5 फेब्रुवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

5 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 फेब्रुवारी 2022)

बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकला प्रारंभ :

  • बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकचा शानदार उद्घाटन सोहळा शुक्रवारी झाला.
  • तर या निमित्ताने बीजिंग हा दोन्ही ऑलिम्पिकचे आयोजन करणारा पहिलाच देश ठरला आहे.
  • चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनिपग आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांच्या उपस्थितीत नॅशनल स्टेडियमवर झालेल्या या सोहळय़ात लेझर-किरणांचा देखावा सादर करण्यात आला.
  • भारताने या स्पर्धेच्या प्रक्षेपणावर बहिष्कार टाकला असून आरिफ खान हा एकमेव भारतीय स्पर्धक या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाला आहे.

उत्तर प्रदेशचा चित्ररथ ठरला सर्वोत्तम :

  • प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील संचलनात सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आलं आहे.
  • त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या चित्ररथालाही सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ हा पुरस्कार मिळाला आहे.
  • सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिलीय.
  • यंदा संचलनात जवळपास 12 राज्यांचे आणि 9 मंत्रालयांचे असे 21 चित्ररथ सहभागी झाले होते.
  • त्याचप्रमाणे भारतीय नौदलाच्या चित्ररथाला सर्व सेवा दलांमधील सर्वोत्तम चित्ररथाचा मान मिळालाय.
  • तर याच गटामधील सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ म्हणून हवाई दलाच्या चित्ररथाला गौरवण्यात आलं आहे.
  • मंत्रालयांच्या चित्ररथांपैकी शिक्षण मंत्रालय आणि नागरी उड्डयन मंत्रालयाच्या चित्ररथांना पुरस्कार विभागून देण्यात आलाय.

योगी आदित्यनाथ आज गोरखपूरमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार :

  • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार योगी आदित्यनाथ आज गोरखपूर (शहर) मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी दाखल करणार आहेत.
  • तर, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सर्व तयारी प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी पूर्ण केलेली आहे.
  • पाच वेळा माजी लोकसभेचे खासदार राहिलेले योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदाच राज्य विधानसभेची निवडणूक उमेदवार म्हणून लढवत आहेत.
  • तर, अमित शाह यांनी यापूर्वीच योगी आदित्यनाथ यांना पक्षाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून घोषित केलेलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘नीट पीजी’ परीक्षा पुढे ढकलली :

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने NEET PG परीक्षा 2022 सहा ते आठ आठवड्यांनी पुढे ढकलली आहे.
  • तर याआधी ही परीक्षा 12 मार्च रोजी होणार होती.
  • तसेच आता ती परीक्षा मे-जून मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दिनविशेष:

  • चार्ली चॅप्लिनने सन 1919 मध्ये इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली होती.
  • सन 1952 मध्ये स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या.
  • सन 2003 या वर्षी भारताने 2002 मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
  • पुण्याची स्वाती घाटे ही सन 2004 या वर्षी बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.
Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago