मानवी जीवनाचा इतिहास

मानवी जीवनाचा इतिहास

मानवाची उत्क्रांती

 • एकपेशीय सजीवापासून ते मानवाच्या उत्पत्तीपर्यंत निसर्गाला कोट्यावधी वर्षे लागले.
 • उत्क्रांतीच्या ओघात माकडासारखा प्राणी जन्माला आला. हा प्राणी एप म्हणून ओळखला जात असे. त्याला शेपूट नव्हते.
 • त्याचे डोके माकडापेक्षाही मोठे होते. त्याच्या पाठीत बाक होता आणि हा प्राणी दोन पायावर चालत असे. त्याचे हात गुडग्यापर्यंत लांब होते.
 • त्याच्या भुवयावर जाड केस होते व संपूर्ण शरीरभर केस होते हा प्राणी म्हणजे आदिमानव होय. त्यानंतरच्या काळातील मानवी विकासाचे होमो इरेक्टस आणि होमो सेपिअस असे 2 टप्पे मानले जातात.
 • होमो सेपिअस म्हणजे बुद्धिमान मानव.
 • मानवी मानवी विकासाच्या या टप्पात मानवाला अग्नीचा उपयोग माहिती होता. त्यानंतरच्या काळात त्याने दगडी हत्यारे घडविण्यास सुरुवात केली.
 • हा काळ अश्मयुग म्हणून ओळखला जातो. या काळाचे पुराश्मयुग व नावाश्मयुग असे दोन काळ पडतात.

पुराश्मयुग

 • आदिमानव आपली उपजीविका करण्याकरिता कंदमुळे आणि कच्चे मांस खात असे.
 • जेव्हा त्यास नुसत्या हाताने मांस सोलणे अवघड आहे असे, कळल्यानंतर त्याने दगडापासून हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली.
 • ज्या काळात मानवाने दगडापासून हत्यारे तयार करण्यास सुरुवात केली. त्यावेळेस सुरूवातीला हे हत्यारे ओबडधोबड होती.
 • लांबवर दगड फेकण्याकरिता त्याने दगडाला आकार देण्यास सुरवात केली.
 • दगडाला योग्य आकार देण्याकरिता त्याने दगडाला छिलके पडण्यास सुरुवात केली.
 • या संकल्पनेमधून सुबक आकाराची हत्यारे आकारास आली.

नवाश्मयुग

 • नवाश्मयुगामध्ये मानवाला शेती व पशूपालनाची कला अवगत झाली. बी टाकल्यानंतर झाड तयार होते.
 • हे ज्ञान त्यास कालांतराने त्यास मिळाले आणि यामधून शेती करण्याची आणि शेतीकरण्याकरिता पशुचा वापर करण्याची कल्पना त्यास सुचली.
 • या कल्पनेमधून मानवाच्या जीवनात शेती आणि पशुपालन व्यवसाय सुरू होवून मानवी संस्कृतीच्या विकासाकडे मानव वळत गेला.
 • शेतीचा शोध जमिनीवर सांडलेले धान्याचे कण मातीत रुजतात आणि त्यापासून रोपे तयार होवून त्यास कणसे लागतात. असे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने धान्य पेरण्यास सुरुवात केली आणि त्या संकल्पनेतून शेतीचा शोध लागला.
 • पशुपालन मानवाला शिकारीकरिता आणि घराची राखण करण्याकरिता कुत्रा उपयुक्त ठरू लागला. या घटनेमुळे त्यास आपल्या मदतीकरिता प्राण्याचा उपयोग होतो. असा शोध लागला. या शोधातून मानव मानवी शक्तीऐवजी प्राण्यांचा उपयोग करून शेती करू लागला.

ग्रामीण वस्तीचा विकास

 • मानवाच्या जीवनातील शेतीचा शोध हा त्याला स्थिरता आणण्यास उपयोगी ठरला.
 • शेतीचा शोध लागल्यामुळे त्याची भटकंती संपवून स्थिर जीवनास सुरुवात झाली.
 • गांव व वसाहती शेतीच्या शोधामुळे त्याला एकाच ठिकाणी अन्न मिळू लागले. त्यामुळे त्याच्या जीवनात स्थिरता येवून तो घर करून राहू लागला. शेतीच्या कामाकरिता त्यास इतरांची गरज भासू लागली. त्यामुळे एकमेकास सहाय्य करण्यार्‍या माणसाचा गट तयार होवून ते एकत्र राहून एकमेकास संरक्षण देवू लागते. त्यामधून ग्रामीण वस्तीचा विकास झाला. आणि वस्तीचे रूपांतर गावामध्ये होवू लागले.
 • नागरी संस्कृतीच उदय स्थिर झालेल्या समाजव्यवस्थेला गतीमानता आणण्यामध्ये चाकाचा शोध हा क्रांतिकारक ठरला. नवाश्मयुगामध्ये चाकाचा शोध लागला असावा असे म्हटले जाते. मानवास उंचावरून घरंघळत येणार्‍या ओंडक्यावरुन चाकाची संकल्पना सुचली. चाकाचा सर्वात प्रथम वापर कुंभाराने भांडी तयार करण्याकरिता केला असे म्हटले जाते. चाकाच्या शोधामुळे वाहतुकीला सुरवात झाली. जगातील बहुतांशी संस्कृती नदी काठच्या प्रदेशात विकसित झाली आहे. त्यामध्ये भारतातील सिंधु संस्कृती, आशिया खंडातील तैग्रिस, युफ्रेटिस व चीनची संस्कृती, नाईल नदीच्या खोर्‍यात विकसित झालेली इजिप्तची संस्कृतीचा विकास नदयाच्या प्रदेशातच झाला आहे.  
Must Read (नक्की वाचा):

1935 चा कायदा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World