Current Affairs (चालू घडामोडी)

23 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

23 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (23 जुलै 2020)

भारताच्या हेलिकॉप्टरवरून सोडण्याच्या ध्रुवास्त्राची चाचणी यशस्वी:

  • ओडिशातील बालासोर येथे भारताच्या हेलिकॉप्टरवरून सोडण्याच्या ध्रुवास्त्राची चाचणी यशस्वी झाली असून यात प्रत्यक्ष हेलिकॉप्टरमधून ते सोडण्यात आले नव्हते.
  • हे रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र असून ते प्रत्यक्षात नाग (हेलिना) क्षेपणास्त्र आहे, त्याचे नामकरण ‘ध्रुवास्त्र’ असे करण्यात आले आहे.
  • भारतीय लष्करी दलांनी या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली असून बालासोर येथे 15 व 16 जुलैला त्याच्या हेलिकॉप्टरमधून सोडण्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या होत्या.
  • हेलिना’ हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र असून त्याचा मूळ उद्देश शत्रूच्या रणगाडय़ांचा वेध घेणे हा आहे. प्रगत हलक्या हेलिकॉप्टरमधून ते सोडता येते.
  • सर्व हवामानात वापरता येणारे हे क्षेपणास्त्र असून उंचीवरून हल्ला व थेट हल्ला असे दोन्ही प्रकार यात शक्य आहेत. हेलिना शस्त्रास्त्र प्रणाली अजून लष्करात तैनात करण्यात आलेली नाही.
  • या क्षेपणस्त्राची क्षमता 7 कि.मी. असून एकाच वेळी हेलिकॉप्टरला लावून आठ क्षेपणास्त्रे सोडली जाऊ शकतात.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (22 जुलै 2020)

ऑक्सफर्ड व अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी तयार केलेली लस भारतात ‘कोविशिल्ड’ या नावाने विकणार:

  • ऑक्सफर्ड विद्यापीठ व अ‍ॅस्ट्राझेन्का यांनी तयार केलेली लस भारतात ‘कोविशिल्ड’ या नावाने विकणार असल्याचे सीरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी सांगितले. या लशीच्या चाचण्या यशस्वी झाल्या असून आता थोडेच टप्पे बाकी आहेत.
  • लशीच्या निर्मितीसाठी सीरम इन्स्टिटय़ूटने ऑक्सफर्डशी करार केला होता. त्यामुळे ही लस पुण्यातील प्रकल्पात उत्पादित करण्यात येणार आहे.
  • या लशीची खरेदी बहुतांश सरकारकडून केली जाण्याची शक्यता असून लसीकरण कार्यक्रमात ती सरकारकडून मोफत दिली जाईल.
  • लशीच्या किमतीबाबत त्यांनी सांगितले की, आम्ही कमी व मध्यम उत्पन्न गटातील देशांना लस देणार आहोत. त्यामुळे त्या लशीची किंमत एका डोसला एक हजार रुपये ठेवली जाईल.
  • या लशीच्या मानवी चाचण्या भारतात घेण्याची जबाबदारी सीरम इन्स्टिटय़ूटवर टाकण्यात आली आहे. सीरमकडून 4 ते 5 हजार लोकांवर या लशीच्या चाचण्या ऑगस्टमध्ये केल्या जाणार आहेत.

राज्यात दिवसभरात प्रथमच रुग्णसंख्येचा 10 हजारांचा टप्पा पार झाला:

  • विविध शहरगावांत कठोर टाळेबंदीचे नियम आणि वेगवेगळे जाचक नियम लादूनही राज्यातील करोना रुग्णवाढ कमी होत नसल्याचे दिसत आहे. राज्यात दिवसभरात प्रथमच रुग्णसंख्येचा 10 हजारांचा टप्पा पार झाला.
  • गेल्या 24 तासांत राज्यात 10,576 नवे रुग्ण आढळले असून, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये तीन हजारांपेक्षा अधिक रुग्णांचे निदान झाले.
  • दिवसभरात 280 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. सुमारे साडेपाच हजार रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. पुणे जिल्ह्य़ात सर्वाधिक 39,353 रुग्ण उपचाराधीन आहेत.
  • देशात गेल्या 24 तासांत करोनाचे 37 हजार 724 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 12 लाखांच्या उंबरठय़ावर पोहोचली आहे. 24 तासांत 28 हजार 472 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
  • देशात आतापर्यंत 7.5 लाख रुग्ण बरे झाले असून, रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण 63 टक्क्यांवर पोहोचले आहे. अजूनही 4 लाखांहून अधिक रुग्ण उपचाराधीन आहेत.
  • 19 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही जास्त आहे. दिल्लीमध्ये करोनामुक्त होण्याचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 84.73 टक्के आहे.

भारतीय अणु शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले-  पंतप्रधान नरेंद्र मोदी:

  • स्वदेशी तंत्रज्ञानाने अणुभट्टी विकसित केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी भारतीय अणु शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
  • गुजरातमधील काकरापार अणु ऊर्जा प्रकल्पाच्या प्लांट-3 साठी ही अणु भट्टी विकसित करण्यात आली आहे.
  • अत्यंत कठीण अशा काकरापार अणू ऊर्जा प्रकल्प प्लांट-3 साठी आपल्या अणू शास्त्रज्ञांचे अभिनंदन. स्वदेशी तंत्रज्ञानाने 700 मॅगावॅट केएपीपी-3 रिअ‍ॅक्टरची निर्मिती करण्यात आली आहे.
  • मेक इन इंडियाचे हे चमकदार उदहारण आहे” असे पंतप्रधान मोदींनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

बेन स्टोक्ससारखा ऑलराऊंडर ‘टीम इंडिया’कडे असेल तर– इरफान पठाण:

  • वेस्ट इंडिजविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत धडाकेबाज कामगिरी करणारा बेन स्टोक्स याला ICCच्या ताज्या क्रमवारीत बढती मिळाली.
  • ICCने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली. त्यात अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत त्याने अव्वल स्थान पटकावले. त्याने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याला खाली ढकलत अव्वलस्थान पटकावले.
  • स्टोक्सची कारकिर्दीतील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या कामगिरीसाठी स्टोक्सला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
  • त्याच्या धमाकेदार कामगिरीनंतर भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने त्याची स्तुती केली. “जर टीम इंडियाकडे बेन स्टोक्ससारखा अष्टपैलू खेळाडू असेल, तर भारतीय संघ जगाच्या पाठीवर कुठेही अजिंक्य राहू शकतो”, अशा शब्दात पठाणने त्याची स्तुती केली. तसेच मॅचविनर असा हॅशटगही स्टोक्ससाठी वापरला.

दिनविशेष :

  • 23 जुलै 1840 मध्ये कॅनडाचे प्रांत एकतीकरण कायद्याने तयार केले गेले.
  • हेपेटायटिस-बी या रोगावरील लसीच्या वापरास 23 जुलै 1986 मध्ये सुरुवात झाली.
  • 23 जुलै 1998 मध्ये केनेडी अवकाश केंद्रावरून कोलंबिया यानाने चंद्रा ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.
  • 23 जुलै 1856 मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला.
  • थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा 23 जुलै 1906 मध्ये जन्म झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 जुलै 2020)

Vaishnavi Jadhav

Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago