8 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 फेब्रुवारी 2022)
इंदूरमध्ये लतादिदींच्या नावे संगीत अकादमी व संग्रहालय उभारणार :
भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं.
तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
इंदूरमध्ये स्व. लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमी स्थापन केली जाईल.
तसेच एक संग्रहालयही बांधले जाईल, ज्यामध्ये लताजींनी जे काही गायले आहे ते उपलब्ध असेल.
इंदूरमध्येच त्यांचा पुतळा बसवला जाईल आणि दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी लता मंगेशकर पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.
प्राध्यापिका शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची देशातील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) नवीन कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर शांतिश्री धुलीपुडी पंडित या जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू असतील.
तसेच त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. याआधी त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक होत्या.
शांतिश्री धुलीपुडी, या जेएनयूच्या 13 व्या कुलगुरू होणार आहेत.
पंडित या प्राध्यापक एम. जगदेश कुमार यांच्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी नियुक्त होणार आहे.
जेएनयूच्या कुलगुरूपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी पूर्ण झाल्यापासून एम जगदेश कुमार हे कार्यवाहक कुलगुरू म्हणून जबाबदारी पार पाडत होते.
नितीन गडकरी यांना कार्यक्षम खासदार पुरस्कार जाहीर :
नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा 2020-21- वर्षासाठीचा कार्यक्षम खासदार पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे.
10 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता नवी दिल्लीतील निवासस्थानी गडकरी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
तसेच यापूर्वी हा पुरस्कार महाराष्ट्रातील कार्यक्षम आमदारांना दिला जात होता.
तर आता या पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली असून वर्षाआड हे पुरस्कार विधीमंडळ सदस्य आणि संसद सदस्य यांना दिले जाणार आहेत.
रुपये 50 हजार रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अहमदाबाद संघाचं नाव ठरलं :
आयपीएल 2022च्या तयारीला सुरुवात झाली आहे.
आयपीएलच्या या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे.
अहमदाबाद फ्रेंचायझीने आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली आहे. हा संघ आता अहमदाबाद टायटन्स नावाने ओळखला जाईल.
तर अहमदाबादपूर्वी लखनऊ फ्रेंचायझीने आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली. लखनऊ संघाने नाव लखनऊ सुपरजायंट्स असे आहे.
केएल राहुल लखनऊ संघाचा कप्तान आहे, तर हार्दिक पंड्या अहमदाबाद संघांचे नेतृत्व करणार आहे.
दिनविशेष:
भारताचे तिसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 मध्ये झाला.
सन 1936 मध्ये 16 सप्टेंबर 1935 रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.
NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांकसन 1971 पासून सुरू झाला.
सन 1994 मध्ये भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी 432 बळींचा जागतिक विक्रम केला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय सन 2000 या वर्षीपासून घेण्यात आला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.