11 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (11 जून 2019)
चांद्रयान-2 मोहिमेची तारीख ठरली :
- भारतीय अंतराळ संसोधन संस्था अर्थात इस्रोची महत्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेची चाचणी अखेरच्या टप्प्यात आली असून तामिळनाडूच्या महेंद्रगिरी आणि बंगळूरूच्या ब्यालालू येथे ही चाचणी सुरु आहे.
- तसेच येत्या 9 जुलैपासून या मोहिमेचे लॉन्चिंग करण्याचा इस्रोचा मानस आहे.
- तर इस्रोच्या वेळापत्रकानुसार, या मोहिमेवर जाणारे अंतराळयान 19 जून रोजी बंगळूरू येथून रवाना होईल त्यानंतर ते 20 किंवा 21 जूनला श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावर पोहोचेल. त्यानंतर येथून त्याचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण होईल.
- चंद्रावर गेल्यानंतर थ्रीडी मॅपिंगच्या माध्यमातून तिथल्या पाण्याच्या रेणूंची तपासणी, खनिजांची तपासणी त्याचबरोबर ज्या ठिकाणी आजवर कोणीही पोहोचलेले नाही अशा चंद्राच्या बाजूवर यान उतरवणे यासाठी इस्रोने मोठी तयारी केली आहे.
- पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3,844 लाख किमी आहे. यामध्ये यानाचे प्रक्षेपण अचूकता अंतर ही महत्वाची गोष्ट आहे.
- चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा यावर परिणाम होतो. त्याचबरोबर चंद्रावर इतर खगोलीय संस्थांचा वावर असून सुर्याच्या अतिनील किरणांचाही परिणाम यावर होणार आहे. त्याचबरोबर संवाद साधताना होणारा उशीर ही देखील या मोहिमेतील एक मोठी समस्या आहे.
- पृथ्वीवरुन कोणताही संदेश पाठवला तर तो यानापर्यंत पोहोचताना काही मिनिटं लागू शकतात. त्याठिकाणी संदेशासाठीचे रेडिओ सिग्नल्स कमजोर असू शकतात. त्याचबरोबर या संवादादरम्यान होणारा वातावरणाचा आवाजही यावर परिणाम करु शकतो.
12 आयकर अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती :
- मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची सुरुवात होऊन 10 दिवस होत असतानाच अर्थ मंत्रालयाने आयकर विभागात ‘सफाई’ अभियान सुरु केले आहे.
- भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्ता असे आरोप असलेल्या 12 अधिकाऱ्यांना सरकारने निवृत्ती घ्यायला लावली.
अर्थ मंत्रालयाने डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्समधील 56व्या कलमाअंतर्गत 12 अधिकाऱ्यांना निवृत्ती घ्यायला लावली.आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तपदावरील अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. - 1985 च्या बॅचमधील आयकर विभागातील सहआयुक्त अशोक अग्रवाल यांचा या यादीत समावेश आहे. अग्रवाल यांनी सक्तवसुली संचालनालयातही काम केले होते. याशिवाय नोएडातील आयकर आयुक्त एस के श्रीवास्तव यांना देखील सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली आहे. श्वेताभ सुमन, होमी राजवंश (आयकर आयुक्त, तामिळनाडू), बी बी राजेंद्र प्रसाद (आयुक्त, गुजरात), अलोक कुमार मित्रा (आयुक्त कोच्ची), अजय कुमार सिंह (आयुक्त, कोलकाता), बी अरुलप्पा (आयुक्त, कोच्ची), विवेक बत्रा (अतिरिक्त आयुक्त, भुवनेश्वर), चंद्रसेन भारती (अतिरिक्त आयुक्त अलाहाबाद), राम कुमार भार्गव (सहाय्यक आयुक्त, लखनौ) हे भ्रष्टाचाराप्रकरणी दोषी ठरले असून त्यांना देखील निवृत्ती घ्यायला लावण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही.
ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन :
- नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे बंगळुरूत निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.
- जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना 1999 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
- तसेच त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (1999) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर ‘इक्बाल’ (2005) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (2009), एक था टायगर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंश वृक्ष (1972), काडू (1974), ओन्दानुंडू कालाडल्ली (1978) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (1980) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे. याशिवाय उंबरठा या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते.
- 1994 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्कार चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
युवराज सिंगची निवृत्तीची घोषणा :
- भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याने मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये निवृत्तीची घोषणा केली. तर या घोषणेबरोबर युवराजच्या 18 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम लागला आहे.
- तसेच कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आला नाही असा पराक्रम आपल्या नावावर करणारा युवराज हा एकमेव खेळाडू ठरला आहे.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन विश्वचषक जिंकणाऱ्या संघांमध्ये युवराजचा समावेश होता. यामध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषकाचा समावेश आहे.
दिनविशेष :
- मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात सन 1665 मध्ये 11 जून रोजी पुरंदरचा तह झाला.
- 11 जून 1895 मध्ये पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.
- एडविन आर्मस्ट्राँग यांनी 11 जून 1935 रोजी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा