Current Affairs of 24 May 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (24 मे 2018)

केंद्र सरकारची ‘आयुष्यमान भारत’ योजना :

  • केंद्र सरकराच्या ‘आयुष्यमान भारत’ या योजनेत नगर जिल्ह्यातील दोन लाख 66 हजार 370 लाभार्थी आहेत. केंद्र सरकार या कुटुंबांना आजारी पडल्यास प्रतिकुटुंब पाच लाख रूपयांपर्यंत मदत करणार आहे.
  • मात्र सध्या ही योजना प्राथमिक पातळीवर असून लाभार्थी असणा-या कुटुंबांची पडताळणी ग्रामसभामधून त्या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सुरू आहे.
  • केंद्र सरकार शहरी व ग्रामिण भागातील दारिद्र रेषेखालील व आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी ही आरोग्य विमा योजऩा सुरू करणार आहे. या योजणेतून एका लाभार्थी कटुंबाला आजारी पडल्यास पाच लाख रूपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे. ही आरोग्य विमा योजऩा केंद्र सरकारची असून केवळ आजारी पडल्यानंतर दवाखाण्यातील बिलापोटी ही आर्थिक मदत संबधित कुटुंबांना मिळणार आहे.
  • तसेच या साठीची लाभार्थी हे 2011 साली झालेल्या जणगणनेतून निवडण्यात आली आहेत. या लाभार्थींचे संकलन सध्या आरोग्यविभाग मार्फत जिल्ह्यात सुरू आहे. या लाभार्थींच्या कुटुंबांचे संकलन पारनेर तालुक्यात करण्यात येत असून तालुक्यातील भाळवणी, अळकुटी, निघोज, पळवे, कान्हूर पठार, रूईछत्रपती व खडकवाडी या सात प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (23 मे 2018)

स्वप्नील जोशी करणार आयपीएलच्या अंतिम सामन्याचे समालोचन :

  • सध्या देशात आयपीएल 2018 चे वारे जोमाने वाहत आहे. आयपीएलच्या यंदाच्या पर्वात कोणता संघ बाजी मारणार याची उत्सुकता भारतातील प्रत्येक क्रीडा चाहत्यांमध्ये आहे.
  • मात्र, क्रिकेटच्या मराठमोळ्या चाहत्यांसाठी यंदाचा हंगाम एका वेगळ्याच गोष्टीसाठी खास ठरणार आहे. कारण, पहिल्यांदाच क्रिकेट सामन्याचे समालोचन मराठीतून ऐकण्याची संधी येत्या 27 मे ला होणाऱ्या VIVO IPL च्या अंतिम सामन्याद्वारे मराठी माणसांना मिळणार आहे. VIVO IPL च्या अंतिम सामन्याच्या या खास कार्यक्रमात मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी सहभागी होणार आहे.
  • 27 मे ला होणाऱ्या या अंतिम सामन्यापूर्वी सहा वाजल्यापासून खास कार्यक्रम सुरू होणार आहे. त्यानंतर मराठी समालोचनासह अंतिम सामन्याचा आनंद घेता येणार असल्यामुळे, या दुर्मिळ संधीचा प्रेक्षकांनी पुरेपूर आस्वाद घ्यायला पाहिजे.

आरोग्य सेवा उपलब्धता दर्जात देशाची घसरण :

  • आरोग्यसेवेचा दर्जालोकांना असलेली त्याची उपलब्धता यात 195 देशांत भारताचा 145 वा क्रमांक लागला आहे. चीन, बांगलादेश, श्रीलंका, भूतान या शेजारी देशांच्याही भारत मागे आहे, असे लॅन्सेटच्या अहवालात म्हटले आहे.
  • दी ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजेस या अभ्यास अहवालात दिलेल्या माहितीनुसार 1990 पासून भारतात आरोग्य सेवांमध्ये सुधारणा होत आहेत. 2016 मध्ये भारताचा आरोग्य सेवा उपलब्धता व दर्जा गुणांक 41.2 झाला आहे. तो 1990 मध्ये 24.7 होता. एचएक्यू निर्देशांक 2000 ते 2016 दरम्यान सुधारला असला तरी उच्चतम व नीचतम गुणांक हे यातील फरक 1990 मध्ये 23.4 तर 2016 मध्ये 30.8 होता.
  • गोवा व केरळ यांचा 2016 मधील गुणांक 60 पेक्षा अधिक होता तर उत्तर प्रदेश व आसामचा गुणांक 40 च्या खाली होता.
  • भारत (145), चीन (48), श्रीलंका (71), बांगलादेश (133), भूताना (134) यांच्यापेक्षा मागे आहे तर नेपाळ (149), पाकिस्तान (154), अफगाणिस्तान (191) यांच्यापेक्षा पुढे आहे.
  • तसेच ज्या पाच देशांनी आघाडी घेतली आहे, त्यात 2016 च्या आकडेवारीनुसार आइसलँड (97.1), नॉर्वे (96.6), नेदरलँडस (96.1) लक्झेमबर्ग (96), फिनलँड व ऑस्ट्रेलिया (95.9) यांचा समावेश आहे.

अतुल गोतसुर्वे हे उत्तर कोरियातील भारताचे राजदूत :

  • उत्तर कोरिया हुकूमशहा किम जाँग ऊन यांचे तुघलकी फर्मान, क्षेपणास्त्र चाचणी आणि आण्विक कार्यक्रम यामुळे हा देश नेहमीच चर्चेत असतो. अशा या देशात भारताच्या राजदूतपदाची धूरा आता एका मराठी माणसाकडे सोपवण्यात आली आहे.
  • अतुल गोतसुर्वे हे भारताचे उत्तर कोरियातील राजदूत असतील. गोतसुर्वे यांनी कार्यभार स्वीकारताच परराष्ट्र राज्यमंत्री व्ही के सिंह यांनी गेल्या आठवड्यात दोन दिवसांचा उत्तर कोरियाचा दौरादेखील केला आहे. या ऐतिहासिक दौऱ्याचे श्रेय सिंह यांच्यासह गोतसुर्वे यांना देखील दिले जात आहे.
  • 5 मे रोजी गोतसुर्वे यांनी उत्तर कोरियात भारतीय राजदूत पदाची धूरा सांभाळली. यानंतर जवळपास नऊ दिवसांनी त्यांना किम याँग नाम यांनी भेटीसाठी निमंत्रित केले. हुकूमशहा किम जाँग ऊन यांच्या निकटवर्तीयांमध्ये त्यांचा समावेश आहे.
  • तसेच या भेटीच्या दुसऱ्याच दिवसी व्ही.के. सिंह हे उत्तर कोरियात पोहोचले. सिंह आणि गोतसुर्वे या दोघांनीही हा दौरा यशस्वी व्हावा यासाठी अथक मेहनत घेतली आणि याचा परिणाम म्हणजे दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दिशेने भारताने एक पाऊल पुढे टाकले.

केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मणिपूर क्रीडा विद्यापीठाला मंजुरी :

  • मणिपूरमधील पहिले राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याच्या वटहुकुमाला केंद्रीय मंत्रिमंडळाने 23 मे रोजी मंजुरी दिली.
  • तसेच या विद्यापीठामध्ये अॅथलीट आणि प्रशिक्षकांसाठी विविध अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहेत.
  • क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान आणि उच्च कामगिरी प्रशिक्षण यांवर लक्ष देण्यात येणार आहे, असे या विधेयकात म्हटले आहे.
  • इंफाळमध्ये (पश्चिम) क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे विधेयक संसदेमध्ये प्रलंबित असल्याचे सांगत केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या निर्णयाची माहिती दिली.
  • मणिपूर सरकारने या प्रस्तावित विद्यापीठाला या आधीच जागा दिली आहे. त्यामुळे वटहुकुमावर राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर कार्यवाही वेगाने होईल, असा अंदाज आहे.

दिनविशेष :

  • तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी स्वत: विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश 24 मे 1844 मध्ये वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
  • न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस 24 मे 1883 मध्ये खुला झाला.
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (ISRO) विकसित केलेला इन्सॅट-3 बी हा उपग्रह 24 मे 2000 रोजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण.
  • 24 मे 2001 रोजी 18व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (25 मे 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

8 months ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

8 months ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

1 year ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

1 year ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

1 year ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

1 year ago