19 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
सॅमसंग बनवणार 3 लाख कोटींचे Made In India स्मार्टफोन:
19 August 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 ऑगस्ट 2020)
रशियानं जगातील सर्वात पहिल्या करोनाविरोधातील लसीची निर्मिती केली:
रशियानं जगातील सर्वात पहिल्या करोनाविरोधातील लसीची निर्मिती केली आहे.
स्पुटनिक व्ही या नावानं तयार करण्यात आलेल्या रशियाच्या लसीच्या मागे महत्त्वाची भूमिका पार पाडणारे RDIF चे मुख्य अधिकारी किरिल दिमित्रेव यांनी एक इच्छा व्यक्त केली आहे.
भारतातही लसीचं उत्पादन सुरू करण्यासाठी उत्सुक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.
पुढील तीन महिन्यांमध्ये जगभरात 2 ते 3 लाखांपेक्षा अधिक लोकांना स्पुटनिक-व्ही ही लस देण्यात येईल आणि त्याचा प्रभावही दिसून येईल.
लसीच्या खरेदीसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या परवानगीची गरज नाही. देशांतर्गत नियामक मंडळाच्या मान्यतेची गरज आहे.
आम्ही भारतीय नियमाक मंडळ आणि लस उत्पादकांच्या संपर्कात आहोत,” असंही किरिल दिमित्रेव म्हणाले.
देशातील 37 सार्वजनिक कंपन्यांनी सामाजिक दायित्व म्हणून ‘पीएम केअर्स फंड’मध्ये 1900 कोटींचे भरीव योगदान दिले आहे.
करोना उद्रेकाच्या पाश्र्वभूमीवर 28 मार्चला ‘पीएम केअर्स फंड’ची स्थापना करण्यात आली.
‘पीएम केअर्स फंडा’तील योगदानाचा तपशील माहिती अधिकार कायद्याद्वारे देता येणार नसल्याचे 18 मे रोजी पंतप्रधान कार्यालयाने म्हटले होते.
कंपन्यांकडून ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला माहितीच्या अधिकारात मिळालेल्या तपशीलानुसार, 31मार्च 2020 अखेर ‘पीएम केअर्स फंड’मध्ये 3,076.62 कोटी रुपये जमा झाले होते.
त्यातील 3075.85 कोटी रूपयांच्या देणग्या हे ‘स्वयंस्फूर्त योगदान’ होते.
‘दी पॉवर फायनान्स कार्पोरेशन’ने 2020-21मधील सामाजिक दायित्व निधी तरतुदीपेक्षा अधिक रक्कम म्हणजे 200 कोटी रुपये दिले आहेत.
अमेरिकेबरोबर ‘F-16’ फायटर विमानांच्या खरेदीचा मोठा करार:
लॉकहीड मार्टिन या अमेरिकन विमान निर्मिती कंपनीकडून तैवानने 66 F-16 फायटर जेट विमाने खरेदी करण्याचे निश्चित केले आहे.
अमेरिका आणि तैवानमध्ये झालेला हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदी करार आहे.
62 अब्ज डॉलर्सचा हा करार शुक्रवारी निश्चित झाला. तैवानचा हा निर्णय चीनसाठी निश्चित एक झटका आहे.
अमेरिकेने मागच्यावर्षी तैवानला नव्या पिढीची F-16 विमाने विकायला मंजुरी दिली होती. या विमानांच्या समावेशामुळे तैवानला आपल्या एअर फोर्सला अत्याधुनिक बनवता येणार आहे.
सॅमसंग बनवणार 3 लाख कोटींचे Made In India स्मार्टफोन:
अॅपल चीनमधील आपला उद्योग भारतामध्ये स्थलांतरित करण्याचा विचार करत असल्यासंदर्भातील वृत्त समोर आलं होतं.
अशाप्रकारे आता मूळची दक्षिण कोरियामधील सॅमसंग ही स्मार्टफोन क्षेत्रातील आघाडीची कंपनीनेही परदेशातील उद्योग भारतामध्ये हलवण्यासंदर्भात विचार सुरु केला आहे.
सॅमसंग भारतामध्ये 40 बिलीयन डॉलर्सचे म्हणजेच 3 लाख कोटींचे स्मार्टफोन निर्माण करण्यासाठी युनिट सुरु करण्यासंदर्भातील हलचाली करत आहे.
रोहितसह पाच क्रीडापटूंची ‘खेलरत्न’साठी शिफारस:
भारताचा क्रिकेटपटू रोहित शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बात्रा, महिला हॉकी संघाची कर्णधार राणी रामपाल आणि पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मरियप्पन थंगवेलू यांची क्रीडा मंत्रालयाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, हॉकीपटू सरदार सिंग यांचा समावेश असलेल्या 12 सदस्यीय निवड समितीने पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच पाच जणांची ‘खेलरत्न’साठी शिफारस केली आहे.
दरवर्षी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी होणारा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा यंदा करोनामुळे ऑनलाइन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिनविशेष :
19 ऑगस्ट 1856 मध्ये गेल बॉर्डन या शास्त्रज्ञाला दुधाच्या शीतकरण प्रक्रियेचे पेटंट मिळाले.
अफगाणिस्तानला युनायटेड किंगडमपासून16 ऑगस्ट 1999 मध्ये स्वातंत्र्य मिळाले.
19 ऑगस्ट 1945 मध्ये होची मिन्ह व्हिएतनामच्या सत्तेवर आले.
स्वातंत्र्यसैनिक मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचा जन्म 19 ऑगस्ट 1886 मध्ये झाला.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.