राजीव गांधी यांच्याऐवजी आता मेजर ध्यानचंद पुरस्कार
7 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2021)
राजीव गांधी यांच्याऐवजी आता मेजर ध्यानचंद पुरस्कार :
देशाच्या क्रीडाक्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला शुक्रवारी मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे.
तर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघाने केलेल्या कामगिरीमुळे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची देशातील नागरिकांनी आग्रही मागणी केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
तसेच देशातील नागरिकांच्या भावनांचा आदर करून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल.
हॉकीच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार ध्यानचंद यांनी भारताला या खेळात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळेच त्यांचे नाव या पुरस्काराला देण्यात आले आहे, असे ‘ट्वीट’मोदी यांनी केले.
देशांत कोरोनोची दुसरी लाट ओसरत असून जनजीवन सुरळित सुरु झालं असताना आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो पुनश्च हरिओम म्हणत उपग्रह प्रक्षेपण मोहिमांना सुरुवात करत आहे.
तर येत्या 12 ऑगस्टला इस्त्रो 2268 किलो वजनाचा EOS-03 हा उपग्रह GSLV-F10 या प्रक्षेपकाद्वारे भूस्थिर कक्षेत पाठवणार आहे.
तसेच पहाटे पाच वाजून 43 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण नियोजित आहे.
तर या उपग्रहामुळे भारतीय उपखंडातील विविध भागाची 24 तास सुस्पष्ट छायाचित्रे घेणे शक्य होणार आहे.
पीक लागवडीच्या क्षेत्राबद्दल माहिती घेणे, दुष्काळ-पूर परिस्थीतीवर लक्ष ठेवणे, सागरी क्षेत्र व्यवस्थापन, वातावरणातील धुकं-धुळ याबद्दलची ताजी माहिती, आपातकालीन व्यवस्थापन अशा विविध गोष्टींसाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.
बर्नार्ड अर्नाल्ट बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती :
लूई विटॉनचे (Louis Vuitton) मालक बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnoult) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
तर त्यांनी अमॅझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क यांना मागे टाकलंय.
तसेच फोर्ब्सच्या रियल-टाइम बिलिनेयर्स लिस्टमध्ये त्यांचं नाव सर्वात वर आहे.
अर्नाल्ट यांची एकूण संपत्ती 198.9 अब्ज डॉलर आहे. तर जेफ बेझोस 194.9 अब्ज डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आणि एलन मस्क 185.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
बर्नार्ड अर्नाल्ट हे 72 वर्षीय फ्रेंच उद्योजक आहेत. ते ब्रांड लूई विटॉन मोएट हेनेसीचे मालक आहेत. अर्नाल्ट यांच्याजवळ एकूण 70 ब्रांड्स आहेत.
तर त्यामध्ये लुई वीटन, मार्क जॅकब्स, केंजो, स्टेला मेकार्टनी फेंडी, क्रिश्चियन डायर, गिवेंची, सेफोरा यांसारख्या फेमस ब्रांडचा समावेश आहे.
मरिन प्रशिक्षकपदावरून पायउतार :
भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक वाटचालीत मोलाची भूमिका बजावणारे शोर्ड मरिन यांनी शुक्रवारी प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
कांस्यपदकाच्या लढतीत ब्रिटनविरुद्ध पराभूत झाल्यानंतर ऑनलाइन पत्रकार परिषदेदरम्यान 47 वर्षीय मरिन यांनी हा निर्णय जाहीर केला.
तर 2017 मध्ये मरिन यांना सर्वप्रथम महिला संघाचे प्रशिक्षकपद बहाल करण्यात आले.
मात्र त्या वर्षाच्या अखेरीसच त्यांना पुरुष संघांच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली.
अखेर 2018 मध्ये विश्वचषकापूर्वी त्यांच्याकडे पुन्हा महिलांच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपवण्यात आली.
दिनविशेष :
पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 मध्ये रोजी झाला.
7 ऑगस्ट 1941 हा दिवस जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांचा स्मृतीदिन आहे.
मुंबई महानगरपालिकेने 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
सलग 128 वर्षे प्रकाशित झाल्यावर ‘द वॉशिंग्टन स्टार‘ हे वृत्तपत्र सन 1981 मध्ये बंद पडले.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.