समास व त्याचे प्रकार

Category: Marathi (मराठी) Published on 27 October 2015
Written by Shital Burkule Hits: 30589

समास व त्याचे प्रकार

 • काटकसर करणे हा मनुष्याच्या अंगी असलेला एकूण गुण आहे. आपण दैनंदिन जीवनात बरीच काटकसर करतो.

 • त्यामुळे आपण बोलतांना सुद्धा हा गुण वापरतो. बर्यातचदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो.

 • जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच 'समास' असे म्हणतात.

 • अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.

 • उदा.

1) वडापाव        -      वडाघालून तयार केलेला पाव.

 

2) पोळपाट       -      पोळी करण्यासाठी लागणारे पाट

 

3) कांदेपोहे       -      कांदे घालून तयार केलेले पोहे.

 

4) पंचवटी        -      पाच वडांचा समूह

 

 • समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात.

 1. अव्ययीभाव समास

 2. तत्पुरुष समास

 3. व्दंव्द समास

 4. बहुव्रीही समास

 अव्ययीभाव समास :

ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारख केला जातो त्यास 'अव्ययीभवन समास' असे म्हणतात.

 

अव्ययीभाव समासात आपल्याला खलील भाषेतील उदाहरणे पाहावयास मिळतात.

 

अ) मराठी भाषेतील शब्द

उदा.        

 1. गोवोगाव        -     प्रत्येक गावात

 2. गल्लोगल्ली     -    प्रत्येक गल्लीत

 3. दारोदारी        -    प्रत्येक दारी

 4. घरोघरी         -    प्रत्येक घरी

 • मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणाप्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.

ब) संस्कृत भाषेतील शब्द

 1. प्रती (प्रत्येक)     -   प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन

 2. आ (पर्यत)        -    आमरण

 3. आ (पासून)       -    आजन्म, आजीवन

 4. यथा (प्रमाण)     -    यथाविधी, यथामती, यथाशक्ती.

 • वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपसर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत. संस्कृत मधील उपसर्गाना अव्यय मानले जाते.

 • वरील उदाहरणामध्ये हे उपसर्ग प्रारंभी लागून सामासिक शब्द तयार झालेला आहे व ह्या उपसर्गाना सामासिक शब्दांत अधिक महत्व आहे.

क) अरबी व फारसी भाषेतील शब्द

उदा.    

 1. दर (प्रत्येक)        -      दारसाल, दरडोई, दरमजल.

 2. गैर (प्रत्येक)        -     गैरसमज, गैरहजर, गैरशिस्त

 3. हर (प्रत्येक)        -      हररोज, हरहमेशा

 4. बे (विरुद्ध)          -      बेकायदा, बेमालूम, बेलाशक, बेलाईक

 • वरील उदाहरणात संस्कृत भाषेमध्ये फारसी व अरबी भाषेतील उपसर्ग लागून मराठी भाषेत अव्ययीभाव समासाची उदाहरणे तयार झाली आहेत.

2 ) तत्पुरुष समास :

 • ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करतांना गाळलेल्या शब्द, विभक्तीप्रत्यय लिहावा लागतो, त्यास तत्पुरुषसमास असे म्हणतात.

  थोडक्यात ज्या समासात दूसरा शब्द प्रधान / महत्वाचा असतो त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

 • उदा.    
 1. महामानव      -   महान असलेला मानव

 2. राजपुत्र        -    राजाचा पुत्र

 3. तोंडपाठ       -    तोंडाने पाठ

 4. गायरान       -    गाईसाठी रान

 5. वनभोजन     -    वनातील भोजन

 • वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदापेक्षा दुसरे पद प्रधान आहे आणि या शब्दांना ला, चा, ने हे विभक्ती प्रत्यय वापरावे लागतात म्हणून त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात.

 • तत्पुरुष समासाचे 7 उपप्रकर पडतात.

i) विभक्ती तत्पुरुष

 • ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार्याग शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पद जोडली जातात त्यास विभक्ती तत्पुरुष विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.

 • वरील उदाहरणांत वेगवेगळ्या सामासिक शब्दांचा विग्रह केला असता त्याला वेगवेगळ्या विभक्त्या लागलेल्या दिसतात.

 • विभक्ती तत्पुरुष समासाची काही उदाहरणे:

ii) अलुक तत्पुरुष

 • ज्या विभक्ती तत्पुरुष अमासात पहिला पदाच्या विभक्ती प्रत्ययाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास म्हणतात.
 • अलुक म्हणजे लोप न पावणारा म्हणजे ज्या विभक्ती तत्पुरुष सामासिक शब्दांच्या पहिल्या पदाचा लोप होत नाही त्यास अलुक तत्पुरुष समास असे म्हणतात.

 

 • उदा. 
 1. तोंडी लावणे

 2. पाठी घालणे

 3. अग्रेसर

 4. कर्तरीप्रयोग

 5. कर्मणी प्रयोग

iii) उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष

 • ज्या तत्पुरुष समासात दुसरे पद महत्वाचे असून व ते दुसरे पद हे धातुसाधीत/ कृदंत म्हणून त्या शब्दांत येते तसेच त्याचा वाक्यात स्वतंत्रपणे उपयोग करता येत नाही अशा समासास उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष असे म्हणतात.

 • उदा.    
 1. ग्रंथकार          -    ग्रंथ करणारा

 2. शेतकरी          -    शेती करणारा

 3. लाचखाऊ        -    लाच खाणारा

 4. सुखद            -    सुख देणारा

 5. जलद            -    जल देणारा

 • वरील उदाहरणांमध्ये पहिल्या पदात ग्रंथ, शेत, लाच, सुख, जल हे सर्व धातू आहेत.

 • नंतर दुसर्याद पदात त्यांचे रूपांतर धातुसाधीतांमध्ये झाले आहे म्हणून ते उपपद तत्पुरुष/कृदंत तत्पुरुष समासाची उदाहरणे आहेत.

 • इतर उदाहरणे : लाकूडतोडया, आगलाव्या, गृहस्थ, कामकरी, कुंभकर्ण, मार्गस्थ, वाटसरु.

iv. नत्र तत्पुरुष समास

 • ज्या तत्पुरुष सामासातील प्रथम पद हे नकारार्थी असते त्यास नत्र तत्पुरुष असे म्हणतात.

 • म्हणजेच ज्या समासातील पहिले पद हे अभाव किंवा निषेध दर्शवतात त्यांना नत्र तत्पुरुष समास असे म्हणतात.

 • उदा. (अ, अन्, न, ना, बे, नि, गैर इ.)

उदा.    

1. अयोग्य      -    योग्य नसलेला

 

2. अज्ञान       -    ज्ञान नसलेला

 

3. अहिंसा       -     हिंसा नसलेला

 

4. निरोगी       -    रोग नसलेला

 

5. निर्दोष        -    दोषी नसलेला

 

v) कर्मधारय तत्पुरुष समास

 • ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही  पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात.

 • उदा.    
 1. नील कमल      -    नील असे कमल

 2. रक्तचंदन       -    रक्तासारखे चंदन

 3. पुरुषोत्तम       -    उत्तम असा पुरुष

 4. महादेव          -    महान असा देव

 5. पीतांबर          -    पीत असे अंब ज्याचेपीत (पिवळे,अंबरवस्त्र)

 6. मेघशाम         -    मेघासारखा काळा

 7. चरणकमळ      -    चरण हेच कमळ

 8. खडीसाखर       -    खडयसारखी साखर

 9. तपोबळ          -    तप हेच बळ

 • कर्मधारण्य समासाचे पुढील 7 उपप्रकर पडतात.

    अ) विशेषण पूर्वपद कर्मधारय

 • जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात.

 • उदा.

1. महादेव         -    महान असा देव

 

2. लघुपट          -    लहान असा पट

 

3. रक्तचंदन      -    रक्तासारखे चंदन

 

आ) विशेषण उत्तरपद कर्मधारय

 • जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारेय असे म्हणतात.

 • उदा.

1. पुरुषोत्तम     -    उत्तम असा पुरुष

 

2. मुखकमल     -    मुख हेच कमल

 

3. वेशांतर        -    अन्य असा वेश

 

4. भाषांतर       -    अन्य अशी भाषा

 

इ) विशेषण उभयपद कर्मधारय

 • जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासला विशेषण उभयपद कर्मधाश्य असे म्हणतात.

 • उदा.  

1. लालभडक      -    लाल भडक असा

 

2. श्यामसुंदर     -    श्याम सुंदर असा

 

3. काळाभोर      -    काळा भोर असा

 

4. पांढराशुभ्र     -     पांढरा शुभ्र असा

 

5. हिरवागार     -    हिरवागार असा

 

6. कृष्णधवल    -    कृष्ण धवल असा

 

ई) उपमान पूर्वपद कर्मधाराय

 • जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते.
 • उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात.

 

 • उदा.  

1. वज्रदेह          -      वज्रासारखे

 

2. चंद्रमुख         -      चंद्रासारखे मुख

 

3. राधेश्याम       -      राधेसारखा शाम

 

4. कामलनयन     -      कमळासारखे नयन

 

उ) उपमान उत्तरपद कर्मधारय

 • जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात.

 • उदा.    

1. मुखचंद्र        -    चंद्रासारखे मुख

 

2. नरसिंह         -    सिंहासारखा नर

 

3. चरणकमल     -    कमलासारखे चरण

 

4. हृदयसागर      -    सागरासारखे चरण

 

ऊ) अव्यय पूर्वपद कर्मधारय

 • जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात.

 • उदा.    

1. सुयोग     -    सु (चांगला) असा योग

 

2. सुपुत्र      -    सु (चांगला) असा पुत्र

 

3. सुगंध     -    सु (चांगला) असा गंध

 

5. सुनयन    -    सु (चांगला) असा डोळे

 

5. कुयोग     -    कु (वाईट) असा योग  

 

6. कुपुत्र      -    कु (वाईट) असा पुत्र  

 

ए) रूपक कर्मधारय

 • जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.  

 • उदा.    

1. विधाधन       -    विधा हेच धन

 

2. यशोधन       -    यश हेच धन

 

3. तपोबल        -    ताप हेच बल

 

4. काव्यांमृत     -     काव्य हेच अमृत

 

5. ज्ञांनामृत      -    ज्ञान हेच अमृत     

vi) व्दिगू समास

 • ज्या कर्मधारय समासातील पहिले पद हे संख्याविशेषण असते व त्या सामासिक शब्दांतून एक समूह सुचविला जातो. त्याला व्दिगू समास असे म्हणतात.

 • या समासास संख्यापूर्वपद कर्मधारय कर्मधारय समास असेही म्हणतात.

 • उदा.    

1. नवरात्र       -    नऊ रात्रींचा समूह

 

2. पंचवटी       -    पाच वडांचासमूह

 

3. चातुर्मास     -    चार मासांचा समूह

 

4. त्रिभुवन      -    तीन भुवनांचा समूह

 

5. तैलोक्य      -    तीन लोकांचा समूह

 

6. सप्ताह       -    सात दिवसांचा समूह

 

7. चौघडी        -    चार घडयांचा समुह

 

vii) मध्यमपदलोपी समास

 • ज्या सामासिक शब्दांतील पहिल्या पदांचा दुसर्‍यासाठी पदाशी संबंध दर्शविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्या समासाला मध्यमलोपी समास असे म्हणतात.

 • या समासास लुप्तपद कर्मधरय समास असेही म्हणतात.

 • उदा.    

1. साखरभात     -    साखर घालून केलेला भात

 

2. पुरणपोळी     -    पुरण घालून केलेली पोळी

 

3. कांदेपोहे       -    कांदे घालून केलेले पोहे

 

4. घोडेस्वार      -    घोडयावर असलेला स्वार

 

5. बालमित्र       -    बालपणापासूनचा मित्र

 

6. चुलत सासरा  -    नवर्यानचा चुलता या नात्याने सासरा

 

7. लंगोटी मित्र    -    लंगोटी घालत असल्यापासूनचा मित्र

 

 व्दंव्द समास :

 • ज्या समासातील दोन्ही पद अर्थदृष्टया समान दर्जाचे असतात. त्यास 'व्दंव्द समास' असे म्हणतात.

 • या समासातील पदे आणि, अथवा, व, किंवा या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असतात.

 • उदा.    

1. रामलक्ष्मण     -    राम आणि लक्ष्मण

 

2. विटीदांडू        -    विटी आणि दांडू

 

3. पापपुण्य        -    पाप आणि पुण्य

 

4. बहीणभाऊ      -    बहीण आणि भाऊ

 

5. आईवडील      -    आई आणि वडील

 

6. स्त्रीपुरुष        -    स्त्री आणि पुरुष

 

7. कृष्णार्जुन      -     कृष्ण आणि अर्जुन

 

8. ने-आपण      -     ने आणि आण

 

9. दक्षिणोत्तर    -    दक्षिण आणि उत्तर

 

 • व्दंव्द समासाचे खलील 3 प्रकार पडतात.

i). इतरेतर व्दंव्द समास

 

ii). वैकल्पिक व्दंव्द समास

 

iii). समाहार व्दंव्द समास

 

i) इतरेतर व्दंव्द समास

 • ज्या समासाचा विग्रह करतांना आणि, व, ही, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो. त्यास इतरेतर व्दंव्द समास असे म्हणतात.

 • उदा.    

1. आईबाप        -    आई आणि बाप

 

2. हरिहर          -    हरि आणि हर          

 

3. स्त्रीपुरुष        -    स्त्री आणि पुरुष

 

4. कृष्णार्जुन       -    कृष्ण आणि अर्जुन

 

5. पशुपक्षी         -    पशू आणि पक्षी

 

6. बहीणभाऊ      -    बहीण आणि भाऊ

 

7. डोंगरदर्यान     -    डोंगर आणि दर्याक

 

ii) वैकल्पिक व्दंव्द समास

 • ज्या समासाचा विग्रह करतांना किंवा, अथवा, वा ही विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्यास वैकल्पिक व्दंव्द समास असे म्हणतात.

 • उदा.    

1. खरेखोटे         -    खरे आणि खोटे

 

2. तीनचार         -    तीन किंवा चार

 

3. बरेवाईट         -    बरे किंवा वाईट

 

4. पासनापास      -    पास आणि नापास

 

5. मागेपुढे          -    मागे अथवा पुढे

 

6. चुकभूल          -     चूक अथवा भूल

 

7. न्यायान्याय      -     न्याय अथवा अन्याय

 

8. पापपुण्य          -    पाप किंवा पुण्य

 

9. सत्यासत्य        -    सत्य किंवा असत्य

 

iii) समाहार व्दंव्द समास

 • ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांचा अर्थशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजेच समहार केलेला असतो त्यास समाहार व्दंव्द समास असे म्हणतात.

 • उदा.    

1. मिठभाकर        -     मीठ, भाकर व साधे खाधपदार्थ इत्यादी

 

2. चहापाणी         -     चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ

 

3. भाजीपाला        -    भाजी, पाला, मिरची, कोथंबीर यासारख्या इतर वस्तु

 

4. अंथरूणपांघरून   -    अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणार्‍या वस्तु व इतर कपडे

 

5. शेतीवाडी          -    शेती, वाडी व इतर तत्सम मालमत्ता

 

6. केरकचरा         -    केर, कचरा व इतर टाकाऊ पदार्थ

 

7. पानसुपारी        -    पान, सुपारी व इतर पदार्थ

 

8. नदीनाले          -    नदी, नाले, ओढे व इतर

 

9. जीवजंतू          -    जीव, जंतू व इतर किटक

 

  बहुव्रीही समास :

 • ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थापेक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा व्यक्तींचा त्यामधून बोध होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.

 • उदा.    

1. नीलकंठ         -    ज्याचा कंठ निळा आहे असा (शंकर)

 

2. वक्रतुंड          -    ज्याचे तोंड वक्र आहे असा (गणपती)

 

3. दशमुख         -    ज्याला दहा तोंड आहे असा (रावण)

 

 • बहुव्रीही समासाचे खालील 4 उपपक्रार पडतात.

i) विभक्ती बहुव्रीही समास

 • ज्या समासाचा विग्रह करतांना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते. अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते त्याला विभक्ती बहुव्रीही समास असे म्हणतात.

 • उदा.    

1. प्राप्तधन    -    प्राप्त आहे धन ज्याला तो – व्दितीया विभक्ती

 

2. जितेंद्रिय    -    जित आहे इंद्रिये ज्याची तो – षष्ठी विभक्ती

 

3. जितशत्रू     -     जित आहे शत्रू ज्याने तो – तृतीया विभक्ती

 

4. गतप्राण     -    गत आहे प्राण ज्यापासून तो – पंचमी विभक्ती

 

5. पूर्णजल     -    पूर्ण आहेत जल ज्यात असे – सप्तमी विभक्ती

 

6. त्रिकोण     -    तीन आहेत कोन ज्याला तो – चतुर्थी विभक्ती

 

ii) नत्र बहुव्रीही समास

 • ज्या समासाचे पहिले पद नकारदर्शक असते त्याला नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात. या समासातील पहिल्या पदात अ, न, अन, नि अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो.

 • उदा.    

1. अनंत       -    नाही अंत ज्याला तो

 

2. निर्धन       -    नाही धन ज्याकडे तो

 

3. नीरस       -    नाही रस ज्यात तो

 

4. अनिकेत    -    नाही निकेत ज्याला तो

 

5. अव्यय      -    नाही व्यय ज्याला तो

 

6. निरोगी      -    नाही रोग ज्याला तो

 

7. अनाथ       -    ज्याला नाथ नाही असा तो

 

8. अनियमित   -    नियमित नाही असे ते

 

9. अकर्मक     -     नाही कर्म ज्याला ते

 

10. अखंड      -    नाही खंड ज्या ते

 

iii) सहबहुव्रीही समास

 • ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद सह किंवा स अशी अव्यये असून हा सामासिक शब्द एखाधा विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास म्हणतात.

 • उदा.    

1. सहपरिवार     -     परिवारासहित असा जो

 

2. सबल          -    बलासहित आहे असा जो

 

3. सवर्ण         -     वर्णासहित असा तो

 

4. सफल         -    फलाने सहित असे तो

 

5. सानंद         -    आनंदाने सहित असा जो

 

iv) प्रादिबहुव्रीही समास

 • ज्या बहुव्रीही समासाचे पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वि अशा उपसर्गानी युक्त असेल तर त्याला प्रादिबहुव्रीही समास असे म्हणतात.

 • उदा.    

1. सुमंगल        -    पवित्र आहे असे ते

 

2. सुनयना        -    सु-नयन असलेली स्त्री

 

3. दुर्गुण          -    वाईट गुण असलेली व्यक्ती

 

4. प्रबळ          -     अधिक बलवान असा तो

 

5. विख्यात       -     विशेष ख्याती असलेला

 

6. प्रज्ञावंत       -      बुद्धी असलेला.

Must Read (नक्की वाचा):
काळ व त्याचे प्रकार

All Latest Jobs

OAVS Recruitment 2018 For 1544 Posts (Last Date : 10 April 2018)

MPSC Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2018 For 45 Posts (Last Date : 9 April 2018)

Mumbai NHM Bharti 2018 For 2 Posts (Last Date : 2 April 2018)

NFR Recruitment 2018 For 9 Posts (Interview Date : 29 March 2018)

Raigad DBATU Bharti 2018 For 6 Posts (Interview Date : 4 April 2018)

MahaVitaran Bharti 2018 For 47 Posts (Interview Date : 22 March 2018)

Pune IISER Bharti 2018 For 27 Posts (Last Date : 6 April 2018)

Mahatransco Bharti 2018 For 23 Posts (Last Date : 27 April 2018)

Parbhani Mahanagarpalika Bharti 2018 For 7 Posts (Last Date : 31 March 2018)

Nanded SRTMUN Bharti 2018 For 2 Posts (Interview Date : 28 March 2018)

UPPSC Recruitment 2018 For 10738 Posts (Last Date : 16 April 2018)

CEIL Recruitment 2018 For 244 Posts (Last Date : 2 April 2018)

ESIC Recruitment 2018 For 206 Posts (Last Date : 2 April 2018)

Pandharpur Police Patil Bharti 2018 (Last Date : 26 March 2018)

Nashik Education Society Bharti 2018 For 40 Posts (Last Date : 26 March 2018)

NMU Bharti 2018 For 73 Posts (Last Date : 28-3-2018 (Assistant) and 2-4-2018 (Other Posts))

BARC Recruitment 2018 For 11 Posts (Last Date : 17 April 2018)

Talegaon Dabhade Nagarparishad Bharti 2018 For 8 Posts (Last Date : 30 March 2018)

AAI Recruitment 2018 For 542 Posts (Last Date : 27 April 2018)

PuneNHM Bharti 2018 For 11 Posts (Last Date : 17 and 20 March 2018)

Bombay IIT Bharti 2018 For 21 Posts (Last Date : 21 March and 4 April 2018)

Mumbai Mantralaya Bharti 2018 For 13+40 Posts (Last Date : 18 and 29 March 2018)

Buldhana NUHMBharti 2018 For 40 Posts (Last Date : 26 March 2018)

Solapur Police Patil Bharti 2018 (Last Date : 23 March 2018)

MPSC Forest Service Bharti 2018 For 26 Posts (Last Date : 4 April 2018)

BIS Recruitment 2018 For 109 Posts (Last Date : 2 April 2018)

Washim NHM Bharti 2018 For 19 Posts (Last Date : 21 March 2018)

Hingoli NHM Bharti 2018 For 19 Posts (Last Date : 21 March 2018)

Mumbai NABARD Bharti 2018 For 92 Posts (Last Date : 2 April 2018)

Solapur Mahanagarpalika Bharti 2018 For 2 Posts (Last Date : 23 March 2018)

ISRO Recruitment 2018 For 85 Posts (Last Date : 2 April 2018)

Pune Mahanagarpalika Bharti 2018 For 1 Post (Interview Date : 26 March 2018)

NHM Recruitment 2018 For 1033 Posts (Last Date : 31 March 2018)

NCL Recruitment 2018 For 664 Posts (Last Date : 28 March 2018)

DMRC Recruitment 2018 For 4 Posts (Last Date : 26 March 2018)

Indian Air Force Recruitment 2018 For 54 Posts (Last Date : 10 April 2018)

IMU Recruitment 2018 For 21 Posts (Last Date : 28 April 2018)

CIMFR Bharti 2018 For 4 Posts (Interview Date : 21 March 2018)

BECIL Bharti 2018 For 131 Posts (Last Date : 9 April 2018)

MECL Bharti 2018 For 10 Posts (Start Date 9 April and Close Date. 8 May 2018)

MPSC Krushi Seva Recruitment 2018 For 70 Posts (Last Date : 27 March 2018)

JCMC Bharti 2018 For 29 Posts (Interview Date : 21 March 2018)

Pune Cantonment Board Bharti 2018 For 77 Posts (Last Date : 7 April 2018)

Staff Selection Commission Bharti 2018 For 1223 Posts (Last Date : 2 April 2018)

Maharashtra Public Service Commission Bharti 2018 For 48 Posts (Last Date : 26 March 2018)

RSMSSB Bharti 2018 For 1702 Posts (Last Date : 27 March 2018)

Airline Allied Services Limited Bharti 2018 For 35 Posts (Last Date : 23 March 2018)

Sashastra Seema Bal Bharti 2018 For 54 Posts (Last Date : 25 March 2018)

Intelligence Bureau Bharti 2018 For 134 Posts (Last Date : 27 April 2018)

Lucknow Metro Rail Corporation Limited Bharti 2018 For 386 Posts (Last Date : 27 March 2018)

ICMAM Bharti 2018 For 63 Posts (Last Date : 21 March 2018)

Savitribai Phule Pune University Bharti 2018 For 3 Posts (Last Date : 21 March 2018)

Indian Oil Corporation Limited Bharti 2018 For 201 Posts (Last Date : 24 March 2018)

माहिती मिळवा ईमेल वर

Study Material आणि नवीन नौकर्‍यांची माहिती मिळविण्यासाठी खालील माहिती भरा.

Like Our Facebook Page

Latest Users

 • ismezpivx
 • PosterCax
 • Olegnable
 • gqqcarri4728023
 • zakgoheen44471