महाराष्ट्रातील समाजसुधारक – भाऊराव पायगोंडा पाटील

भाऊराव पायगोंडा पाटील :

जन्म22 सप्टेंबर 1887, कुंभोज, जी. कोल्हापूर.

मृत्यू 9 मे 1959.

महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे त्यांना म्हटले जात.

22 सप्टेंबर 1887 पहिला श्रमप्रतिष्ठादिन.

भाऊराव पाटील यांना ‘कर्मवीर’ ही पदवी गाडगे महाराजांनी दिली.

22 सप्टेंबर हा दिवस श्रमप्रतिष्ठा दी म्हणून साजरा केला जातो.

ग्रामीण शिक्षणप्रसारासाठी संपूर्ण आयुष्य वाहणारा द्रष्टा समाजसुधारक.

रयतेचे बोधचिन्ह : वटवृक्ष.

संस्थात्मक योगदान :

 • 1910 – स्थानिक लोकांच्या मदतीने दूधगाव विद्यार्थी प्रसारक मंडळाची स्थापना, (1924 साली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे.)
 • 4 ऑक्टोबर 1919 – काले, ता. कर्‍हाड येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना.(1924 साली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय सातारा येथे.)
 • 1924 – छत्रपती शाहू बोर्डिंग, सातारा येथे स्थापना (ग्रामीण भागातून शिक्षणासाठी शहरात येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी). छत्रपती शाहू बोर्डिंगचे उद्घाटन म. गांधीच्या हस्ते झाले. बोर्डिंगचे पहिले अध्यक्ष हमीद आली होते.
 • 1932 – पुणे कराराचे स्मरण म्हणून मुलींसाठी Union Boarding House स्थापन.
 • 1935 – प्राथमिक शिक्षक प्रशिक्षणासाठी सातारा येथे Silver Jubilee Rural Training College स्थापले.
 • 1940 – महाराजा सायाजीराव हायस्कूल ही रयत शिक्षण संस्थेची पहिली माध्यमिक शाळा सुरू केली (सातारा).
 • 1947 – छत्रपती शिवाजी कॉलेज महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे स्थापले.
 • स्वावलंबी शिक्षणासाठी ‘कमवा व शिका योजना‘.
 • गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी लक्ष्मीबाई पाटील मेमोरियल एज्यूकेशन फंड स्थापना ही योजना राबवली.

वैशिष्टे :

 • समताधिष्ठीत समाज निर्मितीसाठी प्रयत्न करणारे समाजसुधारक.
 • वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थांच्या मनावर संस्कार करण्याचा प्रयत्न.
 • म. फुले, राजर्षी शाहू, म. गांधी यांचा प्रभाव. सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव.
 • स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद.
 • श्रमाच्या प्रतिष्ठेला शैक्षणिक तत्वज्ञानात महत्वाचे स्थान.
 • तुम्हास जर एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा ! शंभर वर्षाची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा ! हा संदेश.
 • शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात नेऊन बहुजन समाजाला समर्थ बनविले.
 • महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टनह. रा.महाजनी.
 • भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तिस्तंभ है म. गांधी.
 • ‘जगातील कुठल्याही विद्यापीठाची पदवी नसलेल्या कर्मवीर अण्णाना जगातील सर्व विद्यापीठांच्या पदव्या दिल्या तरी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव कमीच होईल ‘ डॉ. पंजाबराव देशमुख यांची प्रतिक्रिया.
You might also like
1 Comment
 1. Akash Kale says

  Thank you so much sir

Leave A Reply

Your email address will not be published.