सामान्य विज्ञान (इयत्ता 9 वी) संपूर्ण माहिती

सामान्य विज्ञान (इयत्ता 9 वी) संपूर्ण माहिती

 (भाग 1) :

  • सर्व वस्तु द्रव्यांच्या बनलेल्या असतात. ज्याला वस्तुमान असते व जे जागा व्यापले त्याला ‘द्रव्य’ म्हणतात.
  • द्रव्याच्या भौतिक स्थितीवर आधारित स्थायू, द्रव व वायु हे प्रकार आहेत तर रसायनिक घटनेवर आधारित मूलद्रव्य, संयुग व मिश्रण हे प्रकार आहेत.
  • अयनायू (plasma) ही द्रव्याची चौथी अवस्था अतिउच्च तापमानाला असते.
  • अनेक स्थायूंचा आकार बाह्य बल लावल्यावर सुद्धा कायम असतो. ठराविक आकार व आकारमान असणार्याआ स्थायूंच्या या गुणधर्माला दृढता (rigidity) असे म्हणतात.
  • ऑक्सीजन, नायट्रोजन, हायड्रोजन हे वायु धातूंच्या टाक्यामध्ये ठासून भरता येयात.
  • स्थायूंमध्ये आंतररेंविय बल अतिशय प्रभावी असते.
  • द्रवांमधील आंतररेंविय बल मध्यम असते तर वायूंमध्ये आंतर रेंविय बल क्षीण असते.
  • अलीकडील काळात विज्ञानमध्ये रासायनिक पदार्थ या ऐवजी ‘पदार्थ’ हा शब्द प्रयोग करतात.
  • आधुनिक रसायनशास्त्राचा जनक लॅव्हाझिए याने मूलद्रव्याची व्याख्या मांडली.
  • दोन किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक संयोगाने बनवलेल्या पदार्थ म्हणजे संयुग.
  • लॅव्हाझिएने ऑक्सीजनचा शोध व नामकरण केले.
  • लोह व गंधक तापल्यावर एक नवा पदार्थ तयार होतो. त्याचे नाव आयर्न स्ल्फाईड असे आहे.
  • दूध हे पाणी, दुग्धशर्करा, स्निग्ध पदार्थ, प्रथिने व इतर काही नैसर्गिक पदार्थाचे मिश्रण आहे.
  • मूलद्रव्याचे वर्गीकरण धातू, अधातू व धातुसदृश असे केले जाते.
  • सुमारे ऐंशी मूलद्रव्ये धातू आहेत.
  • सिलिकॉन, सेलेनियम, अर्सेनिक ही धातूसदृशांची काही उदाहरणे आहेत.
  • एक द्रव व एक अथवा अधिक स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला ‘निलंबन’ असे म्हणतात.
  • विषमांगी मिश्रणांना कलीले म्हणतात.
  • पचन विकारांवर वापरले जाणारे मिल्क ऑफ मॅग्नेशिया हेही एक कलिल आहे.
  • द्रावणाच्या एक एकक एवढ्या आकारमानात विरघळलेल्या द्रव्याच्या वस्तुमानाला द्रावणाची संहती असे म्हणतात.
  • इ.स. 1808 मध्ये इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन याने त्याचा प्रसिद्ध अणूसिद्धांत मांडला.
  • द्रव्य हे अणूंचे बनलेले असते. अणू म्हणजे द्रव्याचे अविभाजनीय असे लहानात लहान कण होत.
  • अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात.
  • इ.स. 1997 मध्ये जे.जे. थॉमस या इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाने हायड्रोजन या अणूहून 1800 पट हलक्या कणांचा शोध लावला.
  • सन 1932 मध्ये डॅनिश भौतिक शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अनुप्रारूप मांडले.
  • सन 1932 मध्ये चॅडविक या वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून दिले.
  • सन 1926 मध्ये मांडल्या गेलेल्या पुजायांत्रिकी या नव्या सिद्धांतामदध्ये अणूच्या संचरनेचे वर्णन दुसर्‍या पद्धतीने करण्यात आले.
  • अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात. त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्युट्रॉन हे त्याचे दोन प्रकार आहेत.
  • केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा बनलेला असतो.
  • केंद्राबाहेरील सर्व इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनपरभारा एवढाच असल्यामुळे अणू हा विधूतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो.
  • पूर्वी अणूत्रिज्येसाठी अॅगस्ट्रोम (A० = 10 -8 cm) हे एकक वापरात होते. आता अॅगस्ट्रोमच्या जागी पिकोमीटर (pm) हे एकक वापरात आहे.
    (1 pm = 10 -12 m)
  • अणूवस्तूमानांक दर्शविण्यासाठी खास असे अणूवस्तुमान एकक डाल्टन वापरले जाते. (u)
  • इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित मूलकण असून त्याचा निर्देश e असा करतात.
  • इलेक्ट्रॉन चे वस्तुमान 0.00054859 u आहे.
  • प्रोटॉन हा धनप्राभरित मूलकण असून त्याचा निर्देश P ह्या संज्ञेने करतात.
  • न्युट्रॉन हे विधूतप्रभारदृष्टया तटस्थ असलेले मूलकण आहेत.
  • भ्रमणकक्षा (कवच) मध्ये सामावणार्याल इलेक्ट्रॉनची अधिकतम संख्या
  • KLMN या या कावचांमध्ये 2, 8, 18, 32 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकत नाहीत. मात्र कोणत्याही अणूच्या शेवटच्या म्हणजेच सर्वात बाहेरील कवचामध्ये जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन सामावू शकतात.
  • K कवचातील इलेक्ट्रॉनची उर्जा कमी असते.
  • हेलियम, निऑन यांसारखी काही थोडी मूलद्रव्ये कोणत्याही अणुबरोबर संयोग न पावता मुक्त अशा अनुस्थिती मध्येच अस्तित्वात असतात.
  • अणूंच्या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा असे म्हणतात.
  • संयुजा हा अणूचा मूलभूत रसायनिक गुणधर्म आहे.
  • अणूच्या बाहयतम कवचाला त्याचे संयुजा कवच असे म्हणतात.
  • ज्यांचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूची संयुजा शून्य असते.
  • बारा न्यूक्लिऑन असलेल्या कार्बन अणूचे जे वस्तुमान त्याच्या 1/12 एवढे वस्तुमान म्हणजे एक अणुवस्तुमान एकक (a.m.u.) होय.
  • अणुवस्तुमानांक A या संज्ञेने दर्शविला जातो.
  • एखाद्या अणुमधील एकूण प्रोटॉनच्या संखेला अणुअंक म्हणतात व तो Z या संज्ञेने दर्शविला जातो.
  • सारखाच अणुअंक परंतु वेगळा वस्तूमानांक असणार्या  अणूंना असस्थानिक असे म्हणतात.
  • हायड्रोजन च्या इतर दोन समस्थानिकांना स्वतंत्र नावे असून ती ड्युटेरियम व ट्रिटियम अशी आहेत.
  • क्लोरीनचे सरासरी अणुवस्तुमान 35.5 एवढे आहे.
  • रेणूवस्तुमानालाच पूर्वी रेणुभार म्हणत. एकक u
  • अणु व रेणूंची सापेक्ष संख्या समजण्यासाठी वैज्ञानिकांनी ग्रॅम मोल ही संकल्पना विकसित केली.
  • पदार्थाच्या एक ग्रॅम – मोल एवढ्या राशीत असणार्यार रेणूंच्या संख्येसाठी N ही संज्ञा वापरतात. या वैशिष्ट्यपूर्ण संख्येला ‘अॅव्होगड्रोअंक’ असे म्हणतात.
  • आजपर्यंत माहीत असलेली एकूण मूलद्रव्ये जवळपास 116 आहेत.
  • मूलद्रव्याच्या व्यवस्थितरीत्या केलेल्या मांडणीलाच ‘वर्गीकरण‘ म्हणतात.
  • मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुभारांकांचे आवर्तीफल असतात.
  • गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्थानांतरणीय गती, घर्णून गती, दोलन गती.
  • स्थानांतरणीय गती एकरेषीय असू शकते किवा तिचा मार्ग वक्राकारही असू शकतो.
  • अंतर ही अदिश राशि आहे तर विस्थापन ही सदिश राशि आहे.
  • ज्या भौतिक राशींचे मापन दुसर्याप राशींवर अवलंबून नसते त्यांना मूलभूत राशि असे म्हणतात. उदा. लांबी, वस्तुमान, वेळ, इ.
  • एखाद्या वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास त्या वस्तूची ‘चाल’ किंवा ‘सरासरी चाल’ असे म्हणतात.
  • एखाधा वस्तूने एकक काळात एखाधा विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास त्या वस्तूचा वेग अथवा सरासरी वेग म्हणतात.
  • वेगामधील बदलाचा दर म्हणजे त्वरण होय.
  • जर वस्तूच्या वेगात वाढ होत असेल तर त्या वस्तूचे त्वरण धन (+ve) असते. जर वस्तूचा वेग कमी होत असेल तर त्वरण (-ve) ऋण असते.
  • जी भौतिकराशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्ण व्यक्त करता येते तिला ‘अदिश राशी’ किवा ‘अदिश’ असे म्हणतात.
  • अदिश राशींची बेरीज-वजाबाकी अंकगणिताचे नियम वापरुन करता येते.
  • अदिश राशी-व्स्तुमान, चाल, कार्य, आकारमान, घनता, वेळ, अंतर, ऊर्जा.
  • जी भौतिक राशी पुर्णपणे व्यक्त करण्यासाठी तिचे परिणाम व दिशा या दोन्हींची आवश्यकता असते तिला ‘सदिश राशी’ किंवा ‘सदिश’ असे म्हणतात.
  • सदिश राशी – विस्थापन, वेग, त्वरण, बल, गती, वजन
  • सदिश राशी दर्शविण्यासाठी डोक्यावर बाण काढलेल्या चिन्हाचा वापर केला जातो.
  • गतीविषयक तीन समीकरणे     
  1. v = u + at          
               
  2. s = ut + ½ at2       
                    
  3. v2 = u2 + 2as
  • एखाधा वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडवून आणणारी किंवा बदल घडवून आणण्याची प्रवृत्ती असलेली भौतिक राशी म्हणजे ‘बल’होय.
  • प्रत्येक वस्तू तिच्या गतिमान अवस्थेतील बदलाला म्हणजेच त्वरणाला विरोध करते. विरोध करणार्यााच्या या वृत्तीला ‘जडत्व’ असे म्हणतात.
  • वस्तूमान आणिवेग यांच्या गुणाकाराला संवेग म्हणतात.
  • संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानूपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशीने होते.
  • एकक वस्तुमानात एकक त्वरण निर्माण करणार्याी बलास एकक बल असे म्हणतात.
  • MKS पद्धतीने 1kg वस्तूमान 1 m/s2 त्वरण निर्माण करणार्याह बलास एक न्यूटन बल असे म्हणतात.
  • एखाधा वस्तुमानावरील कार्यरत बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानास व तिच्यावरील परिणामी त्वरण सामानुपाती असते.
  • प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. उदा. रॉकेट किंवा अग्निबाण.
  • दोन वस्तूंची टक्कर झाली तर या वस्तूंचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो.
  • निसर्गात आढळणार्यां आणि परस्परांपासून भिन्न असणार्याए सर्व बलांचे चार मुख्य प्रकार आहेत.

1) गुरुत्वबल,

 

2) विधूत चुंबकीय बल,

 

3) केंद्राकीय बल,

 

4) क्षीण बल,

 

  • सर्वांसाठी न्यूटन (N) हे एकक वापरले जाते.
  • न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.
  • प्रयुक्त आकर्षणबलास ‘गुरुत्वबल’ म्हणतात.
  • पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते.
  • विश्वातील कोणत्याही दोन वस्तू कोठेही असल्या तरी त्यांच्यात परस्परांना आकर्षणारे गुरुत्वबल प्रयुक्त असते.

    हे बल त्या वस्तूंच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानूपाती व वस्तूंमधील अंतराच्या वर्गाच्या वस्तानुपाती असते.

  • G चे मूल्य सर्व वस्तूंसाठी सारखेच आहे. म्हणून G ला ‘विश्वगुरुत्व स्थिरांक’ म्हणतात.
  • G चे मूल्य 6.67×10-11 Nm2/kg2 आहे.
  • पृथ्वीचे वस्तुमान M=6×1024kg आहे. सरासरी त्रिज्या R=6400 km आहे.
  • एखाधा वस्तूला पृथ्वी ज्या बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने ओढते त्याला वस्तूचे वजन म्हणतात.
  • वस्तूचे वजन हे तिच्यावर कार्यरत पृथ्वीचे गुरुत्वबल होय.
  • एखाधा वस्तूचे वस्तूमान म्हणजे त्या वस्तूत सामावलेल्या एकंदर द्रव्याची राशी होय.
  • कोणत्याही वस्तूंवर कार्यरत गुरुत्वत्वरण किंवा गुरुत्वबल विषुववृत्तापेक्षा ध्रुवावर जास्त असते.
  • गुरुत्व त्वरणचे मूल्य ध्रुवावर 9.83m/s2 तर विषुववृत्तावर 9.78 m/s2 आहे.
  • सामान्य पदार्थातील अणूंना व रेणूंना एकत्रित ठेवण्यार्‍या/ बलास विधूतचुंबकीय बल असे म्हणतात.
  • विधुत चुंबकीय बल गुरुत्व बलापेक्षा अनेक पटींनी मोठे आहे.
  • विधुत चुंबकीय बलाचे परिणाम साधारणपणे गुरुत्वाबलाच्या 1039 पट आहे.
  • केंद्रकीय बल केंद्रकातील कणांना एकत्र ठेवते.
  • इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन यांच्या होणार्याध अन्योन्य क्रियांमध्ये प्रयुक्त होणारे बल क्षीण बल म्हणून ओळखले जाते.
  • एखाधा वस्तूवर क्रिया करणार्याॉ बलामुळे त्या वस्तूचे बलाच्या दिशेने विस्थापन झाले तरच कार्य झाले असे म्हणतात.
  • SI पद्धतीत बलाचे एकक न्यूटन तर विस्थापनाचे एकक मीटर व कार्याचे एकक ज्यूल (Joule) आहे.
  • CGS पद्धतीत बलाचे एकक डाईन व विस्थापनाचे एकक सेंटीमीटर तर कार्याचे एकक अर्ग आहे.
  • 1 Joule = 107 अर्ग.
  • एखाधा पदार्थात असलेली कार्यकरण्याची क्षमता म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा.
  • ऊर्जेची विविध रुपे – यांत्रिक, उष्णता, प्रकाश, ध्वनी, विधुत चुंबकीय, रासायनिक, औष्णिक, सौर, इ.
  • पदार्थाच्या गतीमान अवस्थेमुळे प्राप्त झालेल्या उर्जेस गतिज ऊर्जा म्हणतात.
  • KE = ½ mv2
  • पदार्थाच्या विशिष्ठ स्थितीमुळे किंवा आकारामुळे त्यात जी ऊर्जा समावलेली असते, तिला स्थितीज ऊर्जा म्हणतात. उदा. डोंगरावरील दगड, धरणातील साठविलेले पाणी.
  • दोर्याेची लांबी जास्त असेल तर दोलनकाल जास्त असतो आणि वारंवारता कमी असते.
  • ज्या सरल दोलकाचा दोलनकाल 2 सेकंद असतो त्याला सेकंद दोलक असे म्हणतात.
  • दोलनकाल T = 2π √e/g या समीकरणाने काढता येतो.
  • सूर्याच्या केंद्रकाचे तापमान 107 k(Kelvin) आहे असे अनुमान आहे.
  • एखाधा पदार्थात उष्णतेची असलेली पातळी म्हणजेच तापमान.
  • वैधकीय तापमापीवर सेल्सियस अशांमध्ये 35 ते 42 पर्यंत खुणा असतात.
  • केवल मापनश्रेणीची सुरुवात सर्वात कमी तापबिंदुपासून होते. या तापमानाला रेणूंची गती थांबते, म्हणून या बिंदुला केवल शून्य असे म्हणतात. त्याचे मुल्य – 2730 K एवढे असते.
  • केवल मापनश्रेणी म्हणजेच केलव्हीन मापन श्रेणी होय. या मापन श्रेणीवर पाण्याचा गोठणबिंदु हा 273 k व उत्कलनांक असे म्हणतात.
  • ज्या स्थिर तापमानाला द्र्वपदार्थाचे वायुरूपस्थितीत रूपांतर होते, त्या तापमानाला त्या पदार्थाचा उत्कलनांक असे म्हणतात.
  • द्र्वावरील दाब कमी केला की उत्कलनांक कमी होतो व दाब वाढविला की उत्कलनांक वाढतो.
  • विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण जास्त असेल तर त्या पदार्थाच्या द्रवनांक कमी होतो.
  • अमोनियम नायट्रेट व सोडीयम सल्फेट यांचे मिश्रण 5:6 या प्रमाणात घेतल्यास मिश्रणाचे तापमान – 100C पर्यंत खाली येते.
  • बर्फ व मीठ यांच्या योग्य प्रमाणातील मिश्रणाचे तापमान – 230 से. पर्यंत खाली येते.
  • द्र्वामध्ये विद्राव्य क्षार विरघळला असेल तर त्याचा उत्कलनांक वाढतो.
  • बाष्पीभवनाचा दर हा द्र्वाच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाशी समप्रमाणात असतो.
  • अभिसरणामुळे खारे वारे व मतलई वारे निर्माण होतात.
  • विधुत चुंबकीय तरंगाच्या स्वरुपात व द्रव्य माध्यमाच्या शिवाय होणार्‍या उष्णतेच्या स्थानांतरणास प्रारण असे म्हणतात.
  • गोलीय आरसा ज्या गोलापासून बनविला आहे, त्या गोलाच्या केंद्रबिंदूला (C) आरशाचे वक्रता केंद्र म्हणतात.
  • बहिर्वक्र आरशाला अपसारी आरसा असेही म्हणतात.
  • ज्या प्रतिमेतून प्रकाशाचे वास्तव अभिक्रमन होते व तेथून पुढे प्रकाश अपसृत होतो ती वास्तव प्रतिमा तर ज्या प्रतिमेतून प्रकाश अपसृत होण्याचा भास होतो ती आभासी प्रतिमा.
  • अंतवर्क्र आरशाने तयार होणार्यात प्रतिमाबद्दल माहिती देणारा तक्ता :
  • बहिर्वक्र आरशाने तयार होणार्यार प्रतिमांबद्दल माहिती देणारा तक्ता :
  • वाहनाच्या चालकासाठी बहिर्वक्र आरसा असतो.
  • बहिर्वक्र आरशाने वस्तूपेक्षा लहान व सुलट प्रतिमा तयार होतात.
  • दाढी करताना वापरावयाचा आरसा हा अंतर्वक्र आरसा असतो.
  • या आरशामध्ये सुलट आणि मोठी प्रतिमा दिसते आणि दाढी करणे सोयीचे होते.
  • प्रकाशाच्या आपतन दिशेतील सर्व अंतरे धन तर विरुद्ध दिशेतील अंतरे ऋण मोजली जातात.
  • वस्तू नेहमी आरशाच्या डाव्या बाजूला ठेवलेल्या असतात. म्हणजे प्रकाशाची अपतनाची दिशा डावीकडून उजवीकडे असेल.
  • आरशापासून वस्तूचे अंतर u आणि प्रतिमेचे अंतर v यांचे आरशाचे नाभीय अंतर व वक्रता त्रिजेशी संबंध दर्शविणारे सूत्र म्हणजेच आरशाचे सूत्र होय.
  • सूत्र : 1/u + 1/v = 1/f =2/R
  • बहिर्वक्र आरशाने नेहमीच सुलट आणि आभासी प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा लहान असते.
  • अंतर्वक्र आरशासमोर त्याच्या नाभीय अंतरापेक्षा कमी अंतरावर वस्तू ठेवल्यास तिची आभासी, सुलट आणि वस्तूपेक्षा मोठ्या आकाराची प्रतिमा दिसते.
  • जर वस्तूचे आरशापासूनचे अंतर नाभीय अंतरापेक्षा जास्त असेल तर मात्र आंतरर्वक्र आरशाने वास्तव व उलटी प्रतिमा तयार होते.
  • रशियाचा ‘युरी गागरीन’ हा अवकाशात जाणारा पहिला मानव होता, तर अमेरिकेचा ‘नील आर्मस्ट्रॉग’ याने चंद्रावर सर्वप्रथम पाय ठेवला.
  • स्वादुपिंड इन्सुलिनची निर्मिती करते.
  • अब्जांशी तंत्रज्ञान म्हणजे एक किंवा अधिक अणू किंवा रेणू यांची रचना, मांडणी वापरुन अत्यंत सूक्ष्म असे नवीन पदार्थ, आकार किंवा उपकरणे तयार करणे.
  • एक नॅनोमीटर म्हणजे एक मीटरचा अब्जावा भाग होय.             
  • 1 nm = 1 m अब्जावा.

 (भाग 2) :

  • हेलिअम (He), नियॅान (Ne), आरगॅान (Ar) यांच्या सारखे निष्क्रिय वायू किंवा राजवायू मुक्त अवस्थेत आढळून येतात.
  • हायड्रोजन(H), ऑक्सिजन(O), क्लोरीन(CI), सोडियम (Na), मॅग्नेशिअम (Mg) इ. मूलद्रव्ये रेणू किंवा संयुगाच्या रुपात आढळतात.
  • राजवायूंच्या बाहयतम कक्षेत आठ इलेक्ट्रॉन असून त्यांच्या बाहयतम कक्षा पुर्णपणे भरलेल्या आहेत. त्या कक्षांना अष्टक म्हणतात.
  • राजवायूंव्यतिरिक्त इतर सर्व मूलद्रव्यांच्या बाहयतम कक्षा अपूर्ण असतात.
  • रासायनिक बदलात धातूंची इलेक्ट्रॉन देण्याची तर आधातूंची इलेक्ट्रॉन घेण्याची अथवा भागीदारी करण्याची प्रवृत्ती असते.
  • ऋणभारीत इलेक्ट्रॉन दिल्यामुळे धनप्रभारीत आयन तयार होतो. त्याला कॅटायन असे म्हणतात.
  • इलेक्ट्रॉन दिल्यानंतर सोडीयमच्या इलेक्ट्रॉनी संरूपणात बदल होऊन तो निऑन (Ne) या निकटतम निष्क्रिय वायूंचे स्थायी इलेक्ट्रॉनी संरूपन प्राप्त करतो.
  • ऋणप्रभारित आयनास अॅनायन (Anion) असे म्हणतात.
  • रेणूंमध्ये अणूंना एकत्र धरून ठेवण्यास जी आकर्षण शक्ती जबाबदार असते त्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध म्हणतात.
  • एका अणूपासून दुसर्‍या अणुकडे इलेक्ट्रॉनच्या स्थानांतरणामुळे तयार होणार्‍या) रासायनिक बंधाला आयनिक बंध किंवा विधुत संयुज बंध म्हणतात.
  • Na व C1 स्वतंत्रपणे धोकादायक असले तरी त्यांचे संयुग मीठ (NaC1) सुरक्षित आहे.
  • सारख्याच किंवा एका मूलद्रव्यापासून तयार होणारी संयुगे दोन आणूमधील देवघेवीमुळे तयार होत नाहीत, तर संयोग पावणार्याद अणूमध्ये होणार्‍या N इलेक्ट्रॉनच्या भागीदारीमुळे तयार होतात. या बांधाला ‘सहसंयुज बंध’ असे म्हणतात.
  • जेव्हा रेणुमधील दोन अणूमध्ये एकाच इलेक्ट्रॉन जोडीची भागीदारी होऊन बंध तयार होतो. त्या बांधाला एकेरी बंध असे म्हणतात.
  • मिथेन रेणुमध्ये C-H असे चार एकेरी बंध असतात.
  • जेव्हा रेणूंच्या दोन अणूमध्ये दोन इलेक्ट्रॉनच्या जोडयाची भागीदारी होते, तेव्हा ते दोन अणू दुहेरी बंधने बांधले जातात. उदा. इथिलीन (C2H4)
  • जेव्हा दोन अणूमध्ये तीन इलेक्ट्रॉनच्या जोड्यांची भागीदारी होऊन तीन बंध तयार होतात त्याला ‘तिहेरी बंध’ म्हणतात. उदा. अॅसीटिलीन (C2H2) H-C     
  • सामाईक इलेक्ट्रॉनना स्वत:कडे आकर्षित करण्याच्या अणूच्या क्षमतेला या मूलद्रव्याची विधुतऋणता म्हणतात.
  • आयनिक संयुगे पाण्यात विरघळल्याने आयन विलग होण्याच्या प्रक्रियेला विचरण असे म्हणतात.
  • शुद्ध पाणी विजेचे दुर्वाहक असते.
  • रेणूपासून आयन विलग होण्याच्या प्रक्रियेला आयनीभवण असे म्हणतात.
  • अणुने किंवा अणूंच्या गटाने एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन दिले असता किंवा घेतले असता तयार होणार्याय आयनांना ‘मुलक’ असे म्हणतात.
  • धन आयन किंवा मुलके यांनाच कॅटायन (cation) किंवा आम्लारिधर्मी मुलके असे देखील म्हणतात. उदा. Na+, k+, Mg2+, A13+, NH4+
  • ऋण आयन किंवा मुलके यांनाच अॅनायन किंवा आम्लधर्मी मुलके असे देखील म्हणतात. उदा. C1-, S2-, SO42-, CO32-
  • साधे मुलक एका अणूपासून बनलेले असते व ते धनप्रभारीत किंवा ऋण प्रभारित असते. उदा. K+, Ca2+, A13+, C1-, O2-, N3- इ.  
  • संयुक्त मुलकांमध्ये अणूंचा गट असतो व तो गट दोन किंवा अधिक प्रकारच्या अणूपासून तयार झालेला असतो ते धन प्रभारित व ऋण प्रभारित व ऋण प्रभारित असतात उदा. CO23-, NH4+
  • पदार्थामध्ये होणार्‍यात ज्या बदलात त्याचे फक्त भौतिक गुणधर्म बदलतात कोणताही नवा पदार्थ तयार होत नाही आणि मूळ पदार्थ सहजासहजी परत मिळतो अशा बदलास भौतिक बदल म्हणतात.     
  • उदाहरणे- मीठ पाण्यात विरघळते, पाण्याचे बर्फात रूपांतर होणे, पाण्याचे वाफेत रूपांतर होणे, इ.
  • ज्या बदलामध्ये भाग घेणार्या् पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते व नवीन तयार झालेल्या पदार्थाचे गुणधर्म हे मूल पदार्थांपेक्षा पुर्णपणे वेगळे असतात, अशा बदलाला रासायनिक बदल म्हणतात.
  • उदाहरणे – स्वयंपाकाचा गॅस जळणे, केरोसिन जळणे, दुधापासून दही होणे, अन्नपदार्थ आंबणे, अन्नपदार्थाचे पचन होणे.
  • ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता मुक्त होते त्यांना उष्मादायी अभिक्रिया असे म्हणतात.
  • ज्या रासायनिक अभिक्रियेत उष्णता शोषली जाते तिला उष्माग्राही अभिक्रिया असे म्हणतात.
  • रासायनिक अभिक्रिया म्हणजे अभिक्रियांचे तपशीलवार विवेचन होय.
  • समीकरणाच्या डाव्या बाजूस अभिक्रियाकारके व उजव्या बाजूस उत्पादिते लिहावीत.
  • संतुलित समीकरणामध्ये अभिक्रिया कारके व उत्पादिते यांच्यातील प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या दोन्ही बाजूला सारखी असते.
  • ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये दोन किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून फक्त एकच उत्पादित मिळते अशा अभिक्रियांना ‘संयोग अभिक्रिया’ म्हणतात.
  • ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच संयुगापासून दोन किंवा अधिक साधे पदार्थ मिळतात त्या अभिक्रियेला ‘अपघटण अभिक्रिया’ म्हणतात.
  • एखाधा पदार्थातील अणू किंवा अनुगट, दुसर्‍या पदार्थातील अणू किंवा अनुगट यांची जागा घेऊन नवीन पदार्थ तयार करत असतील, तर अशा अभिक्रियांना ‘विस्थापन अभिक्रिया’ असे म्हणतात.
  • ज्या रासायनिक अभिक्रियेत दोन संयुगांच्या घटकाची आपापसात अदलाबदल होऊन दोन नवीन संयुगे तयार होतात अशा अभिक्रियांना ‘दुहेरी अपघटण’ अभिक्रिया म्हणतात.
  • ज्या रासायनिक अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी जास्त कालावधी लागतो अशा अभिक्रियांना ‘मंद अभिक्रिया’ म्हणतात. उदा. भाजीपाला कुजणे, लोखंड गंजणे, दही होणे.
  • ज्या रासायनिक अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी खूपच कमी कालावधी लागतो. त्यांना शीघ्र अभिक्रिया म्हणतात. उदा. ब्लिचिंग पावडरची प्रक्रिया.
  • रासायनिक अभिक्रियेत, अभिक्रियाकारकांच्या उत्पादित संहतीमध्ये एकक कालावधीत घडून येणारा बदल म्हणजेच ‘रासायनिक अभिक्रियेचा वेग’ होय.
  • अभिक्रिया कारकांचे  स्वरूप किंवा क्रियाशीलता रासायनिक अभिक्रियांच्या वेगावर परिणाम करते.
  • रासायनिक अभिक्रियेत भाग घेणार्यां अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा वेग जास्त असतो.
  • अभिक्रियेचे तापमान वाढविल्यास अभिक्रियेचा वेगदेखील वाढतो.
  • ज्या पदार्थाच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो/बदलतो परंतु त्या पदार्थांमध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थांना उत्प्रेरक असे म्हणतात.
  • उत्प्रेरकामुळे रासायनिक प्रक्रियेचा वेग वाढतो किंवा ती प्रक्रिया कमी तापमानाला होते.
  • अपमार्जकांमध्ये (Detergent) विकारांचा (Enzymes) उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात.
  • आपले स्नायू, त्वचा, केस यांची जडणघडण करणारे प्रोटीन म्हणजे कार्बणी संयुगे असतात.
  • आपला अनुवंशिकीय वारसा ठरविणारी RNA व DNA ही न्यूक्लिइक आम्ले कार्बन संयुगे असतात.
  • आपण खातो ते अन्न घटक म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन मेदयुक्त पदार्थ व जीवनसत्वे ही कार्बन संयुगे असतात.
  • सुगंधी द्रव्ये, जीवाश्म इंधने, औषधे व कीटकनाशके, प्लॅस्टिक व रंजकद्रव्ये अशा विविध प्रकारच्या द्र्व्यामध्ये कार्बनसंयुगे असतात.
  • कापूस, रेशीम, लोकर, पॉलिस्टर, टेरिलीन, नायलॉन यांसारखे आपल्या वस्त्रांचे धागे हे कार्बन संयुगांचेच बनलेले असतात.
  • आपले जीवन ‘ कार्बन’ या मूलद्रव्यावर आधारलेले आहे.
  • कार्बन संयुगांची विविधता प्रचंड आहे. त्यांचा विस्तार एकच कार्बन अणू असलेल्या मिथेनपासून ते अब्जावधी कार्बन अणू असलेल्या डी.एन.ए. पर्यंत पसरलेला आहे.
  • कार्बनचा अणूअंक 6 असून त्यातील इलेक्ट्रॉनचे कवचनिहाय वितरण 2, 4 असे आहे.
  • कार्बनची संयुजा 4 आहे.
  • कार्बनकडे मालिका बंधन शक्ति असून त्याच्या खूप लांब साखळ्या बनू शकतात.
  • म्हणून कार्बनची संयुगे मोठया प्रमाणावर तयार होतात व त्यामुळे कार्बन हे अव्दितीय मूलद्रव्य ठरते.
  • बहुसंख्य कार्बन संयुगामध्ये सर्वसाधारणपणे आढळणारे मूलद्रव्य म्हणजे हायड्रोजन. सर्वात साध्या कार्बन संयुगामध्ये फक्त कार्बन व हायड्रोजन ही दोनच मूलद्रव्ये असतात.

    त्यांना हायड्रोकार्बन म्हणतात.

  • कार्बनच्या चार संयुंजांचे समाधान चार स्वतंत्र अनुंशी एकेरी बंध करून झालेले असते. अशा हायड्रोकार्बनना संतृप्त हायड्रोकार्बन म्हणतात.
  • दुसर्‍या प्रकारात हायड्रोकार्बनमधील किमान दोन कार्बन अणू एकमेकांशी बहुबंधाने जोडलेले असतात.
  • बहुबंधामधील कार्बन अणू हे त्या रेणुमधील इतर कार्बन अणूंपेक्षा वेगळे असतात.
  • मिथेन हा सर्वात साधी संरचना असलेला हायड्रोकार्बन असून त्याच्या रेणूत केवळ एकच कार्बन अणू असतो.
  • इंधन खाणी, कोळसा खाणी, गोबर गॅस व बायोगॅस मध्ये दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन असतो.
  • ज्वलनशीलतेमुळे मिथेनचा इंधन म्हणून वापर केला जातो.
  • हायड्रोजन व अॅसिटिलीन वायूंचे औधोगिक उत्पादन मिथेनपासून मिळते.
  • इथेन हा संतृप्त हायड्रोकार्बन आहे.
  • इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटाच्या किन्वण प्रक्रियेने मिळविले जाते.
  • इथिलीनचे मोठया प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटांच्या किन्वन प्रक्रियेने मिळविले जाते.
  • पॉलिथिन हे इथिलीन पासून बनविले जाते.
  • अॅसीटिलीन हा असंतृप्त हायड्रोकार्बन आहे.
  • ऑक्सिअॅसिटिलीन च्या ज्योतीचे तापमान नैसर्गिक वायू किंवा हायड्रोजन वायूंच्या जोतीपेक्षा जास्त असते.
  • PVC या बहुवारिकाच्या उत्पादनासाठी लागणार्याग कार्बन संयुगाच्या आधौगिक उत्पादनासाठी अॅसिटीलीन वापरला जातो.
  • सजीवांमधील रुपिकीय आणि कार्यरूपी विचरणास ‘जीवनसृष्टीची विविधता’ असे म्हणतात.
  • वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समुहामध्ये केलेली रचना. या समुहांना वर्गेकक (Taxa) असे म्हणतात.
  • वर्गीकरणामधील पदानुक्रमात वर्गेककांचा स्तर पुढील प्रमाणे असतो. जाती, प्रजाती, कुल, गण, वर्ग, विभाग, संघ.
  • वनस्पतीमधील सर्वात उच्च स्तरीय वर्गेककास ‘विभाग’ म्हणतात. तर प्राण्यातील सर्वोच्च स्तरास संघ (phylum) म्हणतात.
  • सर्वात उच्चस्तरीय वर्गेकक म्हणजे ‘सृष्टी’(Kingdom).
  • सर्व सजीवांची नावे दोन शब्दांच्या समूहाने दर्शवितात. प्रथम नावास प्रजाती नाम तर दुसर्‍या नावास जाती नाम म्हणतात.
  • मनुष्यप्राण्याचे वैज्ञानिक नाव ‘होमो-सेपियन्स’ असे आहे.
  • ही व्दींनामसूत्रीय नामकरण पद्धती कॅरोलस लिनियास ने शोधली.
  • अॅरिस्टॉटल आणि त्याच्या शिष्य थिओफ्रस्टस यांनी प्रथमच व्दिसृष्टी पद्धतीने वनस्पति व प्राणी यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयन्त केला.
  • आर.एच.व्हीटावर यांनी पंचसृष्टी पद्धती अस्तित्वात आणली.
  • चयापचयी क्रिया अभ्यासणारी शाखा म्हणजे ‘शरीरक्रिया शास्त्र’.
  • सस्तन प्राण्याच्या शरीरामध्ये आढळणारे हिमोग्लोबिन हे एक प्रथिन आहे.
  • मानव आणि गोरीला यांच्या हिमोग्लोबिनच्या रेणुच्या संरचनेत फक्त एका अमिनो आम्लाचा फरक असतो.
  • मानव व र्हीसस माकड यांच्या हिमोग्लोबीन रेणुच्या संरचनेत चार अमिनो आम्ले असतात.
  • एखाधा सजीवाच्या भ्रूणापासूनच्या विकासाच्या अभ्यासास ‘भ्रोणिकी’ (Embroyology) असे म्हणतात.
  • मासा, कासव, पक्षी, डुक्कर, मानव यांचे भ्रूण प्रारंभिक अवस्थेत समान असतात.
  • स्वसंरक्षण यंत्रणेशी निगडीत रक्त गुणधर्माचा अभ्यास करणारी विज्ञानशाखा म्हणजे रक्तद्रव्यशास्त्र होय.
  • वर्गीकरणाची अत्याधुनिक पद्धती डी.एन.ए., आर.एन.ए. आणि प्रथिने या जैवरेणूच्या अभ्यासवर आधारित आहे.
  • तंतुरूपी कवकांना ‘बुरशी’ म्हणतात. उदा. पेनिसिलियम, म्युकर
  • एकपेशीय कवकांना ‘किन्व’ असे म्हणतात. उदा. सॅकरोमायासिस.
  • ज्या संरचनेत निलहरित जीवाणू आणि शैवाल यांपैकी एक सजीव कवकाबरोबर सहजीवन जगतो, त्यांना शैवाक असे म्हणतात.  
     
  • उस्निया या शैवकाचा उपयोग मसाल्यात केला जातो. (Lichens)
  • जीवाणू हे सूक्ष्मदर्शीकीय एकपेशीय सजीव आहेत. त्यांना आदिकेंद्रकी सजीव असे म्हणतात.
  • हरिता (Mass) या वनस्पतीमद्धे संवहनी संस्थेचे कार्य करणारे संवहनी पट्ट असतात.
  • बीजाणुधानींच्या समुहास ‘शंकू’ असे म्हणतात. उदा. इक्किसेटम.
  • फिलिसिनी हा वनस्पतींचा सर्वात मोठा वर्ग आहे. या वनस्पतींना ‘नेचे’ असे म्हणतात.
  • निलवर्णीय देवमाशामध्ये प्राणी हे सुमारे ३५ मी. लांबी एवढे प्रचंड असतात.
  • संघ प्रोटोझुआ – अमिबा, एंटामिबा, प्लाझामोडियम, पॅरॅमेशिअम, युग्लिना, इ.
  • प्लाझामोडियम हा परजीवी आदिजीवी मानवाच्या तांबडया पेशीमध्ये आढळतो.
  • प्लासमोडियममुळे मलेरिया हा रोग होतो. माध्यम अॅनाफेलीस डासाची मादी.
  • संघ पोरीफेराची उदाहरणे- सायकोण, युस्पांजिया (आंघोळीचा स्पंज), हायलोनिमा.
  • हायड्रा हा दंडाकृती आकाराचा गोडया पाण्यात आढळणारा सिलेंटरेट आहे.
  • चपटे कृमी उभयलिंगी असतात.

 प्राणी सृष्टी :

  • पेशींच्या संघटित समुच्चयाला उती असे म्हणतात.
  • वनस्पतीमध्ये उतीचे दोन प्रकार आढळतात. विभाजी उती आणि स्थायी उती.
  • संयोजी उती या इंद्रिये आणि इतर उतींना एकत्र बांधून ठेवतात.
  • स्नायू उती हालचालीसाठी असतात.
  • फुलांचे निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग असे चार भाग असतात.
  • दृश्य केंद्रकी पेशींमध्ये सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक असतो तर आदि केंद्रकी पेशीमध्ये मात्र सुस्पष्ट पटल परिबद्धित केंद्रक नसतो.
  • जिवाणू पेशी ही आदिकेंद्रकी पेशी आहे.
  • सर्वे शैवाले, कवके, प्रोटोझुआ, वनस्पती आणि प्राणी ही दृश्य केंद्रकी पेशींची उदाहरणे आहेत.
  • डी.एन.ए. हा एकरेषीय व्दिसपीर्ल मोठया आकाराचा रेणू असून तो दोन बहुन्यू क्लिओटाइडसच्या धाग्यापासून तयार होतो.
  • डी.एन.ए. चे मुख्य कार्य म्हणजे जननिक माहितीचे जणूकाच्या रूपात संग्रहण करणे होय.
  • आर.एन.ए. हा सुद्धा बहुन्यूक्लिओटाइडसचा रेषीय रेणू असतो.
  • कुठल्याही जातीसाठी गुणसुत्रांची संख्या कायम असते.
  • मानवमध्ये 46 गुणसत्रे असतता.
  • तंतुकनिकेची लांबी साधारणपणे 1.5 ते 10 um तर रुंदी 0.25 ते 1.00 um यांच्या दरम्यान असते.
  • तंतुकनिकेची मुख्य कार्य म्हणजे ऊर्जानिर्मिती करून ती ए.टी.पी. रूपात साठवून ठेवणे.
  • तंतुकनिकांना पेशींचे ऊर्जाकेंद्र असे म्हणतात.
  • केंद्रकाच्या आधारद्र्व्यास केंद्रक द्रव्य म्हणतात. यामध्ये क्रोमॅटिन असते.
  • ज्या पोषणपद्धतीमध्ये प्रकाशाचा वापर ऊर्जा म्हणून केला जातो, त्यास प्रकाश संश्लेषी पोषण पद्धती असे म्हणतात.
  • वरील उदाहरणे – सर्व वनस्पती, शैवाले, युग्लिना, काही जीवाणू.
  • प्रकाश संश्लेषण अभिक्रियेत रेन्विय प्राणवायूची मुक्तता होते.
  • ज्या पोषणपद्धतीत अकार्बनी रसायानांचा वापर ऊर्जा म्हणून केला जातो त्यास रसायन संश्लेषी पोषण पद्धती असे म्हणतात.
  • उदा. नायट्रोफाईंग जीवाणू, लोह उपचयनी जीवाणू, गंधक उपचयनी जीवाणू
  • पिचर प्लँट, निपेंथस, सनड्यू (ड्रोसेरा) यासारख्या किटकाहारी वनस्पती त्याच्या नत्रयुक्त आणि प्रथिन गरजांसाठी कीटक व इतर सूक्ष्म प्राण्यांवर अवलंबून असतात.
  • आपल्या अन्न गरजपूर्तीसाठी दुसर्यार सजीवांवर अवलंबून असणारे सजीव परपोषी म्हणून ओळखले जातात. उदा. प्राणी, कवके, बहुकेत जीवाणू.
  • विकरे ही विविध प्रकारची प्रथिने असून पचनसंस्थेच्या विविध अंगांव्दारे त्यांची निर्मिती व स्त्रवण होते.
  • मृतोपजीवी पोषण गट – अनेक कवके (किन्व, बुरशी आणि छत्रकवके) जीवाणू.
  • बाह्यपरजीवी – गोचिड, डास, ढेकूण, उवा किंवा जळू अमरवेल, बांडगुळ.     

 

                                         

You might also like
1 Comment
  1. Sushilkumar says

    Sir,tumche upyukt notes aahet pn PDF madhe uplabdh hoil ka.pls

Leave A Reply

Your email address will not be published.