Current Affairs (चालू घडामोडी)

22 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

ले. कुमुदिनी आणि ले. सिंग ऑबर्झर्व्हर म्हणून नियुक्त करण्यात आलं:

22 September 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 सप्टेंबर 2020)

भारत त्या महान दृष्टीकोनाचा एक भाग होता- पंतप्रधान मोदी :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्र संघाच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी रात्री उशिरा ‘यूएनजीए’च्या उच्चस्तरीय बैठकीला संबोधित केलं.
  • 75 वर्षांपूर्वीच्या युद्धाच्या भीतीमुळे एक नवीन आशा निर्माण झाली. मानवी इतिहासामध्ये प्रथमच संपूर्ण जगासाठी एक संस्था निर्माण केली गेली.
  • संयुक्त राष्ट्र चार्टरचा संस्थापक स्वाक्षरीकर्ता म्हणून भारत त्या महान दृष्टीकोनाचा एक भाग होता,” असं मत पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 1 लाख पदे रिक्त:

  • केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात एक लाख जागा रिक्त आहेत. राजीनामे, निवृत्ती व मृत्यू यामुळे रिकाम्या जागांची संख्या वाढली आहे, असे राज्यसभेत सांगण्यात आले.
  • गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले,की सीमा सुरक्षा दलात 28926, केंद्रीय राखीव पोलीस दलात 26506, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 23906, सशस्त्र सीमा बलात 18643, इंडो-तिबेट पोलीस दलात 5784, आसाम रायफल्समध्ये 7328 जागा रिकाम्या आहेत.
  • काही दलांमध्ये नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. यातील बहुतांश रिक्त पदे कॉन्स्टेबल स्वरूपाची असून या जागा भरण्यासाठी थेट भरती, बढती, प्रतिनियुक्ती या पद्धती वापरल्या जातात.

राफेल विमाने चालवणाऱ्या वैमानिकांच्या चमूत एका महिलेचा समावेश करण्यात येणार:

  • भारतीय हवाई दलात नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या राफेल विमाने चालवणाऱ्या वैमानिकांच्या चमूत एका महिलेचा समावेश करण्यात येणार आहे.
  • तिने यापूर्वी मिग 21 विमाने चालवली असून राफेल विमाने चालवणाऱ्या चमूत तिची निवड करण्यात आली आहे.
  • भारतीय हवाई दलातील दहा महिला वैमानिकांनी सुखोई, मिग 29 यासह सर्व प्रकारची लढाऊ जेट विमाने चालवली आहेत.
  • फ्लाइट लेफ्टनंट मोहना सिंग या पहिल्या लढाऊ वैमानिक आहेत. त्यानंतर त्यात फ्लाइट लेफ्टनंट अवनी चतुर्वेदी, फ्लाइट लेफ्टनंट भावना कांत यांचाही समावेश झाला.

ले. कुमुदिनी आणि ले. सिंग ऑबर्झर्व्हर म्हणून नियुक्त करण्यात आलं:

  • भारतीय नौदलाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन महिला अधिकाऱ्यांना नौदलाच्या हेलिकॉप्टर तुकडीमध्ये ऑबर्झर्व्हर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.
  • सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रिती सिंग या दोघींना आज नौदलाच्या हेलिकॉप्टरच्या तुकडीमध्ये प्रवेश देण्यात आला.
  • आता यो दोघीही एयएनएस गरुडा या युद्धनौकेवरील हेलिकॉप्टरच्या पायलट म्हणून ऑन बोर्ड काम करतील.
  • ले. कुमुदिनी आणि ले. सिंग या दोघी नौदलाच्या जहाजांवर नियुक्त करण्यात आलेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

प्रज्ञेशची आगेकूच, नागल पराभूत- फ्रेंच खुली पात्रता टेनिस स्पर्धा :

  • भारतीय टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरनने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीची दुसरी फेरी गाठली आहे. मात्र संघर्षपूर्ण लढतीनंतर सुमित नागलचे आव्हान संपुष्टात आले आहे.
  • भारतीय टेनिस क्रमवारीत दुसऱ्या स्थानावरील प्रज्ञेशने तुर्कीच्या केम इलकेलचा 6-3, 6-1 असा पराभव केला, तर 16व्या मानांकित नागलने जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनविरुद्ध हार पत्करली.
  • ब्राऊनने ही लढत 7-6 (4), 7-5 अशी जिंकली. नागलने अमेरिकन टेनिस स्पर्धेत सलामीची लढत जिंकत लक्ष वेधले होते.

दिनविशेष:

  • सन 1660 मध्ये शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून पन्हाळगड सिद्दी जौहरच्या ताब्यात देण्यात आला.
  • सन 1888 मध्ये द नॅशनल जिऑग्रॉफिक मासिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • सन 1995 मध्ये भारतीय नागरिकानां घरात अथवा कार्यालयात राष्ट्रध्वज फडकाविण्याचा अधिकार असण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
  • सुनील गावसकर यांना सन 1998 मध्ये महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर झाला.
  • सन 2003 मध्ये नासाच्या गॅलिलिओ या अंतराळ यानाने गुरूच्या वातावरणात प्रवेश करीत प्राणार्पण केले.
Vaishnavi Jadhav

Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

8 months ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

8 months ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

1 year ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

1 year ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

1 year ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

1 year ago