क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 9 बद्दल माहिती
क्रिडा चालू घडामोडी संकीर्ण भाग 9 बद्दल माहिती
- आंतरराष्ट्रीय खुली बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा शार्दुल नागरे, महाराष्ट्राचा सहावा ग्रॅड मास्टर ठरला. यापूर्वी प्रविण ठिपसे, अभिजित कुंटे, विदित गुजराथी, अक्षयराज कोरे, स्वप्नील धोपाडे यांनी हा किताब जिंकला आहे.
मॉस्को आंतरराष्ट्रीय महिला खुली बुद्धिबळ स्पर्धा
- विजेती – वोरोनीला स्केडर (रशिया)
- उपविजेती – सौम्या
सेंट पीटर्सबर्ग लेडीज चषक 2016
- विजेते – सानिया मिर्झा-मार्टिना हिंगीस (सलग 40 विजयाची नोंद झाली.)
लागोसे कप इंटरनॅशनल पोलो स्पर्धा
- विजेता – लागोस शोरलाइन
वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धा 2016
- विजेता संघ – महाराष्ट्र
- उपविजेता संघ – तामिळनाडू
- शेवटच्या कसोटीत (101 वी कसोटी) न्यूझीलंडचा कर्णधार ब्रॅडन मॅक्लमने खाइस्ट चर्च येथील हंगले ओव्हल ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात सर्वात वेगवान शतक केले. त्याने 54 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. या आधीचा विक्रम व्हिव रिचर्डस (56 चेंडूत) यांच्या नावावर होता. त्यांनी इंग्लंड विरुद्ध 1985-86 मध्ये ही खेळी केली होती.
- मॅक्लमने कसोटीत सर्वाधिक 106 षटकाराचा विक्रम केला आहे. याआधी हा विक्रम अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता. (100 षटकार)
- क्रिकेटच्या 139 वर्षाच्या इतिहासात पदार्पण ते निवृत्ती पर्यंत सलग 101 कसोटी खेळणारा न्यूझीलंडचा खेळाडू ब्रॅडन मॅक्लम हा जगातील एकमेव खेळाडू होय.
दिल्ली ओपन चॅलेंजर टेनिस स्पर्धा 2016
- विजेता – स्टीफन रॉबर्ट (फ्रान्स)
- उपविजेता – साकिब मायजेनी (भारत)
दिल्ली ओपन चॅलेंजर टेनिस स्पर्धा 2016
- पुरुष दुहेरी विजेते – महेश भूपती व युकी भांबरी