11 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

11 January 2020 Current Affairs In Marathi
11 January 2020 Current Affairs In Marathi

11 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (11 जानेवारी 2020)

देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू :

  • लोकसभेत मंजूर झाल्यानंतर 11 डिसेंबर रोजी सुधारित नागरिकत्व विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलं.
    125 विरूद्ध 105 च्या फरकानं राज्यसभेतही हे विधेयक मंजूर झालं. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं. आता देशभरात हा कायदा लागू करण्यात आला असून केंद्र सरकारनं याची अधिसूचना जारी केली आहे.
  • धार्मिक छळाला कंटाळून पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी व ख्रिस्ती समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही आणि त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल, अशी तरतूद सुधारित नागरिकत्व कायद्यात करण्यात आली आगे.
  • तर श्रीलंकेतील तमिळ, म्यानमारमधील मुस्लीम तसेच, पाकिस्तानातील मुस्लिमांतील अन्य समुदायातील व्यक्तींना या कायद्याचा लाभ मिळणार नाही.
  • तसेच ही दुरुस्ती घटनेच्या सहाव्या अनुसूचित समाविष्ट केलेल्या आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना, तसेच बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, 1873 मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना लागू असणार नाही.
  • सध्या कोणत्याही परदेशी व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी भारतामध्ये कमीत कमी 11 वर्ष राहणं आवश्यक आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये ही अट शिथिल करून ती सहा वर्ष करण्यात आली आहे.
  • तर यासाठी भारतीय नागरिकत्व कायदा, 1955 मध्ये काही बदल करण्यात आलेत. ज्यामुळे भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करणाऱ्यांना कायदेशीररीत्या सोयीचं पडेल.

शाळकरी मुलांच्या आईच्या खात्यात वर्षाला जमा होणार 15 हजार रुपये :

  • आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठी महत्त्वाकांक्षी ‘अम्मा वोडी’ योजना जाहीर केली आहे.
  • तर या योजनेअंतर्गत ज्यांची मुलं शाळेत शिकत आहेत अशा गरीब महिलांना आर्थिक मदत दिली जाणार आहे.
  • तसेच या महिलांच्या खात्यात वर्षाला 15 हजार रुपये देण्याची सरकारची योजना असून मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी याची घोषणा केली आहे. हे पैसे वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहे.
  • जोपर्यंत मुलांचं शालेय शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे गरीब महिलांना आपल्या मुलांना शिक्षण देण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळणार आहे.

जगातील सर्वात उंचीवरील पुलाचे बांधकाम वेगाने सुरू :

  • पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत काश्मीर उर्वरित भारताशी रेल्वेच्या जाळ्याने जोडले जाणार आहे. जगातील सर्वात उंचीवरील या रेल्वे पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी सरकारने नवी मुदत निश्चित केली आहे.
  • तर हा रेल्वेमार्ग पॅरिसच्या आयफेल टॉवरपेक्षा 35 मीटर उंच राहील अशी अपेक्षा आहे. भारतीय रेल्वेच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील हा सर्वात आव्हानात्मक प्रकल्प असल्याचे या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कोकण रेल्वेने म्हटले आहे.
  • तसेच या पुलाचे बांधकाम म्हणजे स्वातंत्र्यानंतर हाती घेण्यात आलेल्या काश्मीर रेल लिंक प्रकल्पातील सर्वात आव्हानात्मक भाग आहे. बांधून पूर्ण झाल्यानतंर तो अभियांत्रिकीतील चमत्कार ठरेल, असे गुप्ता म्हणाले.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धात जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचे सोनेरी यश :

  • ‘खेलो इंडिया’ युवा क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचे शुक्रवारी गुवाहाटी येथे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.
  • पहिल्याच दिवशी महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक्स खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करताना दोन सुवर्णपदकांची कमाई केली.
  • महाराष्ट्राच्या अस्मी बदाडे हिने तालबद्ध जिम्नॅस्टिक्समध्ये तर मानस मनकवळे याने पॉमेल हॉर्स प्रकारत सुवर्णपदक प्राप्त केले.
  • तर 17 वर्षांखालील गटात अस्मीने 43.80 गुणांची कमाई करत सुवर्णपदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या श्रेया बंगाळे हिने 40.80 गुण मिळवत रौप्यपदक पटकावले. या दोघींनीही दोरी आणि चेंडूच्या साहाय्याने अप्रतिम कसरती सादर केल्या.
  • अस्मीने याआधी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये 5 सुवर्ण आणि एक रौप्यपदक मिळवले आहे. अस्मी ही ठाणे येथील ज्ञानसाधना विद्यामंदिरची विद्यार्थी असून ती पूजा आणि मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये अनोखी कामगिरी करणारा पहिला फलंदाज :

  • श्रीलंकेविरुद्ध अखेरच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने धडाकेबाज फलंदाजी करत 200 धावांचा टप्पा ओलांडला. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली.
  • तर मधल्या फळीत मनिष पांडे, शार्दुल ठाकूर, विराट कोहली या फलंदाजांनी त्यांना उत्तम साथ दिली.
  • विराटने पुण्याच्या गहुंजे मैदानावर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येताना 17 चेंडूत 26 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 2 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
  • मात्र या छोटेखानी खेळीतही विराटने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराट 250 चौकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
  • भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, लंकेविरुद्ध तिसऱ्या टी-20 सामन्यात आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना विराटने एक धाव घेत, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने 11 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
  • तर 196 डावांमध्ये विराटने ही कामगिरी केली असून यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगचा विक्रम मोडीत काढला.

व्हिडीओ केवायसी करणारा भारत जगातील एकमेव देश :

  • मोबाइल व्हिडीओ संवादाद्वारे ‘नो युवर कस्टमर’ अर्थात केवायसी प्रक्रिया राबविण्यास बँका व फिनटेक कंपन्यांना रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. त्यासाठी रिझर्व्ह बँकेने नियमांत बदल केले आहेत.
  • तर आधार व इतर ई-दस्तावेजांआधारे ई-केवायसी व डिजिटल केवायसी राबविण्यासही रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे.
  • सरकारने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती केली असून, बँकेने केवायसीविषयक नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे भारत व्हिडीओ केवायसीची परवानगी असलेला जगातील एकमेव देश ठरला आहे.
  • बँका नवे ग्राहक जोडण्यासाठी अ‍ॅपच्या माध्यमातून व्हिडीओद्वारे, तसेच आधार व पॅन प्राप्त करून केवायसी प्रक्रिया राबवू शकतील.
  • बिगर-बँक संस्थांना ई-केवायसीची परवानगी नाही. मात्र, प्रत्यक्ष आधार व क्यूआर कोडच्या माध्यमातून त्यांना केवायसी प्रक्रिया राबविता येईल. आधारद्वारे ई-केवायसी प्रक्रिया राबविण्यास कोर्टाने मनाई केल्यानंतर नवीन ग्राहक जोडणे मोबाइल वॉलेट कंपन्यांना कठीण झाले होते.
  • आरबीआयने म्हटले की, डिजिटल केवायसी म्हणजे ग्राहकाचा लाइव्ह फोटो घेणे व आधार असल्याचा वैध अधिकृत पुरावा घेणे. जिथे ऑफलाइन पडताळणी शक्य नाही, तिथे व्हिडीओ केवायसी राबविता येईल. अधिकृत अधिकारी लाइव्ह फोटो घेतील. जेथे फोटो घेतला, त्या स्थानाची अक्षांश-रेखांशासह नोंद घेतली जाईल.

दिनविशेष:

  • ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि.स. खांडेकर यांचा जन्म 11 जानेवारी 1898 मध्ये झाला होता.
  • गुलजारीलाल नंदा यांनी सन 1966 मध्ये भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला होता.
  • सन 1972 मध्ये पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.
  • क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म 11 जानेवारी 1973 मध्ये झाला.
  • बुद्धिबळाच्या खेळात सन 1980 मध्ये नायजेल शॉर्ट वयाच्या 14व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.
  • कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून सन 1999 मध्ये जारी झाला होता.
  • सन 2001 मध्ये एस.पी. भरुचा यांनी भारताचे 30वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
2 Comments
  1. Akshay Adhau says

    Dhanshri Patil ma’am
    I daily read your blogs and it helps me alot.
    Thx to you.
    Your doing great job
    Thnk you So much ……🙏

    1. Dhanshri Patil says

      Thanks for the appreciation.
      keep visiting.

Leave A Reply

Your email address will not be published.