2 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

2 January 2020 Current Affairs In Marathi
2 January 2020 Current Affairs In Marathi

2 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 जानेवारी 2020)

पुढच्या वर्षी चांद्रयान-3 मोहीम :

  • भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-3 योजनेची घोषणा भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) केली.
  • गगनयान मोहिमेसाठी भारतीय हवाई दलातील चार अवकाशवीरांची निवड करण्यात आली असून, त्यांना लवकरच रशियामध्ये प्रशिक्षणासाठी पाठवणार असल्याचे ‘इस्रो’चे अध्यक्ष के. शिवन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
  • तिसऱ्या चांद्रयान मोहिमेचे काम प्रगतिपथावर आहे. या मोहिमेत लँडर, रोव्हर, इंधन यंत्रणा अशा तीन घटकांचा समावेश असणार आहे. चांद्रयान 3 मोहीम पुढील वर्षी होईल.
  • चांद्रयान 3 आणि गगनयान या दोन्ही मोहिमांचे काम सुरू आहे, असे शिवन यांनी सांगितले.

गगनयान मोहिमेसाठी चार जणांची निवड :

  • भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के सिवन यांनी चांद्रयान-3 आणि गगनयान मोहिमेची घोषणा केली आहे.
  • गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याची माहिती यावेळी बोलताना त्यांनी दिली. बंगळुरुत के सिवन यांनी पत्रकार परिषद घेत इस्रोच्या आगामी मोहिमा आणि योजनांबद्दल माहिती दिली. गगनयान 2020 पर्यंत अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा मानस आहे.
  • गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल. रशियामध्ये हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
  • तर यासाठी राष्ट्रीय स्तरावर सल्ला समितीचं गठन करण्यात आलं आहे. 2019 मध्ये गगनयान मोहिमेत आम्ही चांगली प्रगती केली आहे,
  • 2022 पर्यंत गगनयान अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा निर्धार आहे. या मोहिमेअंतर्गत चारही अंतराळवीरांना सात दिवसांसासाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. ही मोहीम इंडियन ह्युमन स्पेसफाइट प्रोगामचा भाग आहे.
  • गगनयानमधील अनेक तांत्रिक गोष्टींची तपासणी करणं आवश्यक असून, अंतराळवीरांचं प्रशिक्षण यावर्षींची सर्वात
    मोठी घडामोड असणार असल्याचं के सिवन यांनी सांगितलं.

महेंद्रसिंह धोनी दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय, ट्वेन्टी-20 कर्णधार :

  • भारताचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची  ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’ या लोकप्रिय क्रिकेट संकेतस्थळाने जाहीर केलेल्या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
  • विराट कोहलीला कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा मान मिळाला असून तिन्ही संघात स्थान मिळवणारा तो एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.
  • ‘क्रिकइन्फो’च्या 23 सदस्यीय पॅनेलकडून या संघांची निवड करण्यात आली. 50 कसोटी आणि सहा वर्षांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील निकष कसोटी संघासाठी काढण्यात आला. तर एकदिवसीय आणि ट्वेन्टी-20 संघांसाठी अनुक्रमे 75 आणि 100 ट्वेन्टी-20 सामन्यांचा अनुभव असलेल्या खेळाडूंना प्राधान्य देण्यात आले.

कोळ्याच्या नव्या प्रजातीचा शोध :

  • अहमदाबाद येथील गुजरात युनिव्हर्सिटी कॅम्पसमधून नव्या प्रजातीच्या कोळ्याचा शोध लागला आहे.
  • वन्यजीव संशोधक ध्रुव प्रजापती यांनी हा कोळी शोधला आहे. ‘विंग कमांडर अभिनंदन वर्धमान’ यांच्या नावे म्हणजेच ‘फ्लेग्रा अभिनंदन वर्धमान’ नावाने हा कोळी ओळखला जाणार आहे. तसेच फ्लेग्रा या कुळातील हा कोळी आहे.
  • गांधीनगर स्थित गीर फाउंडेशन येथे वन्यजीव संशोधक धु्रव प्रजापती यांनी ‘फ्लेग्रा अभिनंदन वर्धमान’ या कोळ्याचा शोध लावण्यापूर्वी 10 कोळ्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे.
  • तर नव्या प्रजातीच्या कोळ्याची शरीररचना ही तामिळनाडू येथे आढळणाऱ्या ‘फ्लेग्रा प्रसन्ना’या प्रजातीच्या कोळ्याशी मिळतीजुळती आहे. परंतु दोन्ही प्रजातींमधील प्रजनन प्रक्रियेमध्ये वेगळेपण दिसून येते. प्रजापती यांचे हे स्वतंत्र संशोधन आहे.

दिनविशेष:

  • सन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.
  • 2 डिसेंबर 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.
  • मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना 2 जानेवारी सन 1936 मध्ये झाली.
  • राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सन 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली होती.
  • सन 1985 मध्ये पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.