30 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs

आर्टेमिस- 1 मोहीम

30 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (30 ऑगस्ट 2022)

तातडीच्या दाव्यांसाठी गुरुवारपासून नवी यंत्रणा :

  • तातडीचे दावे सूचिबद्ध करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय लवकरच नवी यंत्रणा कार्यान्वित करणार आहे, असे सरन्यायाधीश उदय लळित यांनी सोमवारी सांगितले.
  • येत्या गुरुवारपासून त्यांची अंमलबजावणी सुरू होईल, असेही न्यायमूर्ती लळित यांच्या नेतृत्वाखालील द्विसदस्यीय पीठाने स्पष्ट केले.
  • तातडीच्या दाव्यांच्या सुनावणीसाठी त्यांना सूचिबद्ध करण्याबाबतच्या मुद्याकडे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले.
  • त्यावर, नोंदणी करण्यात आलेले प्रत्येक प्रकरण कधी ना कधी सूचिबद्ध होतेच आणि त्याचा समावेश अद्ययावत सूचितही होतो.
  • अशी प्रकरणे 10 दिवसांत सूचिबद्ध होतात किंवा अद्ययावत यादीत त्यांचा समावेश होतो, असे न्यायमूर्ती लळित यांनी स्पष्ट केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 ऑगस्ट 2022)

नासाची आर्टेमिस- 1 मोहीम पुढे ढकलली:

  • अमेरिकन अंतराळ संस्था नासाची आर्टेमिस-1 चंद्र मोहीम पुढे ढकलण्यात आली आहे.
  • रॉकेटचे प्रक्षेपण सोमवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.03 वाजता होणार होते.
  • मात्र, रॉकेटच्या चार इंजिनांपैकी एका इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रक्षेपणाच्या काही मिनिटापूर्वीच रॉकेटचे उड्डाण थांबवण्यात आले.
  • 2 सप्टेंबर रोजी रात्री 10.18 वाजता रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
  • आर्टेमिस-1 ही मानवरहित मोहीम आहे.
  • पहिल्या उड्डाणासह, शास्त्रज्ञांनी चंद्रावरील परिस्थिती अंतराळवीरांसाठी योग्य आहे की नाही हे शोधण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

रिटेल व्यवसाय प्रमुखपदी ईशा अंबानीची नियुक्ती :

  • देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये फाइव्ह जीसंदर्भात मोठी घोषणा करण्यात आली आहे.
  • या सभेमध्ये आपल्या भाषणात रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी जगभरातील गुंतवणुकदारांचं लक्ष लागलेल्या भाषणामध्ये ही घोषणा केली.
  • या सभेमध्ये मुकेश अंबानी यांनी आपली मुलगी ईशा अंबानी हिचा समूहाच्या रिटेल व्यवसाय प्रमुख म्हणून ओळख करुन दिली.
  • यापूर्वी मुकेश अंबानी यांनी मुलगा आकाश याला समूहाची टेलिकॉम शाखा रिलायन्स जिओच्या अध्यक्षपदी नियुक्त केले होते.

भारतातील पहिली सरकारी ऑनलाइन टॅक्सी सेवा :

  • केरळ सरकारने नुकतीच ‘केरळ सवारी’ ही ऑनलाइन टॅक्सी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • ही देशातील पहिली राज्य सरकारच्या मालकीची ऑनलाइन टॅक्सी सेवा आहे.
  • रिक्षा आणि टॅक्सी चालकांना योग्य मोबदला मिळेल आणि प्रवाशांचंही हित जपलं जाईल, या दोन्ही गोष्टींचा विचार करून केरळ सरकारने ही देशातील पहिली ऑनलाइन टॅक्सी सेवा सुरू केली आहे.
  • सरकारने ठरवून दिलेल्या माफक प्रवास भाड्यात जनतेला सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी केरळ सरकारने ‘केरळ सवारी’ ही ऑनलाइन टॅक्सीसेवा सुरू केली आहे.
  • सरकारने ठरवून दिलेल्या प्रवास भाड्यात नागरिकांना प्रवास करता येणार आहे.
  • ही टॅक्सी सेवा कामगार विभागाच्या अधिपत्याखाली मोटर कामगार कल्याण मंडळाद्वारे (Motor Workers Welfare Board) चालवली जाणार आहे.
  • ‘केरळ सवारी’ बाबतचे अॅप लवकरच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिलं जाणार आहे.

दिनविशेष :

  • 30 ऑगस्ट 1835 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली.
  • अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना 30 ऑगस्ट 1835 मध्ये झाली.
  • नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ अर्नेस्ट रुदरफोर्ड यांचा 30 ऑगस्ट 1871 मध्ये जन्म झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (31 ऑगस्ट 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago