28 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

28 September 2018 Current Affairs In Marathi

28 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 सप्टेंबर 2018)

रयत शिक्षण संस्थेसाठी विशेष टपाल तिकीट:

  • रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त भारतीय टपाल खात्यातर्फे विशेष टपाल तिकीट व विशेष कव्हर प्रकाशित करण्यात येणार आहे. Rayat Shikshan Sanstha
  • सातारा येथील संस्थेच्या मुख्यालयात 4 ऑक्टोबरला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात हे प्रकाशन केले जाईल, अशी माहिती टपाल खात्याच्या सूत्रांनी दिली.
  • कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये लावलेल्या या संस्थारूपी रोपट्याचे आता मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर झाले आहे. संस्थेच्या या कारकिर्दीबाबत टपाल तिकीट प्रकाशित करून गौरव करण्यात येणार असल्याची माहिती टपाल खात्यातर्फे देण्यात आली.

औषधविक्रेत्यांचा आज देशभरात बंद:

  • केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या ऑनलाइन औषधविक्रीच्या मसुद्याला विरोध करत ऑल इंडिया केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने 28 सप्टेंबर रोजी बंद पुकारला आहे. त्यामुळे देशभरातील औषधे दुकाने बंद राहणार आहेत.
  • ऑनलाइन औषधविक्रीला कायदेशीर मान्यता देण्यासाठी केंद्र सरकारने सुधारित मसुदा नुकताच प्रसिद्ध केला आहे.
  • ई-फार्मसीच्या मसुद्याविरोधात निषेध नोंदविण्यासाठी 20 ते 27 सप्टेंबर या काळात देशभरातील औषधविक्रेते काळ्या फिती लावून काम करत होते. त्यानंतर आता देशभरातील औषधांची दुकाने बंद असणार आहेत.
  • ऑनलाइन औषधविक्रीच्या मसुद्यामध्ये ई-फार्मसीला सरसकट अधिकार देण्यात आले असून याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. ई-फार्मसीमुळे औषधविक्रीमध्ये मक्तेदारी निर्माण होऊन औषधविक्रेते संपुष्टात येतील.
  • तेव्हा ई फार्मसीला सरकारने कायदेशीर मान्यता देऊ नये. या संपामध्ये देशभरातील तब्बल साडेआठ लाख औषध विक्रेते सहभागी होणार असून राज्यातील 70 हजारांहून अधिक दुकाने बंद असतील, असे ऑल इंडिया केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले.

NSG सदस्यत्वासाठी ब्रिटनकडून भारताचे समर्थन:

  • अणुपुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी विनाअट भारताला समर्थन देण्यास तयार असल्याचे पुन्हा एकदा ब्रिटनकडून जाहीर करण्यात आले आहे. गटात सहभागी होण्यासाठी भारताने वारंवार आपली योग्यता सिद्ध केली असल्याचे ब्रिटनने सांगितले आहे.
  • जागतिक स्तरावर तंत्रज्ञान निर्यातीच्या नियंत्रणासाठी चार मुख्य व्यवस्था आहेत. अण्वस्त्रे आणि अणु तंत्रज्ञानाच्या हस्तांतरण आणि प्रसाराबाबतचे नियम ठरवण्यात एनएसजीची महत्त्वाची भूमिका आहे. NSG
  • महत्त्वाचे म्हणजे 1974ला भारताने केलेल्या अणुचाचणीवर प्रतिक्रिया म्हणून एनएसजीची स्थापना करण्यात आली होती.
  • ब्रिटन भारताकडे एक जबाबदार देश म्हणून पाहत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, वारंवार चीनने विरोध केलेला असतानाही भारत पुन्हा एकदा एनएसजीमध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहे.
  • तसेच गेल्या महिन्यात अमेरिकेसोबत झालेल्या 2+2 डायलॉग आणि अमेरिकेकडून भारताला टियर-1 देशांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने अमेरिका एनएसजी सदस्यत्वासाठी मदत करेल अशी भारताला अपेक्षा आहे.

आधारविषयी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय:

  • शाळा प्रवेश, बँक खाते उघडणे आणि नव्या मोबाईल कनेक़्शनसाठीआधार कार्डअसणे अनिवार्य नसल्याचा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर रोजी दिला.
  • आधार‘च्या घटनात्मक वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. तसेच, आधार कार्ड कायद्यातील कलम 57 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. यामुळे ‘आधार’चा डेटा खासगी कंपन्यांना वापरता येणार नाही.
  • आधार‘मुळे नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे उल्लंघन होत असल्याच्या आशयाच्या 31 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयातील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने निर्णय दिला. या खंडपीठामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश अर्जनकुमार सिक्री, न्यायाधीश अजय माणिकराव खानविलकर, न्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायाधीश अशोक भूषण यांचा समावेश आहे.
  • गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अनेक योजनांसाठी आणि इतर कारणांसाठी ‘आधार’ सक्ती केली होती. त्यातील काही गोष्टींसाठीची सक्ती रद्द केली असली, तरीही ‘आधार’ घटनात्मकरित्या वैध असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ पुरस्कार जाहीर:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक स्तरावरील मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींना ‘चॅम्पियन ऑफ द अर्थ’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना जागतिक स्तरावरील हा पुरस्कार पर्यावरण क्षेत्रात राबवलेल्या धोरणांबद्दल मिळाला आहे. पंतप्रधान मोदींसह फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांनाही हा सन्मान मिळाला आहे.
  • संयुक्त राष्ट्राने (यूएन) पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगातील सहा व्यक्तींनाचॅम्पियन ऑफ द अर्थ‘ या पुरस्काराने सन्मानित केले आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी आणि मॅक्रॉन या दोघांना संयुक्तरित्या हा सन्मान प्राप्त झाला आहे.
  • 2022 पर्यंत भारताला एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकपासून मुक्त करण्याचा संकल्प आणि आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचे नेतृत्वामुळे मोदींना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

आधार क्रमांक पॅनकार्डला लिंक करणे अनिवार्य:

  • सर्वोच्च न्यायालयाने 26 सप्टेंबर रोजी प्राप्तिकर विवरणासाठी दिलेल्या निकालामुळे पॅन क्रमांक (परमनंट अकाउंट नंबर) व आधार क्रमांक एकमेकांना जोडणे (लिंक करणे) बंधनकारक बनले आहे. मात्र आतापर्यंत 50 टक्के लोकांनी आधार व पॅन लिंक केले नसल्याचे आढळून आले आहे.
  • प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 21 कोटी 8 लाख 16 हजार 776 लोकांनी पॅन व आधार एकमेकांना जोडले आहे. प्रत्यक्षात पॅन कार्डधारकांची संख्या 41 कोटी 26 लाख 6968 इतकी आहे. म्हणजे 20 कोटींहून अधिक लोकांनी पॅन व आधार एकमेकांना लिंक केलेले नाही, असा अर्थ निघतो.
  • अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पॅन क्रमांक व आधार क्रमांक एकमेकांशी जोडण्याची मुदत 31 मार्च 2019 पर्यंत वाढवून दिली आहे. तसे 30 जून रोजी जाहीर करण्यात आले होते. तोपर्यंत ते काम संबंधित पॅन कार्डधारकांना करावेच लागणार आहे. मात्र आधारचा फैसला होईपर्यंत पॅन व आधार जोडण्यास मुदतवाढ देण्याचे मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयानेच जाहीर केले होते. आता न्यायालयाचा निर्णय आला असून, त्यात हे करणे बंधनकारक केले आहे.

दिनविशेष:

  • 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक रेबीज दिन, आंतरराष्ट्रीय जाणून घेण्याचा हक्क दिन तसेच आंतरराष्ट्रीय सुरक्षित गर्भपात दिन म्हणून पाळला जातो. Bhagat Singh
  • क्रांतिकारक भगत सिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 मध्ये झाला होता.
  • जगप्रसिद्ध पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 मध्ये झाला.
  • 28 सप्टेंबर 1967 हा दिवस सुविख्यात क्रांतिकारकथोर तपस्वी पांडुरंग महादेव उर्फ सेनापती बापट यांचा स्मृतीदिन आहे.
  • ऑलिम्पिकमध्ये वयक्तिक सुवर्णपदक मिळवणारे पहिले भारतीय अभिनव बिंद्रा यांचा जन्म 28 सप्टेंबर 1982 मध्ये झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.