बार्सिलोना बनला पाचव्यांदा चॅंपियन्स लीगचा विजेता
- इटलीच्या युव्हेंट्स क्लबचा 3-1 असा सहज पराभव करत स्पेनच्या बार्सिलोना क्लबने पाचव्यांदा यूएफा चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद मिळविले आहे.
- लिओनेल मेस्सी, नेमार आणि सुआरेझ या तिघांच्या खेळाने बार्सिलोनाला विजेतेपद मिळाले.
- बार्सिलोनाने आतापर्यंत स्पर्धेत केलेल्या 31 गोलपैकी 10 गोल मेस्सी, 10 गोल नेमार आणि 7 गोल सुआरेझने केले आहेत, त्यामुळे हे तिघेच विजयाचे मुख्य शिल्पकार आहेत.
युवा संघ प्रशिक्षकपदी राहुल द्रविड यांची निवड
- आपल्या शैलीदार खेळीने कारकीर्द गाजविलेल्या राहुल द्रविडची भारत ‘अ’ आणि युवा (१९ वर्षांखालील) संघांच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
- राहुल द्रविड हे ४२ वर्षांचे आहेत आणि १६४ कसोटी व ३४४ वन-डेचा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्यामुळे युवा खेळाडूंना त्यांचा नक्कीच खूप फायदा होईल.
भारताचा बांगलादेशबरोबर भूसीमा करार
- कालपासून बांगलादेशच्या दौर्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील 41 वर्षांपासून असलेला सीमावाद सोडविण्यासाठी भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान आज शेवटी ऐतिहासिक भूसीमा करारावर स्वाक्षरी केली आहे.
- भूसीमा कराराबरोबरच दोन देशांदरम्यान विविध 19 करारांवरही स्वाक्षरी झाली आहे. यामध्ये व्यापार, गुंतवणूक, रस्तेविकास, सागरी सुरक्षा, सीमेवरील गुन्हेगारी, दूरसंचार, विमा, व्यापार शिक्षण, शिक्षण, संशोधन,
- या करारामुळे दोन देशांमधील एकूण 161 भूभागांचे आदान- प्रदान होणार आहेत आणि भारत- बांगलादेश सीमेवरील भारताच्या ताब्यात असलेली 111 गावे बांगलादेशकडे जाणार असून, बांगलादेशच्या ताब्यात असलेली 51 गावे भारताचा भाग बनणार आहेत. म्हणजेच, एकूण 500 एकर जमीन भारताला मिळाली असून, दहा हजार एकर जमीन बांगलादेशला देण्यात आली आहे. या करारामुळे सुमारे 50 हजार नागरिकांच्या नागरिकत्वाचा प्रश्न मिटला आहे.
दुष्काळासाठी आपत्कालीन योजना आखणी
- संभाव्य दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेता भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर) आणि कृषी व सहकार खात्याच्या मदतीने देशभरातील 580 जिल्ह्यांसाठी आपत्कालीन योजनांची आखणी करण्यात आली आहे.
- या योजनेत महाराष्ट्रातील 33 जिल्ह्यांचा समावेश आहे.
दिनविशेष:
- 1893 – दक्षिण आफ्रिकेत गांधीजींना फस्ट क्लासचे तिकीट असतांनाही रेल्वेच्या डब्यात बसण्यास मनाई करण्यात आली.