10 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

हिंदी महासागर
हिंदी महासागर

10 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (10 ऑगस्ट 2021)

हिंदी महासागराची तापमानवाढ :

  • अन्य समुद्रांपेक्षा हिंदी महासागराची जलद गतीने तापमानवाढ होत असून येत्या काही दशकांत भारतात उष्णतेच्या लाटा येतील आणि पूरपरिस्थितीलाही तोंड द्यावे लागेल, असा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या जागतिक अहवालात देण्यात आला.
  • तर पृथ्वीचे तापमान वाढत असल्याने कोणकोणते जागतिक दुष्परिणाम संभवतील, याबाबतचा संयुक्त राष्ट्रांच्या ‘इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेन्ज’ (आयपीसीसी)चा सहावा अहवाल ‘क्लायमेट चेंज 2021 – दी फिजिकल सायन्स बेसिस’ सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यात भारताबद्दल गंभीर इशारा देण्यात आला आहे.
  • तसेच हिंदूी महासागराच्या तापमानवाढीमुळे समुद्रपातळीत वाढ होऊन किनारपट्टीच्या सखल भागांमध्ये वारंवार तीव्र पूरपरिस्थिती उद्भवेल, असे या अहवालात म्हटले आहे.
  • भारतासारख्या देशांमध्ये वायूकणांच्या (एरोसोल) उत्सर्जनामुळे उष्णतेच्या लाटा निर्माण होतात. त्यामुळे वायूकणांचे उत्सर्जन कमी करणे हवेच्या गुणवत्तेसाठी महत्त्वाचे आहे, असे फ्रेडीरिक ओट्टो या हवामानशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2021)

मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांकडे :

  • मागासवर्ग निश्चितीचा अधिकार पुन्हा राज्यांना बहाल करणारे 127 वे घटनादुरुस्ती विधेयक सोमवारी लोकसभेत मांडण्यात आले.
  • तर गेल्या आठवडय़ात केंद्र सरकारने या घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. लोकसभेत आज या विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
  • ‘पेगॅसस’च्या मुद्दय़ावर विरोधकांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली असली तरी, या घटनादुरुस्ती विधेयकाला पाठबा देण्याचे विरोधकांनी स्पष्ट केल्यामुळे दोन्ही सदनांमध्ये या विधेयकाचा मार्ग सुकर झाला आहे.
  • तसेच देशाच्या व मागास समाजाच्या हिताच्या मुद्दय़ावर विरोधी पक्ष केंद्र सरकारला सहकार्य करेल. त्यामुळे 127 व्या घटनादुरुस्तीवर विरोधक चर्चा करण्यास तयार असल्याचे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले.
  • केंद्राने केलेल्या 102 व्या घटनादुरुस्तीमुळे मागासवर्ग निश्चितीचा अधिकार केंद्र सरकारच्या अखत्यारित आला.
  • मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून आरक्षण देण्यात अडचण निर्माण झाली.
  • नव्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागासवर्ग निश्चितीचा अधिकार मिळेल.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन :

  • मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे केंद्रीय सांस्कृतिक कार्य विभागाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोमवारी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात सांगितले.
  • तर भाजपचे लोकसभेतील खासदार गोपाल शेट्टी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर मेघवाल यांनी सांगितले, की या विषयावर विचार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे.
  • केंद्र सरकारकडून आतापर्यंत देशातील तमिळ, संस्कृत, कन्नड, मल्याळम, ओडिया या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.
  • तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा विषय विचाराधीन असून त्याबाबत वेगाने हालचाली करण्यात येत आहेत. केंद्र सरकार त्याबाबत सकारात्मक आहे असे मंत्री मेघवाल यांनी लोकसभेत बोलताना नमुद केले आहे.

दिनविशेष :

  • 10 ऑगस्ट हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय बायो डीझेल दिन‘ आहे.
  • सन 1675 मध्ये चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.
  • स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना 10 ऑगस्ट 1810 मध्ये झाली.
  • सन 1821 मध्ये मिसुरी हे अमेरिकेचे 24 वे राज्य बनले.
  • भारतीय राजकारणी फुलन देवी यांचा जन्म 10 ऑगस्ट 1963 मध्ये झाला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (11 ऑगस्ट 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.