जालियनवाला बाग हत्याकांड

जालियनवाला बाग हत्याकांड

 • लोकमान्य टिळकांना अखेरच्या काळात, भारतीय राष्ट्रीय चळवळीत महात्मा गांधीचे आगमन झाले.
 • भारतीय जनतेच्या ब्रिटिश शासनाविरुध्दच्या असंतोषाला त्यांनी सत्याग्रह व व्यापक जनआंदोलनाव्दारे वाचा फोडली.
 • इ.स. 1920 मध्ये गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारताच्या स्वातंत्र्यलढयाच्या नव्या पर्वाची सुरवात झाली.

सुरवातीचे सत्याग्रह :-

 • भारताच्या राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी गांधीजीनी दक्षिण आफ़्रिकेतील गौरवणीय सरकारच्या वर्णव्देषी धोरणाविरूध्द सत्याग्रहाच्या तंत्राचा प्रथमत: आणि यशस्वीरीत्या वापर केला.
 • दक्षिण आफ़्रिकेतून परत आल्यानंतर 1917 साली चंपारण्य येथील नीळ-उत्पादक शेतकर्‍यांच्या आणि गुजरातमधील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या अहिंसात्मक आंदोलनाद्वारा गांधीजीनी आपले सत्याग्रहाचे तंत्रउपयुक्त असत्याचे दाखवून दिले.
 • त्यांनी याच तंत्राचा यशस्वी उपयोग 1918 साली खेडा जिल्हयात साराबंदीच्या चळवळीत आणि अहमदाबादच्या गिरणी कामगारांच्या संपात केला.

जालियनवाला बाग हत्याकांड :-

 • पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती.
 • 1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली.
 • त्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला.
 • गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.
 • 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले.
 • या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला. तर रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.
 • भारतीय जनतेने या घटनेचा सार्वत्रिक निषेध केला.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.