1 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (1 एप्रिल 2020)
4 सरकारी बँकांचं कर्ज झालं स्वस्त :
- गेल्या काही दिवसांपूर्वीच आरबीआयनं रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेपो रेटमध्ये कपात केली आहे.
- रेपो रेट 75 बेसिस पॉइंटने कमी करून 4.4% करण्यात आला असून, रिव्हर्स रेपो दरातही 90 बेसिस पॉईंटने कमी करून 4% करण्यात आला आहे.
- तर कर्जावरील व्याजदर 5.15 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर आला असून, अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदरात घट करण्यात आली आहे.
- 1 मार्च रोजी असलेल्या सर्व टर्म लोनचे तीन महिन्यांचे मासिक हप्ते पुढे ढकलण्याचे अधिकार सर्व बँका तसेच नॉनबँकिंग फायनान्स कंपन्या यांना देण्यात आले आहेत.
- याबाबतचा निर्णय बँका तसेच कंपन्यांवर सोडण्यात आला होता. या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दंडाच्या स्वरूपात व्याज लागणार नाही, असे दास यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता चार सरकारी बँकांनी व्याजदर घटवले आहेत.
- सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली. त्यानंतर बँक ऑफ इंडिया (बीओआय), बँक ऑफ बडोदा (बीओबी)ने कर्जाचे दर कमी केले. आता आणखी एक सरकारी बँक युनियन बँक ऑफ
इंडियाने (यूबीआय) कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे. - तसेच युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या रेपो दराशी संबंधित कर्जाचे व्याजदर 0.75 टक्क्यांनी कमी केले. कर्जाचे दर कमी झाल्याने आता या बँकांकडून गृह कर्ज किंवा वाहन कर्ज घेणे स्वस्त होईल.
मुख्यमंत्र्यांसह सर्व लोकप्रतिनिधी अन् शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात :
- कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे.
- तर गेल्या 15 दिवसांहून राज्यात लॉकडाऊन असल्याने आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाल्याचा पाहायला मिळत आहे.
- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचं उपमुख्यमंत्रीअजित पवारांनी सांगितले
- तसेच राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या
कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मिळणार दोन टप्प्यांत :
- राज्य सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्चचा पगार अनुक्रमे 50 व 75 टक्के इतकाच देण्याचा व उर्वरित रक्कम दुसऱ्या टप्प्यात देण्याचा निर्णय राज्य शासनाने मंगळवारी घेतला.
- याशिवाय मुख्यमंत्री, सर्व मंत्री, आमदार व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींना मार्चचा पगार /मानधन 40 टक्केच देण्यात येणार असून उर्वरित रक्कम दुसऱ्या टप्प्यात दिली जाईल.
- कोरोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच कोरोनाविरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
एप्रिलपासून रेल्वे बुकिंगला सुरुवात :
- करोनाच्या पार्श्वभुमीवर बंद करण्यात आलेल्या रेल्वेच्या बुकिंगला 15 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे.
- तर आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाईटवर 15 एप्रिलपासून प्रवासाची तिकिटं उपलब्ध असणार आहेत.
- करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला. 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाउन असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात होणार आहे.
दिनविशेष:
- 1 एप्रिल हा दिवस ‘एप्रिल फूल दिन‘ म्हणून साजरा केला जातो.
- मुंबई अग्निशमन दलाची स्थापना 1887 मध्ये झाली.
- सन 1895 मध्ये भारतीय लष्कर स्थापन झाले.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक ‘केशव बळीराम हेडगेवार‘ यांचा जन्म 1 एप्रिल 1889 मध्ये झाला.
- भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना सन 1935 मध्ये झाली
- सन 1957 मध्ये भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 यावर्षी (मरणोत्तर) भारतरत्न प्रदान करण्यात आला.
- सन 2004 मध्ये गूगलने जीमेल (Gmail) ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा