14 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

14 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (14 डिसेंबर 2020)

RBI चा मोठा निर्णय :

  • रिझर्व्ह बँकेने रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंटची (RTGS) सुविधा आजपासून 24 तास म्हणजेच प्रत्येकवेळी उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, 14 डिसेंबरपासून आरटीजीएसची सुविधा 24 तास उपलब्ध असेल.
  • याचा अर्थ असा की तुम्ही आरटीजीएसद्वारे कधीही पैसे ट्रान्सफर करू शकता. यामुळे भारत या देशांमध्ये सामील होईल, जेथे ही सुविधा दिवसरात्र कार्यरत आहे.
  • आरटीजीएस डिजिटल फंड ट्रान्सफर करण्याची एक पद्धत आहे. आरटीजीएसच्या मदतीने कमी वेळात पैसे ट्रान्सफर केले जातात. याअंतर्गत किमान 2 लाख रुपये पाठविले जाऊ शकतात. जास्तीत जास्त रक्कम पाठविण्याची मर्यादा 10 लाख रुपये आहे.
  • आरटीजीएसमार्फत 2 लाख ते 5 लाखांपर्यंत निधी ट्रान्सफर करण्यासाठी आरबीआयने जास्तीत जास्त 24.5 रुपये शुल्क ठेवले आहे आणि 5 लाखाहून अधिक निधी ट्रान्सफर करण्यासाठी बँक जास्तीत जास्त 49.5 रुपये शुल्क आकारू शकते.
  • याआधी आरबीआयने एनईएफटीचे (NEFT) नियमांमध्ये बदल केले होते. एनईएफटीची सुविधा डिसेंबर 2019 पासून 24 तास उपलब्ध आहे. एनईएफटी देखील पेमेंटची एक पद्धत आहे. मात्र, यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया काही काळानंतर पूर्ण केली जाते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 डिसेंबर 2020)

मानवनिर्मित वस्तूंचे वजन उच्चांकावर :

  • सिमेंट, काँक्रिट, प्लास्टिक, धातू, अस्फाल्ट अशा विविध वस्तूंची पृथ्वीवर एवढ्या भरमसाठ प्रमाणात निर्मिती झाली आहे की, यंदाच्या वर्षअखेरीस सर्वाधिक वजन या वस्तूंचेच असेल, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
  • इस्रायलमधील वाइझमन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेतील रॉन मिलो आणि त्यांचे सहकारी हे सर्वजण भूतलावरील जैविक वस्तू आणि मानवनिर्मित वस्तू यांची मोजणी करत आहेत.
  • तर त्यांनी फक्त जमिनीवरील वस्तूंचे वजन मोजले आहे. पाण्यावरील वा पाण्याखालील वस्तूंचे वजन या पथकाने गृहीत धरलेले नाही.
  • तसेच साधारणत: 1900 सालापासूनचा डेटा या पथकाने संकलित केला आहे. त्यावरून काढलेल्या निष्कर्षानुसार यंदाच्या वर्षअखेरपर्यंत वर उल्लेखलेल्या मानवनिर्मित वस्तूंचे वजन जैविक कचऱ्याच्या तुलनेत अधिक भरेल, असे आढळून आले.
  • 20 व्या शतकाच्या सुरुवातीला मानवनिर्मित वस्तूंचे वजन जागतिक जैविक कचऱ्याच्या तुलनेत 3 टक्के होते; परंतु 2020 मध्ये मानवनिर्मित वस्तूंचे वजन जागतिक जैविक कचऱ्याच्या तुलनेत 1.1 टेराटनने अधिक भरल्याचे संशोधकांच्या निदर्शनास आले.

देशात पुढील महिन्यापासून करोना लसीकरणाची शक्यता :

  • ऑक्सफर्ड विद्यापीठ- अ‍ॅस्ट्राझेनेका यांची लस विकसित करत असलेल्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियातर्फे कोविड-19 लसीकरणाची मोहीम भारतात जानेवारीपर्यंत सुरू होण्याची शक्यता असल्याचे या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी म्हटले आहे.
  • तर या लसीच्या आणीबाणीकालीन वापरासाठी चालू महिना अखेपर्यंत आपल्याला परवानगी मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
  • तसेच ऑक्टोबर 2021 पर्यंत भारतातील प्रत्येकाचे लसीकरण होईल आणि त्यानंतर सामान्य जीवन पुन्हा सुरळीत होईल अशी आपल्याला अपेक्षा असल्याचे पूनावाला यांनी एका परिषदेत बोलताना सांगितले.

दुबई आयटीएफ टेनिस स्पर्धात अंकिताला दुहेरीचे विजेतेपद :

  • भारताची अव्वल टेनिसपटू अंकिता रैनाने दुबई येथील अल हबतूर चॅलेंज या ‘आयटीएफ’ प्रकारातील दुहेरीचे विजेतेपद पटकावले.
  • अंकिताने चालू वर्षांत पटकावलेले हे दुहेरीतील तिसरे विजेतेपद ठरले.
  • अंकिताने जॉर्जियाच्या इकॅटरिन जॉजरेझेच्या साथीने खेळताना स्पेनची अ‍ॅलिओना झॅडोइनोव आणि स्लोव्हाकियाची काजा जुवान या जोडीचा 6-4, 3-6, 10-6 असा पराभव केला.

दिनविशेष:

  • योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचा जन्म 14 डिसेंबर 1918 रोजी झाला होता.
  • अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक राज कपूर यांचा जन्म 14 डिसेंबर 1924 मध्ये झाला होता.
  • ‘दुसरे महायुद्ध‘ सन 1941 मध्ये जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
  • इंदिरा गांधी यांचे पुत्र ‘संजय गांधी‘ यांचा जन्म 14 डिसेंबर 1946 मध्ये झाला होता.
  • सन 1961 मध्ये टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश झाला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (15 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.