मानवी हक्क संरक्षण कायदा : 1993 (प्रकरण 6) विषयी संपूर्ण माहिती

Manavi Hakka Sanrakjshan Kayada Prakaran-6

मानवी हक्क संरक्षण कायदा : 1993 (प्रकरण 6)

प्रकरण 6 : मानवी हक्क न्यायालये

30. मानवी हक्कांच्या उल्लंघंनामुळे निर्माण होणार्‍या अपराधांची चौकशी वेगाने व्हावी या हेतूने राज्यशासन, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाच्या संमतीने अधिसूचनेव्दारे, प्रत्येक जिल्हयासाठी उपरोक्त अपराधांची चौकशी करण्यासाठी मानवी हक्क न्यायालय निर्माण व्हावे म्हणून एक सत्र न्यायालय विनिर्दिष्ट करील.

परंतु या कलमातील कोणतीही गोष्ट जर –

  • सत्र न्यायालय अगोदरच विशेष न्यायालय म्हणून विनिर्दिष्ट करण्यात आलेले असेल;  किंवा
  • एखादे विशेष न्यायालय यापूर्वीच स्थापले असेल तर लागू असणार नाही.
31. विशेष सरकारी वकील :
  • प्रत्येक मानवी हक्क न्यायालयासाठी राज्यशासन, त्या न्यायालयाचे कामकाज योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी, अधिसूचनेव्दारे एक सरकारी वकिली व्यवसाय करीत असलेल्या एखादया विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करील.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.