3 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
3 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (3 ऑगस्ट 2020)
स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन परत येत आहे:
अमेरिकेच्या स्पेस एक्स कंपनीची ड्रॅगन ही कुपी अवकाश स्थानकाला भेट देऊन अवकाशवीरांसह परत येत आहे.
खासगी कंपनीच्या माध्यमातून नासाने अवकाशवीर पाठवणे व त्यांचे परत पृथ्वीवर येणे या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच घडत असून ही अवकाश कुपी पृथ्वीवर सुरक्षित उतरवण्यासाठी स्पेस एक्स कंपनी मार्गदर्शन करीत आहे.
मेक्सिकोच्या आखातात रविवारी दुपारी ही कुपी अवतरण करणार असून दोन महिन्यांच्या अवकाश वास्तव्यानंतर ती परत येत आहे.
अवकाश वैमानिक डग हर्ले व बॉब हेनकेन हे दोन अमेरिकी अवकाशवीर आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानकात स्पेस एक्सच्या ड्रॅगन अवकाशकुपीतून गेले होते.
चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना:
चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत ‘प्रज्ञान रोव्हर’ला घेऊन रवाना झालेल्या ‘विक्रम लँडर’चा चंद्रावरील सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. . जवळपास 10 महिन्यांनंतर आता त्याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षी ‘नासा’च्या फोटोंचा वापर करुन विक्रमचा ढिगारा(डेब्रिस) ओळखणारे चेन्नईचे इंजिनिअर शनमुग सुब्रमण्यन यांनी इस्त्रोला एक ईमेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे.
भारतीय अवकाश संस्था इस्त्रोला पाठवलेल्या ई-मेलमध्ये शनमुग सुब्रमण्यन यांनी ‘नासा’ने मे महिन्यात जारी केलेल्या फोटोंवरुन प्रज्ञान काही मीटर पुढे आल्याचे संकेत मिळाले असल्याचा दावा केला आहे.
110 वर्षांच्या महिलेने करोनावर मात केली:
देशात करोनाग्रस्तांचा आकडा 17 लाखांपार गेला आहे. जवळपास 37 हजार जणांना यामुळे जीव गमवावा लागलाय.
कर्नाटकमध्ये एका 110 वर्षांच्या महिलेने करोनावर मात केली आहे. सिद्दम्मा असं या महिलेचं नाव असून त्या कर्नाटकमधील चित्रदूर्ग येथील रहिवासी आहेत.
’27 जुलै रोजी सिद्दम्मा यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना चित्रदूर्गच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला’, चित्रदूर्गचे जिल्हा सर्जन डॉ. बसवराज यांनी याबाबत माहिती दिली.
माजी रणजीपटूचा करोनाने निधन:
सोलापुरातील माजी रणजी क्रिकेटपटू उमेश मनोहर दास्ताने यांचे काल रात्री करोना विषाणूच्या संसर्गामुळे निधन झाले.
मध्य रेल्वेतून मुख्य तिकिट निरीक्षकपदावरून ते सेवानिवृत्त झाले होते.
उमेश दास्ताने (वय 64) यांनी 1977-78 साली महाराष्ट्र विरूध्द गुजरात रणजी क्रिकेट सामन्यात सर्वप्रथम सहभाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी पंधरा रणजी सामने खेळले होते. उत्कृष्ट फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजीसाठी ते प्रसिध्द होते.
रणजीनंतर त्यांनी रेल्वे क्रिकेट संघाकडून खेळायला सुरूवात केली.भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदाची धुराही त्यांनी सांभाळली होती.
दिनविशेष :
हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म 3 ऑगस्ट 1886 मध्ये झाला.
स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, पत्री सरकारचे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार ‘क्रांतिसिंह नाना पाटील’ यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी झाला.
‘द फायरस्टोन टायर अँड रबर कंपनी‘ची स्थापना सन 1900 मध्ये झाली.
3 ऑगस्ट 1948 मध्ये भारतीय अणूऊर्जा आयोगाची (Indian Atomic Energy Commission) स्थापना झाली.
सन 1960 मध्ये नायजेरिया देशाला फ्रान्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.