22 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 डिसेंबर 2018)

22 December 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (22 डिसेंबर 2018)

पेटीएमवर ‘RBI’ चे निर्बंध:

  • पेटीएमच्या डिजिटल पेमेंट बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. पेटीएम डिजिटल पेमेंट बँकेत आणि ई वॉलेटवर नवीन खाती सुरु करण्यास ऑगस्ट महिन्यापासून निर्बंध लादण्यात आले आहेत.
  • पेटीएमने खातेदारांच्या केवायसीसंबंधी (नो यूवर कस्टमर) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे निर्बंध घालण्यात आले आहेत. paytm
  • रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या पेमेंट बँकेसंबंधित नियमांचे पेटीएमकडून उल्लंघन करण्यात आले आहे. पेमेंट बँकेत एका खात्यात जास्तीत जास्त एक लाखांची रक्कम ठेवता येते.
  • बँकेला शंभर कोटी रुपयांचे नेटवर्थ राखणे देखील गरजेचे आहे. शिवाय पेटीएमचे प्रवर्तक विजयशेखर शर्मा यांचा बँकेतील हिस्सा 51 टक्क्यांवर पोचला आहे.
  • तर इतर भांडवल इतर काही कंपन्या आणि 97 कम्युनिकेशन्सकडे आहे. मात्र त्यात देखील शर्मा यांची हिस्सेदारी असल्याने अप्रत्यक्षरीत्या बँकेतील त्यांच्या हिस्सा अधिक आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (21 डिसेंबर 2018)

संगणक, मोबाइलवर आता सरकारचे लक्ष:

  • तुमच्या-आमच्या संगणक वा मोबाइलवरून होणारी माहितीची देवाण-घेवाण, त्यांत साठवलेली माहिती तपासण्याचा, तिच्यावर पाळत ठेवण्याचा आणि तिच्या छाननीचा अधिकार दहा तपास आणि गुप्तहेर यंत्रणांना देणारी अधिसूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केल्याने वाद उफाळण्याची चिन्हे आहेत.
  • ही अधिसूचना म्हणजे देशाची वाटचाल ‘हुकुमशाही राज्या’कडे होत असल्याचे लक्षण आहे, टीका विरोधी पक्षांनी केली. तर ‘या अधिसूचनेत काहीही नवे नाही, विरोधक नाहक आगपाखड करत आहेत’, असे प्रत्युत्तर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत दिले.
  • राष्ट्राच्या सुरक्षेला बाधा पोहोचेल, अशी शंका आली तर संगणकांवरील माहितीच्या देवाणघेवाणीवर नजर ठेवण्याची अधिसूचना 2009 मध्ये काढण्यात आली होती. तशीच तंतोतत अधिसूचना केंद्रीय गृहखात्याने काढली.
  • संगणकावरील माहितीवर देखरेख ठेवण्याचे अधिकार दहा यंत्रणांना आपोपाप मिळणार नाहीत, तर केंद्रीय गृहसचिवांच्या परवानगीनेच एखाद्या व्यक्तीच्या संगणकावरील माहिती, फोनवरील माहितीचे आदानप्रदान वा इ-मेलवरील माहितीच्या वहनाची तपासणी केली जाईल, असे स्पष्टीकरण केंद्रीय गृहखात्याने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटिस यांचा राजीनामा:

  • अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर राजीनामा दिला आहे.
  • भारत व अमेरिका लष्करी संबंधाचे ते खंदे पुरस्कर्ते होते. संघर्षग्रस्त सीरियातून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयानंतर पेंटॅगॉनमध्ये सर्वानाच धक्का बसला होता. मॅटिस व ट्रम्प यांच्यात  समेट न घडून येणारे मतभेद या धोरणबदलांवर झाले होते. USA
  • ट्रम्प प्रशासनातून सोडून जाणारे मॅटिस हे अलीकडच्या काळातील सर्वात मोठे अधिकारी आहेत. अध्यक्ष ट्रम्प यांना पाठवलेल्या पत्रात मॅटिस यांनी म्हटले आहे, की त्यांनी आता त्यांच्या जागतिक  दृष्टिकोनाशी सुसंगत अशा व्यक्तीची नेमणूक करावी.
  • मॅटिस यांनी राजीनामा दिल्याचे ट्रम्प यांनी दोन ट्विट संदेशातून सूचित केले होते. मॅटिस हे फेब्रुवारीअखेर पद सोडतील असेही त्यांनी त्यात म्हटले  होते.

नववर्षात मिळणार खरिपाचा पीकविमा:

  • राज्यात यंदा गंभीर दुष्काळ असून, पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीपोटी भरपाई मिळावी, या उद्देशाने राज्यातील 94 लाख 64 हजार कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांनी विमा भरला आहे.
  • विमा कंपन्यांकडून आता छाननीचे काम सुरू झाले असून, नववर्षाच्या प्रारंभी शेतकऱ्यांना भरपाईची रक्‍कम मिळणार आहे.
  • पहिल्या टप्प्यात वादळ, अतिवृष्टी यासह अन्य कारणांमुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई दिली जाणार आहे. त्यानुसार विमा कंपन्यांनी क्‍लेम सेटलमेंटची कामे सुरू केली आहेत. दुसऱ्या टप्प्यात सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात भरपाई दिली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
  • यंदा राज्यातील शेतकऱ्यांनी खरीप पीकविम्यापोटी 48 कोटी 60 लाख रुपये भरले आहेत. यावर्षी राज्यातील 85 लाख हेक्‍टरवरील पिके दुष्काळामुळे बाधित झाली असून, त्याचा सुमारे 82 लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य व केंद्र सरकारच्या हिश्‍श्‍याची रक्‍कम विमा कंपन्यांना पुढील आठवड्यात दिली जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

गोवर-रुबेला लसीकरणाला मदरशांचा नकार:

  • उत्तर प्रदेशमधील शेकडो मदरशांनी आपल्या विद्यार्थ्यांना गोवर आणि रुबेलाची लस देण्यास नकार दिला आहे. या आजारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाकडून देशभरात व्यापक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. vaccination-pixabay
  • नऊ महिने ते 15 वर्षांपर्यंतच्या बालकांना ही लस दयावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले होते. मात्र व्हॉटसअॅपवर या लसीबाबत आलेल्या एका मेसेजमुळे मदरशांनी लस देण्यास नकार दिला आहे.
  • एकट्या मेरठमध्ये 272 मदरसे आहेत. यातील 70 मदरशांनी आरोग्य विभागाला मदरशांमध्ये प्रवेश देण्यास नकार दर्शवला आहे. याबाबत माहिती देताना जिल्हा लसीकरण अधिकारी विश्वास चौधरी म्हणाले, या भागात व्हॉटसअॅपद्वारे एक मेसेज फीरत आहे.
  • मुस्लिम मुलांना नपुसंक बनवण्यासाठी सरकार या लसीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे असे या व्हॉटसअॅप मेसेजमध्ये म्हटले आहे.

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या अध्यक्षपदी जय कवळी:

  • राज्यभरात बॉक्सिंगचे जाळे विणण्यात मोलाची भूमिका बजावणारे तसेच महाराष्ट्रातील बॉक्सिंगचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘जय कवळी’ यांची महाराष्ट्र बॉक्सिंग महासंघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
  • महासंघाच्या कार्यकारिणीची निवडणूक 30 डिसेंबर रोजी कल्याण येथे होत असून महासचिव, सचिव आणि खजिनदार या तीन पदांसाठी चुरस रंगणार आहे. boxing
  • कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील व पुण्याचे रमेशदादा बागवे यांच्यासह मराठवाडय़ातील माजी आमदार श्रीकांत जोशी तसेच परभणीचे आमदार राहुल पाटील हे उपाध्यक्षपदी असतील. खेळाडू या नात्याने माजी ऑलिम्पियन मनोज पिंगळे, कॅप्टन शाहू बिराजदार तसेच कॅप्टन गोपाल देवांग आणि गुरुप्रसाद रेगे हे उपाध्यक्षपदी कार्यरत असतील.
  • तर याव्यतिरिक्त रिझवी एज्युकेशन सोसायटीचे जावेद रिझवी, सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे रणजित सावरकर, पश्चिम महाराष्ट्रातील प्रवरा सैनिक स्कूलचे कर्नल दिलीप परब, सांगलीचे माजी उपमहापौर मुन्ना कुरणे, देवगड एज्युकेशन बोर्डाचे जितेंद्र तावडे, नागपूरमधील सज्जाद हुसेन, चंद्रपूरमधील डॉ. भगवानदास प्रेमचंद यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.

दिनविशेष:

  • 22 डिसेंबर हा दिवसराष्ट्रीय गणित दिन‘ आहे.
  • सन 1851 मध्ये भारतातील पहिली मालगाडी रूरकी येथे सुरू करण्यात आली.
  • भारतीय तत्त्वज्ञसरदादेवी‘ यांचा जन्म 22 डिसेंबर 1853 मध्ये झाला होता.
  • थोर भारतीय गणितीश्रीनिवास रामानुजन‘ यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 मध्ये झाला होता.
  • भारतातील विश्वभारती विद्यापीठ सन 1921 मध्ये सुरू झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (24 डिसेंबर 2018)

You might also like
1 Comment
  1. Ghodke Ashwini says

    Ajch chalu ghadamodi send kra

Leave A Reply

Your email address will not be published.