3 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs

जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह

3 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (3 जुलै 2022)

ॲड. दीपक चटप यास ब्रिटीश सरकारची 45 लाखांची शिष्यवृत्ती :

  • दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील ॲड. दीपक यादवराव चटप हा तरुण वकील ब्रिटीश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लिडर’ ठरला आहे.
  • ब्रिटीश सरकारतर्फे देण्यात येणारी ‘चेव्हेनिंग’ ही जागतिक प्रतिष्ठेची 45 लाख रुपयांची शिष्यवृत्ती त्याला मिळाली.
  • तो अवघ्या 24 व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील ठरला आहे.
  • सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकारकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते.
  • लंडनच्या ‘सोएस’ या जगातील सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी दीपकची निवड झाली आहे.
  • त्याच्या शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी ब्रिटीश सरकारने घेतली आहे.
  • लखमापूर येथील रहिवासी असलेला दीपक ‘पाथ’ या सामाजिक संस्थेचा संस्थापक आहे.
  • या माध्यमातून राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचे विधायक काम करत आहे.
  • ‘लढण्याची वेळ आलीय’ हा काव्यसंग्रह वयाच्या 18 व्या वर्षी तर ‘कृषी कायदे: चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ हे दीपकने लिहीलेले पुस्तक चर्चेत राहीले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (2 जुलै 2022)

बुमराहने रचला विश्वविक्रम :

  • 2007 साली भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंहने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावले होते.
  • असाच काहीसा पराक्रम आज इंग्लंडमधील बर्मिगहॅम येथे सुरु असणाऱ्या पाचव्या कसोटीमध्ये पहायला मिळाला.
  • ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजाने पहिला दिवस गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताचा कर्णधार जसप्रीत
  • बुमराहने फलंदाजी करताना केलेली भन्नाट कामगिरी चर्चेचा विषय ठरली.
  • बुमराहची की विक्रमी कामगिरी ठरली. या पूर्वी हा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर होता.
  • त्याने 2003 साली पिटरसनच्या गोलंदाजीवर एका षटकात 28 धावा कुटलेल्या.
  • सामन्यातील 84 आणि दुसऱ्या दिवसातील 11 व्या षटकामध्ये बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडची जबरदस्त धुलाई केली.
  • एक वाइड आणि एका नो बॉलच्या जोरावर बुमराहने या षटकामध्ये तब्बल 35 धावा कुटल्या.

स्टुअर्ट ब्रॉडने घेतली कुंबळे आणि वॉर्नच्या क्लबमध्ये एंट्री :

  • भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या एजबस्टन कसोटी सामन्यातील दुसरा दिवस स्टुअर्ट ब्रॉडसाठी संस्मरणीय ठरला.
  • एकाच दिवशी आणि अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने त्याने दोन चांगले-वाईट विक्रम आपल्या नावे केले.
  • स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत 550 बळींचा टप्पा गाठला.
  • मोहम्मद शामी हा ब्रॉडचा 550वा बळी ठरला.
  • कसोटी क्रिकेटमध्ये 550 बळी घेणारा तो जगातील सहावा आणि इंग्लंडचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
  • ब्रॉडच्या अगोदर जेम्स अँडरसनने अशी कामगिरी केलेली आहे.

दिनविशेष :

  • सन 1850 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला.
  • महात्मा फुले यांनी 3 जुलै 1852 मध्ये दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली.
  • भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ सन 1855 मध्ये झाला.
  • 3 जुलै 1884 मध्ये डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला.
  • सन 2006 मध्ये एक्स.पी. 14 हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 जुलै 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.