12 मे 2022 चालू घडामोडी – Current Affairs

आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन

12 May 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 मे 2022)

राजद्रोह कायद्याला स्थगिती :

  • राजद्रोह कायद्याला स्थगिती देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला.
  • तर या ब्रिटिशकालीन कायद्याचा फेरविचार होईपर्यंत राजद्रोहाचा कोणताही गुन्हा दाखल करू नये, असे स्पष्ट करतानाच न्यायालयाने या कायद्याखालील सर्व प्रलंबित खटले थांबविण्याचे आदेश सरकारला दिले.
  • सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला़ नागरी स्वातंत्र्य, नागरिकांचे हित आणि राष्ट्रहित यामध्ये संतुलनाची गरज आहे.
  • तसेच केंद्र सरकारने यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यांची दखल घेत भारतीय दंडविधानातील राजद्रोहाचे 124 (अ) कलम सध्याच्या सामाजिक वातावरणात गैरलागू असल्याने या तरतुदीचा फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालय परवानगी देत आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केल़े.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 मे 2022)

नारायण राणेंनी दिल्लीतील खादी सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्राचं केलं उद्घाटन :

  • उद्योगाला नवसंजीवनी देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाकडून दिल्लीत खादी सेंटर ऑफ एक्सलन्स केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.
  • एमएसएमई मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आज या केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं.
  • तर यावेळी त्यांनी खादी उद्योगाला चालना देण्याबाबत सुरू असलेल्या विविध प्रयोगाची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
  • भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी एमएसएमई आणि निफ्ट फॅशन डिझाइन क्षेत्रात काम करत आहे.

सायप्रस अ‍ॅथलेटिक्स स्पर्धात ज्योतीला राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक :

  • सायप्रस आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील 100 मीटर अडथळा शर्यतीमधील सुवर्णपदकासह ज्योती याराजीला अखेरीस तिसऱ्या प्रयत्नात 13.23 सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद करण्यात यश आले.
  • याआधी दोनदा ज्योतीचा राष्ट्रीय विक्रम नोंदवण्यात आला नव्हता.
  • आंध्र प्रदेशच्या ज्योतीने मंगळवारी 13.38 सेकंदांचा जुना विक्रम मोडीत काढला.
  • तर तो 2002 मध्ये अनुराधा बिस्वालने नोंदवला होता.
  • जागतिक अ‍ॅथलेटिक्स खंडीय स्पर्धेतील ही ‘ड’विभागाची स्पर्धा आहे.

कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धात रुद्रांक्ष पाटीलला सुवर्ण :

  • जर्मनीत सुरू असलेल्या ‘आयएसएसएफ’ कनिष्ठ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारतीय नेमबाज रुद्रांक्ष पाटीलने बुधवारी सुवर्णपदकाची कमाई केली.
  • तर या गटात रौप्यपदकसुद्धा भारताच्याच अभिनव शॉ याला मिळाले.
  • रुद्रांक्ष आणि अभिनव या भारतीय जोडगोळीने सकाळच्या सत्रात आठ स्पर्धकांचा समावेश असलेल्या अंतिम टप्प्यात सर्वोत्तम कामगिरी केली.
  • कनिष्ठ महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात मंगळवारी पात्रता फेरीत 630.५ गुणांसह अव्वल स्थान मिळवणाऱ्या रमिताने अंतिम टप्प्यातही 561 गुणांसह सर्वोत्तम कामगिरी केली.

दिनविशेष :

  • 12 मे : आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन.
  • पोलंड देशातील सर्वात जुने विद्यापीठ जगीलीनियन विद्यापीठाची सुरवात 12 मे 1364 मध्ये झाली.
  • अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सान मार्कोस राष्ट्रीय विद्यापीठाची सुरवात 12 मे 1551 मध्ये झाली.
  • आग्रा येथे शिवाजी महाराज व औरंगजेब यांची पहिली व शेवटची भेट 12 मे 1666 मध्ये झाली.
  • 12 मे 1797 मध्ये नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
  • बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिले पूर्णतः स्वयंचलित संगणक Z3 12 मे 1941 मध्ये सादर केले.
  • प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन 12 मे 1952 मध्ये सुरू झाले.
  • 12 मे 1955 मध्ये दुसरे महायुद्ध – संपल्यावर ऑस्ट्रियाने दोस्त राष्ट्रांकडून स्वातंत्र्य मिळवले.
  • सोव्हिएट अंतराळ स्थानक लूना 5 12 मे 1965 मध्ये चंद्रावर कोसळले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 मे 2022)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.