12 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

12 March 2019 Current Affairs In Marathi

12 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (12 मार्च 2019)

राष्ट्रपतींच्या हस्ते 47 जणांचा पद्म पुरस्काराने गौरव:

  • भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कारांचे वितरण केले. विविध क्षेत्रातील नामवंत 47 जणांना पद्म पुरस्कार देण्यात आला, ज्यामध्ये 9 क्रीडापटूंचाही समावेश होता. Bajrang-Puniya
  • कुस्तीपटू बजरंग पुनिया, क्रिकेटर गौतम गंभीर, फुटबॉल कर्णधार सुनिल छेत्री, बास्केटबॉलपटू प्रशांती सिंह, तिरंदाज बोम्बायला देवी, ग्रँडमास्टर हरिका द्रोणावल्ली, भारताचा कबड्डी कर्णधार अजय ठाकूर आणि टेबल टेनिसपटू अंचता शरथ कमाल यांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
  • 1984 साली माऊंट एव्हरेट्सवर जाणाऱ्या पहिल्या महिला भारतीय बनण्याचा मान पटकावणाऱ्या बचेंद्री पाल यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. खडतर प्रसंगावर मात करत आपली नवीन ओळख निर्माण करणाऱ्या बचेंद्री यांचा पद्मभुषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 मार्च 2019)

‘world wide web’ ला आज 30 वर्ष पूर्ण:

  • कोणतंही संकेस्थळ म्हटले की त्याची सुरुवात होते www ने. www अर्थात world wide web ला आज (12 मार्च) 30 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त गुगलने खास डूडल केले आहे.
  • कोणत्याही वेबसाइटच्या आधी world wide web (www) दिसल्यानंतरच वेगवेगळे रिसोर्सेस आणि डॉक्यूमेंट्सचे ग्रुप असते. ज्यात एकत्र जोडून वेबसाइट बनवली जाते. याचा शोध वैज्ञानिक टीम बर्नर ली यांना लावला. गुगलने डुडल बनवताना टीम बर्नर ली यांच्या योगदानाचीही आठवण केली.
  • जगाला इंटरनेटची भेट देणारे टीम बर्नर ली यांचा इंग्लंडमध्ये जन्म झाला. क्विंस कॉलेज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी 1976 मध्ये फिजिक्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 1989 मध्ये सर्वात आधी इंटरनेट आणि world wide web तयार केले.

DGCA कडून नवी नियमावली जारी:

  • इंडोनेशिया व इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्यानंतर भारतातील बोईंग विमानांचा वापर बंद होणार का, याबाबत निर्माण झालेले संभ्रम अखेर दूर झाले आहे.
  • हवाई वाहतूक महासंचालनालयाने ‘बोईंग’ विमानासंदर्भात हवाई वाहतूक कंपन्यांना सुरक्षा सूचना जारी केली असून यात वैमानिकाला उड्डाणाचा किमान एक हजार तासांचा अनुभव तर सह वैमानिकाला उड्डाणाचा किमान 500 तासांचा अनुभव बंधनकारक करण्यात आला आहे. DGCA
  • इथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग विमानाला भीषण अपघात झाला. इंडोनेशियातील अपघातानंतर बोईंग विमानाला हा दुसरा भीषण अपघात होता. अलीकडेच झालेल्या अपघातात 157 जण ठार झाले आहेत.
  • इथिओपियन एअरलाइन्सचे विमान नैरोबीकडे जाण्यासाठी उडाले असताना सहा मिनिटात ते कोसळले होते त्यात सर्व प्रवासी ठार झाले. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर भारतातील बोईंग विमानांचा वापर बंद होणार का, याबाबत प्रश्न निर्माण झाले होते.
  • बोईंग 737 मॅक्स विमानांचा वापर भारतातही केला जातो. जेट एअरवेज व स्पाइस जेट या कंपन्या 737 मॅक्स बोईंग विमानांचा वापर करतात.

‘रिअल माद्रिद’च्या प्रशिक्षकपदी पुन्हा झिनेदिन झिदान:

  • फुटबॉल जगतातील अत्यंत नावाजलेल्या ‘रिअल माद्रिद’ या क्लबच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा झिनेदिन झिदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 10 महिन्यांपूर्वीच झिदान यांना संघाच्या सुमार कामगिरीच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
  • ‘रिअल माद्रिद’ हा फुटबॉल क्लब 1902 साली सुरु झाला असून या फुटबॉल क्लबमध्ये गेल्या वर्षभरापासून प्रशिक्षकपदावरुन संभ्रमावस्था दिसून आली होती. कोपा डेल रे, चॅम्पियन्स ट्रॉफी, ला लिगा यासारख्या नामांकीत स्पर्धांमध्ये ‘रिअल माद्रिद’ला अपेक्षित कामगीरी करता आली नव्हती. त्यामुळे गेल्या वर्षी मे महिन्यात झिनेदिन झिदानला प्रशिक्षकपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
  • तसेच यानंतर प्रशिक्षकपदी नियुक्ती झालेल्या ज्युलेन लोपेतेगुई यांची देखील ऑक्टोबर महिन्यात अवघ्या 139 दिवसांत प्रशिक्षकपदावरुन उचलबांगडी झाली. त्यांच्या जागी सँतियागो सोलारी यांची नियुक्ती करण्यात आली.
  • मात्र, सोलारी यांची कारकिर्द देखील पाच महिन्यांमध्येच संपुष्टात आली. त्यामुळे आता प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती होणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. 11 मार्च रोजी अखेर ‘रिअल माद्रिद’ने प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा झिनेदिन झिदान यांची नियुक्ती करत असल्याचे जाहीर केले.

आता मदर तेरेसांचा बायोपिक येणार:

  • बॉलिवूड चित्रपटांमध्ये ‘बायोपिक’ चा ट्रेंडच आला आहे. हे सिनेमा सर्वाधिक कमाई करून देतात हेदेखील त्यांना मिळालेल्या नफ्यावरून स्पष्ट झाले आहे.
  • आत्तापर्यंत आलेले बायोपिक हे बॉलिवूड स्टार, भारतीय खेळाडू तसेच राजकीय नेते किंवा इतिहासातील पात्रांचा जीवनपट दाखवणारे होते. आता नोबेल पुरस्कार विजेत्या मदर तेरेसा यांच्या जीवनावर आधारीत बायोपिक बवनण्यात येणार आहे. mother-teresa
  • चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन सीमा उपाध्यय करणार असून बॉलिवूड तसेच हॉलिवूड स्टार या चित्रपटात झळकणार आहेत. प्रदीप शर्मा, नितीन मनमोहन, गिरीश जोहर आणि प्राची मनमोहन या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.
  • चित्रपट निर्मात्यांनी मदर तेरेसा यांच्या बद्दल जाणून घेण्यासाठी सध्याच्या मिशनरी ऑफ चॅरिटी सुपीरियर जनरलच्या सिस्टर प्रीमा मेरी पियिक यांची भेट घेतली. तसेच कोलकात्ता येथील सिस्टर लीन यांनी चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छाही दिल्या.
  • ‘आम्ही कोलकातामधील मिशनरी ऑफ चॅरिटीला भेट दिली आणि तो अनुभव आमच्यासाठी खास होता’ असे उपाध्यय यांनी म्हटले. मदर तेरेसा यांच्या सेवाभावी कार्यावर चित्रपट बनवताना निर्मात्यांना आनंद होत असल्याचं त्यांनी सांगितले आहे.

दिनविशेष:

  • भारताचे संरक्षणमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुखमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी झाला होता.
  • रशियाची राजधानी सेंट पीट्सबर्ग येथून मास्को येथे सन 1918 मध्ये हलविण्यात आली.
  • सन 1930 मध्ये महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहासाठी 200 मैलाच्या दांडीयात्रेला सुरवात केली.
  • चेक प्रजासत्ताक, हंगेरीपोलंड नाटो (NATO) मध्ये 1999 यावर्षी सामील झाले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (13 मार्च 2019)

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.