Current Affairs of 23 April 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (23 एप्रिल 2018)

टीसीएस बनणार भारताची पहिली बिलियन डॉलर कंपनी :

  • भारताला लवकरच पहिली 100 बिलियन डॉलर कंपनी मिऴणार आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस ही आता पहिली 100 बिलियन डॉलर भारतीय कंपनी होणार आहे.
  • टीसीएस अर्थातच टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीचे भागभांडवल लवकरच 100 बिलियन डॉलरवर पोचण्याची शक्यता आहे. कंपनीचे सध्याचे बाजारमूल्य सुमारे 634,155.62 कोटी रुपये आहे.
  • टीसीएसही पहिली भारतीय कंपनी आता 100 बिलियन डॉलरच्या पंक्तीत येणार आहे. टीसीएसच्या शेअरच्या किंमतीत 6.7 टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल 2012 नंतरची ती सर्वात मोठी वाढ आहे.
  • टीसीएसच्या एका शेअरने आज 3421 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. टीसीएसने चौथ्या तिमाई निकालांची घोषणा केली त्यानंतर कंपनीच्या शेअरच्या किंमतीत वाढ झाली.
  • तसेच टाटा समूहाच्या अत्यंत महत्वाच्या टीसीएसने एकास एक बोनस देण्याची घोषणा केली त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये यात गुंतवणूक करण्याचा उत्साह दिसून आला. सद्यस्थितीत टीसीएसचे बाजारमूल्य जवळपास 99 बिलियन डॉलर्सच्या आसपास पोचले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 एप्रिल 2018)

केंद्र सरकारकडून पॉक्सो अॅक्टमध्ये दुरूस्ती :

  • 12 वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याबाबत 21 एप्रिल रोजी केंद्र सरकारकडून वटहुकूम काढण्यात आला. या वटहुकूमाच्या मंजुरीसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविण्यात आला.
  • केंद्र सरकारकडून पॉक्सो अॅक्टमध्ये दुरूस्ती करण्यात आलेल्या वटहुकूमास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे नवीन अध्यादेशानुसार 12 वर्षांखालील वयाच्या मुलींवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्यास फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे.
  • देशात बलात्काराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली आहे. यावर केंद्र सरकार गंभीर असून, त्याला लगाम लावण्यासाठी सरकारकडून पावले उचण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 12 वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी देण्याबाबत वटहुकूम केंद्र सरकारकडून काढण्यात आला.

दिनेशला राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक :

  • कटफळ (ता. बारामती) येथील पै. दिनेश भाऊसाहेब मोकाशी याने स्व. खाशाब जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2018 मध्ये सुवर्णपदक मिळविले. त्याच्या यशाबद्दल सर्व स्तरावरुन अभिनंदन होत आहे.
  • कांदिवली मुंबई येथे पार पडलेल्या स्व.खशाब जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2018 मध्ये राज्यभरातील मल्लांनी सहभाग घेतला.
  • कटफळ गावचा सूपुत्र कु.पै. दिनेश भाऊसाहेब मोकाशी यांनी 72 किलो (गिक्रो रोमन) कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. दिनेश हा पुणे येथील आंतराष्ट्रीय कुस्ती केंद्र अर्जुन पुरस्कार विजेते पै. काका पवार याच्या नेतृत्वाखाली सराव करत आहे.
  • दरम्यान, त्याचा या यशाबद्दल कटफळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सारिका भारत मोकाशी, उपसरपंच शरद कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांच्या वतीने त्याचे अभिनंदन करण्यात आले.

पहिली भारतीय महिला फायर फायटर :

  • भारतीय विमान क्षेत्रातील पुरूषांचे वर्चस्व असलेच्या अखेरच्या क्षेत्रातही एका महिलेने आता प्रवेश केला आहे.
  • एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) पहिल्यांदाच एका महिला फायर फायटरची नियुक्ती केली आहे.
  • तानिया सन्याल असे या पहिल्या महिला फायर फायटरचे नाव आहे. ती मुळची कोलकाताची असून लवकरच ती सेवेत रूजू होईल.
  • तानियाने वनस्पती शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तिला एएआयच्या पूर्व क्षेत्रातील विमानतळांसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. यामध्ये कोलकाता, पाटणा, भुवनेश्वर, रायपूर, गया आणि रांचीचा समावेश आहे. कोलकाता प्रशिक्षण केंद्रातून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर यापैकी कोणत्याही एका विमानतळावर तिची नियुक्ती केली जाईल.

अर्सेनलचे प्रशिक्षकपद सोडण्याची वेंगर यांची घोषणा :

  • 22 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर अर्सेनल संघाचे प्रशिक्षक अर्सेन वेंगर या पदावरून पायउतार होत आहेत. चालू मोसम संपल्यानंतर प्रशिक्षकपद सोडणार आहे, अशी घोषणा वेंगर यांनी केली.
  • ‘इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी मला अर्सेनलचे प्रशिक्षकपद सांभाळता आले, याचा मला अभिमान वाटतो,’ असे वेंगर यांनी म्हटले आहे. तीन प्रीमियर लीगचे विजेतेपद तसेच 2003-4च्या मोसमात अपराजित राहण्याची कामगिरी आणि सात वेळा एफए चषक पटकावण्याची करामत त्यांच्या कारकिर्दीत संघाने केली आहे.
  • मात्र अर्सेनलला गेली 14 वर्षे प्रीमियर लिगचे विजेतेपद पटकावता न आल्याने वेंगर यांच्यावरील दडपण वाढले होते. तसेच चॅम्पियन्स लीगमध्ये सलग दुसऱ्यांदा पात्रतेचा अडसर ओलांडता न येण्याची टांगती तलवार त्यांच्यावर होती. स्पेनचा मातब्बर संघ अ‍ॅटलेटिको माद्रिदला 27 एप्रिल आणि 4 मेच्या युरोपा लिगच्या उपांत्य फेरीत पराभूत केल्यानंतरच अर्सेनलला ते शक्य होणार आहे.

दिनविशेष :

  • सन 1635 मध्ये 23 एप्रिल रोजी अमेरिकेतील पहिली सार्वजनिक शाळा बोस्टन लॅटिन स्कूल स्थापन झाली.
  • समाजसुधारक ‘पंडिता रमाबाई सरस्वती’ यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी झाला.
  • अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’ यांचा जन्म 23 एप्रिल 1873 रोजी झाला.
  • सन 1990 मध्ये नामिबियाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 एप्रिल 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago