28 जुलै 2022 चालू घडामोडी – Current Affairs

पॅडी अप्टन

28 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (28 जुलै 2022)

महाबळेश्वरातील ब्रिटीशकालीन सर्व पाँईंटची नावे बदलण्याची मागणी :

  • महाबळेश्वरातील ब्रिटीशकालीन सर्व पाँईंटची नावे बदलण्याची मागणी हिंदू एकता आंदोलन आणि भाजपच्यावतीने महाबळेश्वर तहसिलदारांकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
  • इंग्रज अधिकाऱ्यांची नावे बदलून 15 ऑगस्ट पर्यंत क्रांतीकारकांची नावे पाँईंटला द्या अन्यथा आम्ही नाव बदलू असा दिला इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
  • महाबळेश्वर पाचगणी हे पर्यटन स्थळ इंग्रजांनी नव्याने वसुवून त्याला कोकण व खंबाटकी घाट रस्ता तयार करून पुण्या मुंबईशी जोडले.
  • 1819 मध्ये मराठा साम्राज्याचे पतन झाल्यानंतर ब्रिटीशांनी महाबळेश्वरच्या आसपासच्या डोंगरांना साताऱ्याच्या जिल्ह्याला जोडले.
  • 1828 मध्ये ब्रिटीशांनी महाबळेश्वरच्या बदल्यात सातारच्या महाराजांना काही शहरे दिली.
  • जुन्या नोंदीमध्ये महाबळेश्वरला गर्वरनरच्या नावाने माल्कम पेठ म्हंटले गेले.
  • तिथल्या पर्यटन स्थळा वर नवनवीन पॉईंट हुडकून त्याला ब्रिटिश अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली.
  • महाबळेश्वरातील पाँईंटला देण्यात आलेली इंग्रजांची नावे ही तातडीने बदलावी आणि या सर्व पाँईंटला क्रांतीकारकांची नावे द्यावीत अशी मागणी आता भाजप आणि हिंदू एकता आंदोलन समितीने केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (27 जुलै 2022)

कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महत्त्वाचे 13 निर्णय :

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट बैठकीत बुधवारी राज्यातील विविध विभागांबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
  • यात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्यापासून राजकीय व सामाजिक आंदोलनातील मार्च 2022 पर्यंतचे खटले मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत.
  • तर यात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे.
  • या योजनेचा लाभ 2019 मध्ये राज्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या आणि नैसर्गिक आपत्तीच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुध्दा घेता येईल.
  • एखादा शेतकरी मृत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसाला सुद्धा हा लाभ मिळेल.

मुंबईच्या स्थानिक क्रिकेटपटूंना मानधन :

  • मुंबईच्या स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना प्रत्येक सामन्यासाठी चार हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.
  • कांगा लीग (नॉकआऊट स्पर्धेसह), आंतरमहाविद्यालयीन, कॉर्पोरेट शिल्ड या स्पर्धामध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना हे मानधन मिळेल.
  • मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) बुधवारी झालेल्या कार्यकारी परिषदेमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
  • याशिवाय मुंबईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी क्रिकेटपटूंच्या 70 वर्षांहून अधिक वयाच्या विधवा पत्नींसाठी प्रति महिना 20 हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचे निश्चित करण्यात आले.

2024 ऑलिंपिकसाठी पॅरिसमध्ये उभे राहणार ‘इंडिया हाऊस’:

  • क्रीडा जगतामध्ये ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांना अनन्य साधारण महत्त्व आहे.
  • याचाच एक भाग म्हणून आरआयएल आणि आयओए 2024 ऑलिंपिकसाठी पॅरिसमध्ये पहिले-वहिले ‘इंडिया हाऊस’ स्थापन करणार आहेत.
  • 2024 पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे पहिले ऑलिंपिक हाऊस उभे राहणे, हा मैलाचा दगड ठरणार आहे.
  • जागतिक खेळांमध्ये भारत प्रगती करत आहे, याचे हे उदाहरण ठरणार आहे.
  • अधिकृत ऑलिंपिक हाऊस हे लाखो चाहत्यांना आणि पर्यटकांना संबंधित देशाचे खेळाप्रती असलेल्या धोरणांचा आढावा देते.
  • याशिवाय, या माध्यमातून क्रीडा अधिकारी, क्रीडापटूंशी संवाद साधण्यासाठीही याची मदत होते.
  • 2016च्या रिओ ऑलिंपिकमध्ये 50हून अधिक राष्ट्रांनी त्यांचे हॉस्पिटॅलिटी हाऊस स्थापन केले होते.
  • यामुळे या देशांच्या सांस्कृतिक आणि क्रीडा इतिहासाची ओळख जगाला झाली होती.

टी २० विश्वचषकापूर्वी भारतीय संघात ‘मेंटल कंडिशनिंग कोच’ची नियुक्ती :

  • येत्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी 20 क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • विश्वचषकापूर्वी खेळाडूंची मानसिक स्थिती चांगली रहावी यासाठी बीसीसीआयने ‘मेंटल कंडिशनिंग कोच’ची नियुक्ती केली आहे.
  • प्रसिद्ध मेंटल कंडिशनिंग कोच पॅडी अप्टन यांच्यासोबत बीसीसीआयने अल्पकालीन करार केला आहे.
  • भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर असून सर्व खेळाडू पोर्ट ऑफ स्पेनमध्ये आहेत.
  • नियुक्ती झाल्यानंतर पॅडी अप्टन तत्काळ भारतीय संघात सामील झाले आहेत.
  • ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषकापर्यंत ते भारतीय संघाचा भाग असतील.

दिनविशेष :

  • 28 जुलै हा ‘जागतिक हेपटायटीस दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • हेपटायटीस बी रोगजंतू चे शोधक ‘बारूच सॅम्युअल ब्लमबर्ग‘ यांचा जन्म 28 जुलै 1925 मध्ये झाला.
  • सन 1998 मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या आणि बदल्यांबाबत नऊ न्यायमूर्तींचा समावेश असलेले स्वतंत्र घटनापीठ स्थापन झाले.
  • आसामी लेखिका इंदिरा गोस्वामी यांना सन 2001 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (29 जुलै 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago