Complete Guidance For MPSC Exams, Current Affairs, Rajyaseva, PSI, STI Exams, Job Alerts 2020

आंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 2

आंतरराष्ट्रीय घडामोडी संकीर्ण भाग 2

 • संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी चीनच्या दौरा केला (18 एप्रिल 2016)
 • युरोप हा खंड हिवताप मुक्त झाला असल्याचे जागतिक आरोग्य संघटने जाहिर केले. (21 एप्रिल 2016). हिवतापापासून मुक्त होणारा युरोप हा पहिलाच प्रदेश आहे.
 • गुलामगिरीच्या कुप्रथेविरोधात बंड करून गुलामांच्या मुक्ततेसाठी चळवळ उभारणार्‍या अमेरिकन नेत्या हॅरिएट टबमॅन यांचे छायाचित्र 20 डॉलरच्या नोटेवर छापण्याचा निर्णय अमेरिकन सरकारने घेतला (20 एप्रिल 2016)
 • इंग्रजी साहित्यीक विल्यम शेक्सपियर यांची 400 वी पुण्यतिथी साजरी (23 एप्रिल 2016) जन्म 23 एप्रिल 1616.
 • वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रामध्ये चीन उभारणार तरंगते अणुऊर्जा केंद्र.
 • अमेरिकेतील एका मार्गाला ‘डॉ. संपत शिवांगी लेन’ असे नाव देण्यात आले आहे. डॉ. शिवांगी अमेरिकेतील भारतीय वंशाचे सामाजिक कार्यकर्ते, अमेरिकेत मेंटल हेल्थ विभागाचे प्रमुख आहेत. आरोग्य क्षेत्रातील सर्वोच्च पदावर जाणारे ते पहिलेच आशियाई व्यक्ती आहेत.
 • प्रदूषण नियंत्रित करून पृथ्वीचे तापणे कमी करणे हा संकल्प जागतिक वसुंधरा दिनानिमित्य करण्यात आला. (22 एप्रिल 2016 युनो)
 • हरितवायु सर्वाधिक उत्सर्जन करणारा देश अमेरिका होय.
 • जगात सर्वाधिक मलेरिया रुग्ण आफ्रिका खंडात आहे. भारतात उत्तर आणि ईशान्यकडील राज्यात प्रामाण अधिक, महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आहेत.
 • अमेरिकेतील नेब्रास्का विद्यापीठाने संशोधन प्रकल्पाला ‘भंवरलाल हिरालाल जैन वॉटर फॉर फूड कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम’ असे नाव दिले आहे.
 • 2016-30 या दशक वर्षात किमान 10 देशांतून हिवताप समुळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट जागतिक आरोग्य संघटनेने ठरविले आहे.
 • जगातील सर्वाधिक हिवताप ग्रस्त देश-आफ्रिका खंडातील अल्जेरिया, वोटस्वाना, केपबर्डे, कोर्मोरोस, दक्षिण आफ्रिका, स्वित्झर्लंड हे देश आहेत. 2020 पर्यंत या देशातून सुमळ उच्चाटन जागतिक आरोग्य संघटनेचे उद्दिष्ट आहे.
 • भारताने चीनचे बंडखोर नेते डोलकून इसा, ली जिंगूह रा वोंग यांना व्हिसा नाकारला होता. हे नेते धर्मशाळा येथे लोकशाही आणि चीन या विषयावर होणार्‍या परिषदेला येणार होते.
 • जेएफ-17 बी विमान निर्मिती पाकिस्तान व चीन संयूक्तपणे करणार आहेत.
 • गहू निर्यात करणारा जगातील अग्रेसर देश – रशिया, अमेरिका, कॅनडा.
 • बिकट परिस्थितीत पोटाची खळगी भरण्यासाठी कलेली अन्न चोरीही गुन्हा म्हणून, गृहीत धरता येणार नाही असा इटली सर्वोच्च न्यायालयाने दिला.
You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC World