाचे दोन प्रकार पडतात.
अ) कालदर्शकपावेतो, नंतर, आधी, पुढे, पूर्वी इ.
उदा. 1. आजपावेतो मी आंबा खाल्ला नाही.
2. यापुढे मी जाणार नाही.
3. सकाळनंतर मी तिकडे जाणार आहे.
ब) गतिवाचकपासून, पर्यंत, मधून, खालून, आतून इ.
उदा.1. कालपासून माझी परीक्षा सुरू झाली.
2. उद्या पर्यंत ते दुकान बंद राहील.

2. स्थलवाचक :

आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मध्ये, समोर, जवळ, ठायी, पाशी, समक्ष, समीप, नजीक इ.

उदा. 1. पुस्तक टेबलाजवळ ठेवले आहे.
2. घरामध्ये मोठा साप घुसला आहे.

3. कारणवाचक :

करवी, योगे, हाती, व्दारा, कडून, मुळे इ.

उदा. 1. सावलीमुळे कपडे लवकर वाळत नाही.
2. सिंहाकडून हरिण मारले गेले.

4. हेतुवाचक :

करिता, साठी, कारणे, अर्थी, प्रीत्यर्थी, निमित्त, स्तव इ.

उदा. 1. यश मिळविण्याकरिता मेहनत लागते.
2. जगण्यासाठी अन्न हवेच.

5. व्यतिरेकवाचक :

विना, शिवाय, खेरीज, परवा, वाचून, व्यतिरिक्त

उदा. 1. तुझ्याशिवाय माला करमत नाही.
2. त्याच्या खेरीज दूसरा कोणताही चालेल.

6. तुलनात्मक :

पेक्षा, तर, तम, मध्ये, परिस इ.

उदा. 1. माणसांपेक्षा मेंढरं बारी.
2. गावामध्ये केशर सर्वात हुशार आहे.

7. योग्यतावाचक :

समान, सम, जोगा, सारखा, योग्य, प्रमाणे इ.

उदा. 1. तो ड्रेस माझा सारखा आहे.
2. आम्ही दोघे समान उंचीचे आहोत.

8. संग्रहवाचक :

सुद्धा, देखील, ही, पण, केवळ, फक्त,इ.

उदा. 1. मी देखील त्या कार्यक्रमात सहभागी होईल.
2. रामही भक्तासाठी धावून येईल.

9. कैवल्यवाचक :

च, ना, मात्र, पण, फक्त, केवळ इ.

उदा. 1. विराटच आपला सामना जिंकवेल.
2. किरण मात्र आपल्या सोबत येणार नाही.

10. संबंधवाचक :

विशी, विषयी, संबंधी इ.

उदा. 1. देवाविषयी आपल्या मनात फार भक्ति आहे.
2. त्यासंबंधी मी काहीच बोलणार नाही.

11. संबंधवाचक :

संगे, सह, बरोबर, सकट, सहित, निशी, सवे, समवेत इ.

उदा. 1. त्याने सर्वांबरोबर जेवण केले.
2. आमच्या सह तो पण येणार आहे.

12.विनिमयवाचक :

बद्दल, एवजी, जागी, बदली इ.

उदा. 1. त्याच्या जागी मी खेळतो.
2. सूरजची बदली पुण्याला झाली.

13. दिकवाचक :

प्रत, प्रती, कडे, लागी इ.

उदा. 1. या पेपरच्या दहाप्रत काढून आण.
2. त्याच्याकडे पैसे दिले आहेत मी.

14. विरोधवाचक :

विरुद्ध, वीण, उलटे, उलट इ.

उदा. 1. भारताविरुद्ध आज पाकिस्तानची मॅच आहे.
2. त्याने उलट माझीच माफी मागितली.

15. परिणामवाचक :

भर

उदा. 1. मी दिवसभर घरीच होतो.
2. राम रात्रभर शेतात पाणी भरत होता.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.