2 एप्रिल 2022 चालू घडामोडी – Current Affairs

2 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (2 एप्रिल 2022)

‘जीएसटी’ वसुलीचा विक्रम :

  • करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर भारतातील आर्थिक घडामोडी पुन्हा रुळावर येताना दिसत आहेत.
  • जीएसटी संकलनाची मार्च महिन्याची आकडेवारीवरून दिसत आहे.
  • अर्थ मंत्रालयाने शुक्रवार जारी केलेल्या आकडेवारीनुसार मार्च महिन्यात जीएसटी संकलन विक्रमी 1.42 लाख कोटी रुपये झाले आहे.
  • तर हे लक्षात घेण्यासारखे आहे की यापूर्वी जानेवारीमध्ये जीएसटी संकलन सर्वाधिक 1,40,986 कोटी रुपये होते.
  • तर, मार्च 2022 मध्ये एकत्रित GST महसूल 1,42,095 कोटी रुपये आहे.
  • मार्चमधील महसूल हा गेल्या वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 15 टक्क्यांनी जास्त आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (1 एप्रिल 2022)

पंतप्रधान नरेंद्र मोदीची विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या आपल्या कार्यक्रमाच्या 5व्या भागामध्ये देशभरातल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं.
  • तर यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा माझा अत्यंत आवडता कार्यक्रम आहे.
  • पण करोनामुळे मी तुमच्या सारख्या माझ्या सहकाऱ्यांना भेटू शकलो नाही. आज होणारा हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप आनंददायी आहे, कारण मोठ्या अंतरानंतर आपल्याला भेटण्याची संधी मिळत आहे.
  • पंतप्रधान मोदी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी निवेदन करणाऱ्या पाच विद्यार्थ्यांना मंचावर बोलावलं आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
  • तर त्यांनी सांगितलं की पूर्ण कार्यक्रमादरम्यान कोणत्याही विद्यार्थ्यामध्ये मला आत्मविश्वास कमी वाटला नाही. पंतप्रधानांनी विद्यार्थी आणि शिक्षणविभागाला शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता केली.

टेबल टेनिसपटू मीना परांडे यांचे निधन :

  • भारताच्या माजी टेबल टेनिसपटू मीना परांडे यांचे शुक्रवारी नागपूर येथे निधन झाले.
  • मीना यांनी जवळपास दोन दशकांच्या टेबल टेनिसमधील कारकीर्दीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली होती.
  • तर त्यांनी चार वेळा राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
  • तसेच त्या 1953 ते 1958 या कालावधीत महाराष्ट्र, तर 1959 ते 1965 या कालावधीत रेल्वेकडून खेळल्या.
  • तसेच मीना यांनी 1954 मध्ये इंग्लंड, तर 1956 मध्ये जपान येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.
  • खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर मीना यांनी प्रशिक्षकाची भूमिका बजावताना अनेक टेबल टेनिसपटू घडवले.

दिनविशेष:

  • 2 एप्रिल हा दिवस ‘जागतिक आत्मकेंद्रिपणा जागरूकता दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • सन 1870 मध्ये गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.
  • 1894 यावर्षी छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला.
  • भारतीय कवी व गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचा जन्म 2 एप्रिल 1926 रोजी झाला होता.
  • 2 एप्रिल 2011 रोजी क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताने 28 वर्षांनंतर विजय मिळवला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (3 एप्रिल 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.