Current Affairs of 11 March 2018 For MPSC Exams

चालू घडामोडी (11 मार्च 2018)

भारत आणि फ्रान्समध्ये 14 महत्वाचे करार

  • भारत दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये हैदराबाद हाऊसमध्ये बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांमध्ये एकूण 14 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
  • यामुळे संरक्षण, अवकाश आणि उच्च तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक वाढवणार असल्याचे म्हटले जात आहे.
  • चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेल्या मॅक्रॉन 12 मार्चपर्यंत भारतात आहेत.

भैय्याजी जोशी यांची रा. स्व. संघाच्या सरचिटणीसपदी चौथ्यांदा निवड :

  • भैय्याजी जोशी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरचिटणीसपदी (सरकार्यवाहक) निवड करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते या पदावर कार्यरत असणार आहेत.
  • सलग चौथ्यांदा जोशी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. संघाच्या नागपूर येथील मुख्यालयात झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 मार्च 2018)

50 कोटींहून अधिक कर्ज घेणाऱ्यांच्या पारपत्राचे तपशील बँकांना बंधनकारक :

  • 50 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचे कर्ज घेणाऱ्या ऋणकोंच्या पारपत्राचे तपशील घेणे बँकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
  • घोटाळा झाल्यास कर्जदार घोटाळेदारांना देशातून पळून जाण्यास अटकाव करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले जाते.
  • कर्जदाराच्या पारपत्राचे तपशील जवळ असल्याने, घोटाळेबाजांनी पळून जाऊ नये यासाठी वेळेवर कृती करणे आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवणे बँकांना शक्य होणार आहे.
  • तसेच 50 कोटींवरील विद्यमान कर्जाच्या बाबतीत, कर्जदारांच्या पारपत्राचे तपशील 45 दिवसांच्या आत गोळा करण्यास बँकांना सांगण्यात आले आहे.

मतदार ओळखपत्रांशी ‘आधार’ संलग्नता अनिवार्य :

  • आधार संलग्नतेबाबत आपल्या पूर्वीच्या भूमिकेत बदल करत, 12 आकडी आधार क्रमांक सर्व मतदार ओळखपत्रांशी संलग्न करणे अनिवार्य करण्यात यावे, असा अर्ज निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला असल्याची माहिती देण्यात आली आहे.
  • आधार क्रमांक मतदार ओळखपत्रांशी संलग्न करण्यास निवडणूक आयोग नेहमीच अनुकूल राहिलेला असला तरी ही संलग्नता पूर्णपणे ऐच्छिक असावी अशी भूमिका त्याने यापूर्वी न्यायालयात घेतली होती.
  • मार्च 2017 मध्ये संमत करण्यात आलेल्या आणि चार महिन्यांनी, जुलैमध्ये अधिसूचित करण्यात आलेल्या आधार कायद्यान्वये जीवनाच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात आधारची जोडणी अनिवार्य करण्यात आली आहे.

सुलतान अझलन शहाला हॉकी स्पर्धेत पाचवे स्थान :

  • भारतीय हॉकी संघाने आयर्लंडचा 4-1 च्या गोल फरकाने धुव्वा उडवत सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत पाचवे स्थान मिळवले आहे.
  • सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय हॉकी संघाने आपल्या खेळात कमालीची सुधारणा केल्याचे दिसून आले आहे.
  • भारताकडून वरुण कुमारने सामन्याच्या पाचव्या आणि 32 व्या मिनिटाला, शिलानंद लाकराने 28व्या मिनिटाला आणि गुरजत सिंगने 37 व्या मिनिटाला गोल केला आहे.

नव्या तेजस एक्‍स्प्रेसला 18 मार्चला हिरवा झेंडा :

  • लखनौ-आनंदविहारदरम्यान सुरू होत असलेल्या तेजस एक्‍स्प्रेस या निमवेगवान गाडीला रेल्वेमंत्री पीयूष गोयल येत्या 18 मार्च रोजी हिरवा झेंडा दाखवतील आहे.
  • सध्या लखनौ-दिल्लीदरम्यान धावणारी डबलडेकर रेल्व गाडी आता जयपूरपर्यंत जाणार असून, तिलाही गोयल हिरवा झेंडा दाखवतील आहे.
  • रेल्वेच्या ताफ्यातील तेजस एक्‍स्प्रेस ही निमवेगवान गाडी पूर्ण वातानूकुलित असून, त्यात स्वयंचलित दरवाजांसह अनेक आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
  • तसेच या गाडीचा सर्वसाधारण वेग ताशी 130 किलोमीटर असून, काही विभागांत ती ताशी 180 किलोमीटरच्या वेगाने धावेल.
  • लखनौ-आनंदविहार तेजस एक्‍स्प्रेस आठवड्यातून सहा वेळा धावणार असून, या प्रवासात ती फक्त कानपूरला पाच मिनिटे थांबणार आहे.

कॅनडाने पहिल्यांदा नोटेवर महिलेचा छापला फोटो :

  • कॅनडात 72 वर्षांपूर्वी वोइला डेस्मंड यांनी वर्णभेदाविरोधात आंदोलन सुरू केले होते. मृत्यूच्या 53 वर्षांनंतर त्यांच्या संघर्षाला नवी ओळख मिळाली.
  • कॅनडा बँकेने 10 डॉलरची नवीन नोट जारी केली. यात डेस्मंड यांच्या रूपाने पहिल्यांदा एखाद्या महिलेचा फोटो नोटेवर घेतला आहे.
  • यासाठी मतदानात 26 हजार लोकांनी वोइला यांच्या फोटोसाठी मत दिले आहे.
  • 1946 मध्ये वोइला यांनी कॅनडात सार्वजनिक जागी श्वेत वर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेच्या नियमांविरुद्ध आवाज उठवला होता.

दिनविशेष :

  • 1818 : इंग्रज फौजांनी पुरंदर किल्ल्याला वेढा घातला.
  • 1989: पंडिता रमाबाई यांनी मुंबई मध्ये शारदासदन हि शाळा विधवा आणि कुमारीकांसाठी सुरु केली.
  • 1984: ओअहिली आधुनिक जहाज जलउषा हिचे विशाखापट्टणम् येथे जलावरण झाले.
  • 1999: नॅसडॅक शेअरबाजारात जागा मिळवणारी इन्फोसिस ही पहिली भारतीय कंपनी झाली.
  • 1689: छत्रपती संभाजी राजे भोसले यांचे निधन.
  • 1955: नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंग यांचे निधन.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (12 मार्च 2018)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago