‘डिजिटल इंडिया वीक’ उपक्रमाचे ब्रॅण्ड एम्बेसिडर म्हणून कलाम यांचे नाव निश्चित :
- केंद्र सरकारच्या प्रतिष्ठेच्या अशा ‘डिजिटल इंडिया वीक’ उपक्रमाचे ब्रॅण्ड एम्बेसिडर म्हणून माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे नाव निश्चित करण्यात येणार आहे.
- या उपक्रमाविषयी व्यापक योजना तयार करण्याच्या दृष्टीने सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका बैठकीचे आयोजन केले आहे.
- जुलै महिन्यात हा उपक्रम आयोजित करण्यात येणार असून यात केंद्र सरकारची खाती आपल्या विविध सेवां ऑनलाइन करणार आहेत.
- डिजिटल इंडिया वीकच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याची योजना सरकारने आखली आहे.
-
राज्यात मापिसा हा नवा कायदा येणार :
- राज्यातील अंतर्गत सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी ‘महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरनल सिक्युरिटी’ (मापिसा) हा नवा कायदा आणण्यात येणार आहे.
-
- या कायद्याद्वारे सरकारी, निमसरकारी, खासगी आस्थापना, मॉल्स, सार्वजनिक स्थळे यांचे सुरक्षा ऑडिट सक्तीचे केले जाणार आहे.
- तसेच 100 पेक्षा जास्त लोकसहभागाचे समारंभ, मेळावे, सभा यासाठी पोलिसांची परवानगी तसेच त्याच्या सुरक्षेची जबाबदारी आयोजकांवर सोपविण्यात येणार आहे.
- या कायद्याअंतर्गत सुरक्षेला धोका पोहोचविणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूदही असल्याची म्हटले आहे.
फोन मध्येच कट झाल्यास आता पैसे परत मिळणार :
- मोबाईलवर बोलताना फोन मध्येच कट झाल्यास आता पैसे परत मिळणार आहेत.
- या योजनेची सुरवात ऑगस्ट महिन्यात सुरू होणार आहे.
- परंतु हे पैसे आपल्याला बॅलन्सच्या रूपात मिळणार आहेत.
- जर आपला कॉल ड्रॉप होत असेल, तर जितके सेकंद किंवा मिनिटांचे पैसे कट होतील, तितकेच पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होतील.
- ही रक्कम आपल्या बॅलन्समध्ये आठवड्यातून एकदा जमा होईल.
- केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आपल्या बॅलन्समध्ये जमा होणारा हा पैसा कॉल ड्रॉपनंतर कंपन्यांवर लावलेल्या दंडाद्वारे मिळेल असे सांगितले आहे.
बीजिंग शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी :
- चीनची राजधानी असलेल्या बीजिंग शहरामध्ये आता एका नव्या कायद्यान्वये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास बंदी घालण्यात आली आहे.
- चीनमध्ये धूम्रपान करणाऱ्या नागरिकांची संख्या 30 कोटींपेक्षाही जास्त असून; दरवर्षी धूम्रपानाशी संबंधित आजारांमुळे देशात 10 लाखांपेक्षाही जास्त नागरिकांचा मृत्यु होतो.
- आता या नव्या कायद्यांतर्गत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कार्यालये आणि उपहारगृहांमध्ये धूम्रपानावर बंदी घालण्यात आली आहे.
- जगातील एक तृतीयांश सिगरेट्स केवळ चीनमध्येच ओढल्या जातात.
नरेंद्र मोदी यावर्षी इस्राईल दौऱ्यावर जाणार :
- नरेंद्र मोदी यावर्षी इस्राईल दौऱ्यावर जाणार आहेत.
- मोदी हे इस्राईलला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान ठरतील.
- इस्राईल दौऱ्याच्या तारखा अद्याप निश्चित झाल्या नाहीत, मात्र या वर्षात नंतर इस्राईलसह पॅलेस्टाईन आणि जॉर्डन या देशांच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी जाहीर केले.
क्रिकेटपटू सचिन, गांगुली आणि लक्ष्मण यांचा बीसीसीआय सल्लागार समितीत समावेश :
- माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हिव्हिएस लक्ष्मण यांचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सल्लागार समितीत समावेश करण्यात आला आहे.
- या तीन दिग्गज खेळाडूंना नव्याने तयार केलेल्या सल्लागार समितीत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनविशेष :
- 1990 – श्रीराम शर्मा यांचे महाप्रयान.
- 1926 – अभिनेता सूर्यकांत मांढरे यांचा जन्म.