Current Affairs (चालू घडामोडी)

27 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

ATM

27 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (27 फेब्रुवरी 2020)

ATM मधून पैसे निघाले नाही तरी लागणार दंड :

  • जर तुम्ही ‘एटीमएम’मधून पैसे काढायला गेला व तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसतील, तर तुम्हाला 25 रुपये दंड आकारला जाणार आहे.
  • तर खासगी क्षेत्रातील अ‌ॅक्सिस बँकेने 1 एप्रिल 2020 पासून हा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्यावतीने वेबसाइटवर परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
  • तसेच आतापर्यंत पुरेसे पैसे नसल्याने एटीएमधून पैसे काढता न आल्याबाबत कोणताही दंड आकारला जात नव्हता.
  • याशिवाय अन्य चार प्रकारच्या दंडाची रक्कम बँकेकडून वाढवण्यात आली आहे. आता NACH व्यवहार अयशस्वी झाल्यावर 650 रुपये दंड आकारला जाणार आहे, जो आतापर्यंत 500 रुपये होता. याशिवाय अन्य बँकेचा धनादेश न वठल्यास 250 रुपये, ऑटो डेबिट न झाल्यास 300 रुपये दंड आकारला जाणार आहे.
  • तर यासाठी आतापर्यंत 250 रुपये आकारले जात होते. एवढेच नाहीतर बँकेने शाखांबरोबरच्या व्यवहारांसंबंधीचे नियम देखील ठरवले आहेत.
  • अ‌ॅक्सिस बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार शाखेतून 15 ट्रांजेक्शन मोफत होतील व त्यानंतर प्रत्येक ट्रांजेक्शनला 75 रुपये पडतील. एवढेच नाहीतर चेकबुक घेण्यासाठी आता 100 रुपये द्यावे लागणार आहेत. अगोदर यासाठी 60 रुपये घेतले जात होते.

देशातल्या कुठल्याही ATM मध्ये नाही मिळणार 2 हजाराची नोट :

  • ATM मशीन्समध्ये लवकरच एक महत्वाचा बदल होणार आहे. त्यामुळे यापुढे तुम्हाला ATM मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटा काढता येणार नाहीत.
  • देशभरातील दोन लाख 40 हजार एटीएम मशीन्समधून दोन हजार रुपयाच्या नोटेचा रॅक हटवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे यापुढे ATM मधून 100, 200 आणि 500 रुपयाच्याच नोटा निघतील.
  • तर ATM मशीन मध्ये चार ट्रे असतात. त्यातल्या तिघांमध्ये 500 आणि एकात 100 किंवा 200 रुपयाच्या नोटा ठेवल्या जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
  • तसेच काही दिवसांपूर्वीच इंडियन या सरकारी बँकेने देशभरातील आपल्या 3 हजार एटीएम मशीन्समध्ये दोन हजाराची नोट भरण्याची प्रक्रिया बंद करण्याचे निर्देश दिले होते.

पहिली आणि सहावीसाठी यंदा मराठी अनिवार्य :

  • राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करणारे विधेयक बुधवारी विधान परिषदेत एकमताने मंजूर करण्यात आले.
  • मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मांडलेल्या या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी एकमताची मोहोर उठवली.
  • तसेच यावेळी देसाई म्हणाले की, 2020 – 21 या शैक्षणिक वर्षापासून टप्प्याटप्प्याने एक सक्तीचा विषय म्हणून सर्व शाळांमध्ये, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी शिकवण्याची तरतूद या विधेयकात आहे.
  • तर येत्या शैक्षणिक वर्षात पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली आणि सहावीसाठी मराठी भाषा विषय सक्तीचा केला जाईल. त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रत्येक वर्षी पुढच्या इयत्तेसाठी लागू करण्यात येईल. या क्रमाने 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी आणि दहावीसाठी मराठी भाषा विषय अनिवार्य होईल.

विराटने अव्वल स्थान गमावलं :

  • न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही डावांमध्ये भारतीय फलंदाज न्यूझीलंडच्या माऱ्याचा सामना करु शकले नाही. एका क्षणाला भारतावर डावाने पराभव स्विकारण्याची वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
  • मात्र ऋषभ पंतने ही नामुष्की टाळली. विराट कोहलीही पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत सपशेल अपयशी ठरला.
  • तर या खराब कामगिरीचा विराटला आयसीसी क्रमवारीत फटका बसलेला असून त्याने आपलं अव्वल स्थान गमावलेलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने आता अव्वल स्थान मिळवलं आहे.
  • तसेच मात्र विराटव्यतिरीक्त आणखी 3 भारतीय फलंदाजांनी या यादीमध्ये आपलं स्थान मिळवलं आहे. दोन्ही डावांमध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांना नेटाने सामना करणाऱ्या मयांक अग्रवाल आणि अजिंक्य रहाणे यांना बढती मिळाली आहे.
  • मयांक 12 व्या स्थानावरुन दहाव्या स्थानावर, तर अजिंक्य नवव्या स्थानावरुन आठव्या स्थानावर आला आहे. चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो सातव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर घसरला आहे.

ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती :

  • 5 वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेचं विजेतेपद पटकावणाऱ्या रशियाच्या ग्लॅमरस टेनिसपटू मारिया शारापोव्हाने निवृत्ती स्विकारलेली आहे.
  • तर आपल्या कारकिर्दीत शारापोव्हाने फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेची 2, तर ऑस्ट्रेलियन-विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेचं प्रत्येकी एक विजेतेपद मिळवलं आहे. मध्यंतरी उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात शारापोव्हावर बंदी घालण्यात आली होती.
  • तसेच यानंतर शारापोव्हाने दमदार पुनरागमन केलं, मात्र यानंतर तिला एकाही मोठ्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलं नाही.
  • आपल्या उमेदीच्या काळात शारापोव्हा जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून शारापोव्हा फॉर्मात नव्हती, ज्यामुळे अखेरीस तिने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

दिनविशेष:

  • 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन तसेच जागतिक स्वयंसेवी संस्था दिन आहे.
  • सन 1900 या वर्षी ब्रिटन मध्ये मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना झाली.
  • ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 मध्ये झाला, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Shital Burkule

Shital is very passionate content writer and likes to write about more stuff related to news about education.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

8 months ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

8 months ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

1 year ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

1 year ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

1 year ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

1 year ago