7 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

7 April 2019 Current Affairs In Marathi

7 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 एप्रिल 2019)

‘मिशन शक्ती’ मधील चाचणी धोका टाळण्यासाठी कमी उंचीवर:

  • भारताने 27 मार्च रोजी मिशन शक्ती अंतर्गत उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची जी चाचणी केली ती तीनशे किमीपेक्षाही कमी उंचीवरची होती, या चाचणीमुळे होणाऱ्या उपग्रहाच्या तुकडय़ांचा धोका आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाला व इतर उपग्रहांना पोहोचू नये यासाठीच ती कमी उंचीवर घेण्यात आली, असे स्पष्टीकरण संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी केले आहे.
  • तसेच भारताच्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्र चाचणीमुळे अवकाश स्थानकाला धोका असल्याचे नासाने अलीकडेच म्हटले होते त्यावर रेड्डी यांनी डीआरडीओ भवन येथे सांगितले की, उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची क्षमता खरेतर 1000 कि.मी. उंचीवरील क्षेपणास्त्र नष्ट करण्याची होती. तरी 300 कि.मी.ची कक्षा निवडण्यामागे या चाचणीतील अवकाश कचऱ्यामुळे अवकाशस्थ मालमत्तांची हानी होऊ नये हा हेतू होता असे त्यांनी स्पष्ट केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 एप्रिल 2019)

शत्रुघ्न सिन्हा अधिकृतपणे काँग्रेसमध्ये :

  • भाजपनेतृत्वावर सातत्याने टीका करून मोदी-शहा यांचा अधिकाधिक रोष ओढवून घेणारे अभिनेते-खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी अधिकृतपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
  • तर त्यानंतर काही तासांतच काँग्रेसने पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारीही घोषित केली.
  • तसेच बिहारमधील हा मतदारसंघ शत्रुघ्न सिन्हांचा पारंपरिक मतदारसंघ असून त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद यांच्याविरोधात शड्डू ठोकला आहे.

अमेरिकेच्या ‘एच 1 बी’व्हिसासाठी 65 हजार अर्ज:

  • अमेरिकी काँग्रेसने एच 1 बी व्हिसासाठी ठरवून दिलेल्या 65 हजारांच्या मर्यादेइतके अर्ज दाखल झाले असल्याची माहिती अमेरिकेच्या नागरिकत्व व स्थलांतर सेवा विभागाने दिली आहे.
  • तसेच 2020 या वर्षांसाठी हे अर्ज असून भारतीय व्यावसायिकांसह इतर देशांच्या लोकांचेही अर्ज आले आहेत.
  • एच 1 बी हा अस्थलांतरित व्हिसा असून त्यामुळे परदेशी लोकांना अमेरिकी कंपन्यात काम करण्याची संधी मिळते. त्यासाठी त्यांची सैद्धांतिक व तांत्रिक निपुणता हा महत्त्वाचा निकष मानला जातो.
  • तर अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्या या व्हिसामार्फत देशात येणाऱ्या कु शल कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतात. भारत व चीन या दोन देशांचे कर्मचारी यात सर्वाधिक प्रमाणात असतात.
  • अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर सेवेने म्हटले आहे की, एच 1बी व्हिसासाठी 65 हजारांची अर्ज मर्यादा असली तरी 2020 या आर्थिक वर्षांसाठी पुरेसे अर्ज आलेले आहेत.
  • तसेच हे वर्ष 1 ऑक्टोबर 2019 पासून सुरू होणार आहे. अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर विभागाने 1 एप्रिलपासून अर्ज मागवले होते.

दिनविशेष:

  • 7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन
  • आर्य समाजाची स्तपना 7 एप्रिल 1875 मध्ये झाली.
  • 7 एप्रिल 1906 मध्ये माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
  • पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वाशिग्टन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन 7 एप्रिल 1940 मध्ये ठरले.
  • 7 एप्रिल 1947 मध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO)ची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 एप्रिल 2019)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.