15 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

15 February 2019 Current Affairs In Marathi

15 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (15 फेब्रुवारी 2019)

सुशील चंद्रा नवे निवडणूक आयुक्त:

  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे (सीबीडीटी) अध्यक्ष सुशील चंद्रा यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तर कायदा मंत्रालयाने त्यांच्या नावाची घोषणा केली आणि या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. ते 1980 बॅचच्या भारतीय महसूल सेवेचे (आयआरएस) अधिकारी आहेत.
  • माजी निवडणुक आयुक्त ओ. पी. रावत यांच्या निवृत्तीनंतर तत्कालीन निवडणुक आयुक्त सुनील अरोरा हे मुख्य निवडणुक आयुक्त बनले होते. त्यानंतर आयोगामध्ये निवडणुक आयुक्ताचे पद खाली होते.
  • तसेच निवडणुक आयोगामध्ये मुख्य निवडणूक आयुक्ताव्यतिरिक्त आणखी दोन निवडणूक आयुक्त असतात. आता सुशील चंद्रा यांच्या व्यतिरिक्त अशोक लवासा हे एक निवडणूक आयुक्त आहेत.

प्रशासकीय सेवांवर अंतिम नियंत्रण केंद्राचेच:

  • प्रशासकीय सेवांवर कोणाचे नियंत्रण असावे या वादग्रस्त प्रश्नाबाबत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन सदस्यीय पीठाने मतभिन्नता असलेला निर्णय दिला असला, तरी अंतिम शब्द मात्र केंद्र सरकारचाच असल्याचे मान्य केल्याचे
    सकृतदर्शनी निकालावरून दिसत आहे.
  • निर्णयामध्ये मतभिन्नता असल्याच्या पाश्र्वभूमीवर न्या. ए. के. सिकरी आणि न्या. अशोक भूषण यांच्या पीठाने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाच्या अधिक व्यापक पीठाकडे सुपूर्द करण्याचे ठरविले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रातील सरकार आणि दिल्लीतील आप सरकार यांच्यात अधिकारांबाबत सुरू असलेल्या सहा प्रकरणांची दोन सदस्यीय पीठासमोर सुनावणी झाली.
  • तर दोन न्यायाधीशांनी पाच प्रश्नांबाबत एकमताने निर्णय दिला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर केंद्राने आधीच सांगितल्याप्रमाणे नायब राज्यपालांचेच नियंत्रण राहील, त्याचप्रमाणे चौकशी आयोग नियुक्त करण्याचा अधिकारही केंद्र सरकारचाच असेल हे दोन्ही न्यायाधीशांनी मान्य केले.
  • तर दुसरीकडे, निवडून आलेल्या दिल्ली सरकारला सरकारी वकिलांच्या नियुक्त्या, जमीन महसूल प्रकरणे, वीज आयोग अथवा मंडळातील नियुक्त्या करण्याचे अधिकार असतील, असे पीठाने म्हटले आहे.
  • तथापि, प्रशासकीय सेवांवर दिल्ली सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याचा निर्वाळा न्या. भूषण यांनी दिला. या वादग्रस्त प्रश्नावर दोन न्यायाधीशांमध्ये मतभिन्नता आहे.

NIA ची 12 सदस्यीय टीम पुलवामा हल्ल्याची चौकशी करणार:

  • जम्मू काश्मीरच्या पुलवामा या ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्याची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून होणार आहे.
  • तसेच या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने यासंदर्भातल्या तपासाची जबाबदारी एनआयएकडे अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवली आहे.
  • तर यासंदर्भातल एका 12 सदस्यीय समितीची स्थापना कऱण्यात आली आहे. ज्यामध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञांचाही समावेश आहे. तर इतर वरिष्ठ अधिकारीही सहभागी झाले आहेत.
  • या टीममध्ये एका आयजी रँकच्या अधिकाऱ्यासह एकूण 12 जणांचा समावेश असणार आहे. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला तिथला तपास ही टीम करणार आहे. हल्ल्याशी संबंधित पुरावे गोळा करण्याचं काम एनआयएची टीम
    करणार आहे.

MPSC परीक्षेत आशिष बारकुल राज्यात पहिला:

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ऑगस्ट 2018 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवेच्या 136 पदांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात करण्यात आला आहे.
  • तर यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आशिष बारकुल हा राज्यातून प्रथम आला आहे. महिलांमधून पुण्याच्या स्वाती दाभाडे या तर मागासवर्गीयातून सोलापूरचा महेश जमदाडे प्रथम आला आहे.
  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यातील 37 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्यसेवेची पूर्व परीक्षा 1 लाख 96 हजार 695 उमेदवारांनी दिली होती.
  • त्यामध्ये सोलापूरच्या बार्शीतील आशिष बारकुलने बाजी मारली आहे. आशिष बारकुल हा बार्शीतील रहिवाशी असून तो पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता.

दिनविशेष :

  • 15 फेब्रुवरी 399 मध्ये सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • कॅनडाने नवीन ध्वज 15 फेब्रुवरी 1965 मध्ये अंगिकारला.
  • 15 फेब्रुवरी 1710 मध्ये फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचा जन्म झाला.
  • कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय मनोहर दिवाण यांचे 15 फेब्रुवरी 1960 मध्ये निधन झाले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.