Current Affairs (चालू घडामोडी)

3 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

3 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 मे 2020)

जनधन खात्यांमध्ये 4 मे पासून पैसे जमा होणार :

  • महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात 500 रुपयांच्या शासकीय मदतीचा दुसरा हप्ता सोमवारपासून पाठविण्यात येणार आहे.
  • कोरोना संकटामध्ये गरीबांना मदत म्हणून अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी 26 मार्चला घोषणा केली होती.
  • तर यामध्ये महिलांना त्यांच्या जनधन खात्यामध्ये एप्रिलपासून 500 रुपये टाकण्यात येणार होते. 4 मे पासून दुसऱ्या महिन्याचे पैसे टाकण्यात येणार आहेत.
  • मात्र, हे पैसे खात्यात जमा झाल्या झाल्या काढता येणार नाहीत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार पुढील तीन महिने हे पैसे मिळणार आहेत. हे पैसे काढण्यासाठी केंद्र सरकारने काही अटी घातल्या आहेत. यानुसारच या महिला खातेधारक त्यांच्या खात्यातून पैसे काढू शकणार आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 मे 2020)

‘अतुल्य’ करणार कोरोना विषाणूचा सफाया :

  • संपूर्ण जगात कोरोना विषाणूने प्रभावीत झाले असून या विषाणूपासून वाचण्यासाठी शास्त्रज्ञ अभियंते विविध उपकरणे बनवत आहेत.
  • तर असेच एक उपकरण पुण्यातील डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्नोलॉजी (डायट) संस्थेने बनवले असून हे उपकरण कुठल्याही वस्तू, धातु आणि कपड्यांवरील कोरोनाच्या विषाणू नष्ट करू शकते.
  • तसेच या उपकरणाचे ‘अतुल्य’ असे नामकरण करण्यात आले असून संरक्षण आणि संशोधन विकास संस्थेने (डिआरडीओ) मोठ्या प्रमाणात हे उपकरण बनविण्यास सांगितले आहे.
  • कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी विविध संस्था झटत आहेत. भारतात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. या विषाणूपासून दुर राहण्यासाठी सॅनिटायझर यंत्र, माक्स, हेडशिल्ड संरक्षण आणि विकास संस्थेने या पूर्वी विकसीत केले आहे. मात्र, धातू, वस्तूंवरील विषाणू नष्ट करण्यासाठी संशोधन सुरू होते.
  • पुण्यातील डिफेन्स इस्टिट्यूट ऑफ अ‍ॅडव्हान्स टेक्लॉलॉजी (डायट) संस्थेने या पूर्वी या प्रकारच्या यंत्राची निर्मिती केली आहे. त्यामुळे वस्तूवरील विषाणू नष्ट करण्यासाठी एक प्रभावी उपकरण बनविण्यासाठी गेल्या 21 दिवसांपासून डायटचे तंत्रज्ञ झटत होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
  • यापूर्वी डायटमध्ये कापूस, इंजेक्शन, सॅनिटरी पॅड, प्लॅस्टिक तसेच विविध आरोग्य उपकरांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी यंत्र बनविले आहे. याच धरतीवर कोरोना विषाणू नष्ट करण्यासाठी त्यांनी अतुल्यह्ण या उपकरण तयार करण्यास सुरूवात केली.

कोविड वॉरियर्सना एअर फोर्स देणार सलामी :

  • करोना व्हायरसविरोधात डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि मीडिया आघाडीवर राहून लढाई लढत आहेत.
  • तर आपला जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करणाऱ्या या कोविड योद्ध्यांना आज तिन्ही सैन्य दलांकडून विशेष मानवंदना देण्यात येणार आहे.
  • कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियन एअर फोर्स फ्लाय पास्ट करणार आहे.
  • काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते गुजरातचं कच्छ असे दोन फ्लायपास्ट एअर फोर्सकडून करण्यात येतील.
  • यामध्ये भारताची अत्याधुनिक फायटर विमाने, ट्रान्सपोर्ट एअर क्राफ्टचा समावेश असेल. समुद्रात भारतीय नौदलांकडूनही कोविड योद्ध्यांना सलामी देण्यात येईल.
  • तसेच यावेळी भारतीय युद्धजहाजांवर विशेष रोषणाई करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय इमारतींबाहेर लष्कराकडून विशेष बॅण्डचे वादन होईल. करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाईल.

आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातला हलवले :

  • महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. देशातील बहुतांश आर्थिक व्यवहार हे मुंबईतून होत असतात. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मुंबईला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
  • दरम्यान, काल राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत असतानाच केंद्र सरकारने महाराष्ट्राला धक्का देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत नियोजित असलेले आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्यात आले आहे.
  • तसेच ऐन महाराष्ट्र दिनादिवशीच हा निर्णय घेण्यात आल्याने महाराष्ट्रातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
  • केंद्र सरकारने यासंदर्भाती अधिसूचना 27 एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुंबईत नियोजित असणारे हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र आता गुजरातमध्ये गांधीनगर येथे होईल .
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी असलेला गुजरात इंटरनॅशनल फायनान्स सिटी हा प्रकल्पसुद्धा गांधीनगर येथेच आकारास येत आहे.

दिनविशेष :

  • 3 मे 1912 हा दिवस उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक नझीर अहमद देहलवी ऊर्फ डिप्टी यांचा स्मृतीदिन आहे.
  • दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूक चित्रपट 3 मे 1913 रोजी प्रदर्शित झाला.
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 3 मे 1939 रोजी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली.
  • 3 मे 1947 रोजीइंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
  • भाजपाच्या जेष्ठ नेत्या उमा भारती यांचा जन्म 3 मे 1959 मध्ये झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 मे 2020)

Shital Burkule

Shital is very passionate content writer and likes to write about more stuff related to news about education.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago