17 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs

17 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 मे 2022)

मोदींच्या नेपाळ दौऱ्यात सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या :

  • भगवान गौतम बुद्धांचे जन्मस्थळ असलेल्या लुंबिनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांच्याशी सोमवारी द्विपक्षीय चर्चा केली.
  • दोन्ही देशांतील सहकार्य अधिक दृढ व्हावे व नवनवीन क्षेत्रांत बहुआयामी भागीदारी वाढावी, या मुद्दय़ांवर दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला.
  • तर या चर्चेनंतर दोन्ही पक्षांनी शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांशी संबंधित सहा सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
  • नेपाळच्या पंतप्रधानांच्या निमंत्रणावरून मोदी नेपाळच्या एकदिवसीय दौऱ्यावर गेले होते.
  • तसेच 2014 पासूनचा त्यांचा हा पाचवा दौरा आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (16 मे 2022)

त्रिपुरात 11 कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी :

  • सत्ताधारी भाजपचे नऊ आणि मित्रपक्ष आयपीएफटीचे दोन अशा 11 आमदारांना सोमवारी त्रिपुरातील माणिक साहा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.
  • मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भाजप- आयपीएफटी आघाडी सरकारच्या मंत्र्यांना राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल एस.एन. आर्य यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.
  • कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या आमदारांमध्ये भाजपचे जिष्णु देव वर्मा, रतन लाल नाथ, प्राणजित सिंघ रॉय, मनोज कांती देव, संताना चकमा, राम प्रसाद पॉल, भगवान दास, सुषांत चौधरी, राम पाद जमातिया आणि इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराचे (आयपीएफटी) एन.सी. देववर्मा व प्रेम कुमार रियांग यांचा समावेश आहे.

जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धात निखत, मनिषा, परवीनची पदकनिश्चिती :

  • भारतीय बॉक्सिंगपटू निखत झरीन, मनिषा आणि परवीन यांनी ‘आयबीए’ महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत सोमवारी उपांत्य फेरीचा टप्पा गाठत आपले पदक निश्चित केले.
  • आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेती निखतने इंग्लंडच्या चार्ली-सियान डेव्हिसनला 5-0 अशी धूळ चारली.
  • तर युवा बॉक्सिंगपटू परवीनने ताजिकिस्तानच्या शोइरा झुल्केनारोव्हाला याच फरकाने पराभूत केले.
  • दुसरीकडे, मनिषाने मंगोलियाच्या नामून मोनखोरला 4-1 अशा फरकाने नमवत आगेकूच केली.

‘महिला टी-20 चॅलेंज’साठी BCCIकडून तीन संघांची घोषणा :

  • बीसीसीआयने वुमन्स टी-20 चॅलेंज 2022 सामन्यांसाठी तयारी सुरु केली आहे.
  • 15 मे रोजी या सामन्यांचे मुख्य प्रायोजकत्व ‘My11Circle’कडे गेल्यानंतर आज बीसीसीआयने सामन्यांसाठी सघांची घोषणा केली आहे.
  • तर यावेळी एकूण तीन संघ एकमेकांशी भिडणार आहेत.
  • 23 ते 28 मे या कालावधित हे सामने खेळवले जाणार आहेत.
  • बीसीसीआयने सुपरनोवाज, ट्रेलब्लॅझर्श आणि व्हेलॉसिटी अशा ती संघाची घोषणा केली आहे.
  • सुपरनोवाज संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे तर ट्रेलब्लॅझर्स संघाचे स्मृती मंधाना आणि व्हेलॉसिटी संघाची धुरा दिप्ती शर्माकडे सोपवली आहे.
  • तर दुसरीकडे मिताली राज, झुलन गोस्वामी यांच्यासरख्या दिग्गज खेळाडूंचा यावेळी महिली टी-20 चॅलेंज 2022 सामन्यांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.

दिनविशेष :

  • 17 मे : जागतिक उच्च रक्तदाब दिन
  • 17 मे : जागतिक माहिती संस्था दिन
  • न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज ची स्थापना 17 मे 1792 मध्ये झाली.
  • 17 मे 1872 मध्ये इंग्रज व मराठे यांच्यात सालबाईचा तह झाला.
  • 17 मे 1940 मध्ये दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी बेल्जियममधील ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
  • 17 मे 1949 मध्ये भारताचा राष्ट्रकुलामधे राहण्याचा निर्णय.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (18 मे 2022)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago