पृथ्वीला प्राप्त झालेल्या गती व त्याच्या परिणामांबद्दल माहिती

पृथ्वीला प्राप्त झालेल्या गती व त्याच्या परिणामांबद्दल माहिती

  • पृथ्वी सूर्याभोवती तसेच स्वत:भोवती फिरते. यामुळे पृथ्वीला परिवलन आणि परीभ्रमण अशा दोन गती प्राप्त झालेल्या आहेत.

1. परिवलन गती

  • पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्याला परिवलन गती किंवा दैनिक गती असे सुद्धा म्हणतात.
  • पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास 23 तास 56 मिनीटे 4 सेकंद लागतात. सापेक्षता हा कालावधी चोवीस तासाचा मानला जातो. पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
  • पृथ्वीचा परिवलन वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त असून ध्रुवावर सर्वात कमी आहे.
  • विषववृत्तावर पृथ्वीच्या परिवलनाचा वेग 1665.6 कि.मी. इतका आहे. पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर खालील परिणाम घडून आलेले आहेत.
  • दिवस व रात्र चक्र – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होण्याचे चक्र सुरू झाले असून पृथ्वीच्या ज्या भागावरच सूर्यकिरण पडतात तो भाग प्रकाशमान होवून तेथे दिवस होतो व राहिलेल्या अर्ध्या भागावर अंधार पडतो म्हणजे तेथे रात्र होते. पृथ्वीवरील दिवस रात्र चक्र अखंड चालू आहे.
  • सागर प्रवाह – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे सागराच्या पाण्याला वेग प्राप्त होतो. विषवृत्तीय प्रदेशातील पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते. यालाच सागर प्रवाह असे म्हणतात.
  • वार्‍यांना दिशा प्राप्त होते – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे वार्‍याची दिशा बदलते. याबाबतचा नियम फेरेल या शास्त्रज्ञाने मांडला. त्यांच्या मते पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे उत्तर गोलार्धातील वारे त्यांच्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धातील वारे डावीकडे झुकतात.

 

2. परिभ्रमन गती

  • पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला पृथ्वीची परीभ्रमण किंवा पृथ्वीची वार्षिक गती म्हणतात.
  • पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365.25 दिवस लागतात.
  • पृथ्वीच्या आसाने परीभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी 66 1/2° अंशाचा कोन केला आहे.
  • पृथ्वीचे उत्तर ध्रुवाकडील टोक सतत धृव तार्‍याकडे रोखलेले राहते. याला पृथ्वीच्या आसाचा तिरपेपणा असे म्हणतात.
  • पृथ्वीच्या परीभ्रमणामुळे व आसाच्या तिरपेपणामुळे पृथ्वीवर खालील गोष्टी घडून येतात.
  • सूर्याचे उत्तरायण व दक्षिणायन – पृथ्वीच्या परिभ्रमन काळात (एका वर्षात) सूर्याचे निरीक्षण केल्यास सूर्य 23 1/2° उत्तर ते 23 1/2° दक्षिण या दोन अक्षांशामध्ये प्रवास करीत असल्याचे दिसतो. यालाच सूर्याचे भासमान भ्रमण असे म्हणतात. या घटनेमुळे सूर्य 21 जून रोजी कर्कवृत्तावर (23 1/2° उत्तर) असतो. 21 जून नंतर सूर्य दक्षिणेकडे प्रवास करू लागतो. याला सूर्याचे दक्षिणायन असे म्हणतात. 23 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर असतो. 22 डिसेंबर रोजी सूर्य मकरवृत्तावर (23 1/2° दक्षिण) पोहचतो. या दिवसापासून सूर्य उत्तरेकडे प्रावास करू लागतो. याला सूर्याचे उत्तरायण काळ म्हणून ओळखला जातो.
  • असमान दिवस व रात्र – पृथ्वीचे परीभ्रमण व आसाचे तिरपेपण यामुळे पृथ्वीवर असमान दिवस व रात्र निर्माण झालेले आहेत.
  • पृथ्वीवर 21 जून रोजी सूर्य कर्कवृत्तावर (उत्तर गोलार्धात) असतो, या दिवशी कर्कवृत्तावर दिवस मोठा व रात्र लहान असते आणि मकरवृत्तावर (दक्षिण गोलार्धात) दिवस लहान व रात्र मोठी असते.
  • 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी सूर्य विषुववृत्तावर असतो. या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र बारा तासाची असते.
  • 22 डिसेंबर रोजी सूर्य मकरवृत्तावर (दक्षिण गोलार्धात) असतो. या दिवशी मकरवृत्तावर सर्वात मोठा दिवस व रात्र लहान असते आणि याच दिवशी कर्कवृत्तवार (उत्तर गोलार्धात) सर्वात मोठी रात्र व दिवस लहान असतो.
  • काल्पनिक वृत्ते – सूर्याच्या दक्षिणायन व उत्तरायणामुळे पृथ्वीवर उत्तर गोलार्धात 23 1/2° उत्तर अक्षांशावर कर्कवृत्त व दक्षिण गोलार्धात 23 1/2° दक्षिण आक्षांशावर मकरवृत्त हे काल्पनिक वृत्त निर्माण झालेले आहे.
  • पृथ्वीवर कटीबंध – पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे पृथ्वीवरील 23 1/2° 1/2° उत्तर आणि 23 1/2° दक्षिण ते 66 1/2° दक्षिण अक्षांक दरम्यानचा प्रदेश समशीतोष्ण कटीबंध म्हणून व 661/2° ते 90° उत्तर किंवा दक्षिण या भागातील प्रदेश शीत कटीबंध म्हणून ओळखला जातो.
  • पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती – पृथ्वीवरील असमान दिवस रात्र यामुळे ऋतू निर्माण झालेले आहेत.
  • उन्हाळा ऋतू – 21 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिवस मोठा असल्यामुळे प्रकाश व उष्णता जास्त वेळ मिळते. या कारणामुळे या भागात उन्हाळा असतो तर दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो.
  • हिवाळा ऋतू – 23 सप्टेंबर ते 21 मार्च या काळात उत्तर गोलार्धात दिवस लहान व रात्र मोठी असते. यामुळे तेथे उष्णता व प्रकाश कमी काळ मिळतो आणि उष्णता उत्सर्जनाचा काळ जास्त असतो. या कारणामुळे उत्तर गोलार्धात हिवाळा असतो. तर दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो.
You might also like
1 Comment
  1. ram biradar IPS MAIN EXAM KNOW says

    UPSC STUDYING KNOW PRELIMS SCORE GS1 score150 .GS2 score 120

Leave A Reply

Your email address will not be published.