आंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 5

आंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 5

 • ‘विन्सस्ट’ चक्रीवादळाचा तडाखा बसलेला देश- फिजी हा आहे.
 • युगांडाच्या अध्यक्षपदी तिसर्‍यांदा 20 फेब्रुवारी 2016 रोजी योवेरयी मुसेवेनी यांची निवड झाली.
 • ब्रिटन या राष्ट्राला युरोपीयन संघात विशेष दर्जा देण्यात आला.
   
 • ‘इंटरनेट संपर्क स्थिती 2015’ अहवालानुसार जागतिक स्तरावर इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या 3.2 ग्राहक आहेत.
 • सौरऊर्जा वापरणारी जगातील पहिली संसद पाकिस्तानची होय.
 • 24 फेब्रु. व्हॉटसअप दिन, 24 फेब्रु. 2009 रोजी अमेरिकेतील जॉन कौम याने व्हॉटसअप ही कंपनी स्थापन केली. 19 फेब्रु, 2014 रोजी फेसबुकने ही कंपनी 19.3 बिलियन डॉलर्सला विकत घेतली.
 • व्हॉटस अप हे नाव जॉन कौम यांनी शोधले.
 • भारत सरकार सौरऊर्जा प्रकल्पाकडून ऊर्जा खरेदी करण्यासाठी जे करार करीत आहे ते आंतरराष्ट्रीय नियमांच्या विरोधात आहे. असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
 • युगांडामधील झिंका या जंगलातील ‘र्हेसस’ प्रकारच्या एका आजारी माकडास झिंका व्हायरस 1947 मध्ये आढळून आला होता. झिंका या जंगलात सापडल्यामुळे या विषाणूला ‘झिंका’ हे नाव देण्यात आले झिंका हा विषाणू ‘एडिस इजिप्टी’ या डासामुळे पसरतो.
 • लंडनचा वारसा असलेले ‘ओल्ड वॉर हाऊस’ ही इमारत भारतीय कंपनी ‘हिंदुजाने विकत घेतली. हा सौदा 3 हजार कोटी रुपयांत झाला. दुसर्‍या महायुद्धात इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल ओल्ड वॉर ऑफिसमधून कामकाज पाहत ही इमारत 7 मजली आहे. 58,0000 चौ.फु. क्षेत्रफळ 1100 खोल्या आहेत. 17 वे शतक ते 1964 पर्यंत ही इमारत ब्रिटीश सैन्य मुख्यालय होते.
 • ‘जीएन-झेड-11’ नावाची आकाशगंगा शास्त्राज्ञांना सापडली आहे. नासाच्या हबल दुर्बिणीच्या सहाय्याने तिचा शोध घेण्यात आला. ही आकाशगंगा सर्वात जुनी व दूर आहे. 13.8 अब्ज प्रकाशवर्ष अंतरावर ही आकाशगंगा आहे.
 • भ्रष्टाचाराच्या आरोपावरून इराणमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती बबक मूर्तजा जनजनी यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
 • आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सर्वेक्षणानुसार महिला संचालक नेमण्यात भारत जगात 26 व्या स्थानी आहे. (भारतात महिला संचालकांची संख्या केवळ 7 टक्के आहे.) या यादीत पहिल्या स्थानावर नार्वे (महिला संचालकाची संख्या 40% आहे.) स्वीडन (29.31%) फिनलँड (25.89), दक्षिण आफ्रिका (18.31%), अमेरिका (17.37%) आहे.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.